PM Modi On Caste Census : जातनिहाय जनगणनेवर पंतप्रधान मोदींचे सर्वात मोठे विधान; म्हणाले, "हिंदूंची संख्या..."

Bihar Caste Survey : "ते म्हणायचे देशाच्या संसाधनावर पहिला हक्क मुस्लिमांचा.."
Narendra Modi
Narendra Modi Sarkarnama
Published on
Updated on

Chhattisgarh News : बिहारमधील जातनिहाय जनगणनेची आकडेवारी समोर आल्यानंतर केंद्र आणि राज्य सरकारमधील तणाव वाढला आहे. केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते या जनगणनेतील उणिवा समोर आणत आहेत. दुसरीकडे राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेसने बिहारच्या धर्तीवर देशात जात जनगणना करण्याची मागणी केली आहे. यावर आता पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही उडी घेत आपली परखड भूमिका मांडली आहे. (Latest Marathi News)

Narendra Modi
Tembhu Water Issue : ना राष्ट्रवादी ना भाजप, शिंदे गटानेच मारली बाजी; टेंभू पाणी योजनेला अखेर मंजुरी

नरेंद्र मोदी म्हणाले, "काँग्रेस वेगळाच सूर आवळण्याचा प्रयत्न करत आहे. जितकं लोकसंख्येचं प्रमाण, तेवढेच हक्कं. पण, या देशात सर्वात मोठी लोकसंख्या गरीब आहे. माझ्यासाठी 'गरीब' हीच मोठी लोकसंख्या आहे. गरीब कल्याण हेच माझं ध्येय आहे, असे म्हणत त्यांनी एकप्रकारे जातनिहाय जनगणनेला विरोधच दर्शवला आहे." पंतप्रधान मोदी आज छत्तीसगड येथे एका कार्यक्रमात बोलत होते.

Narendra Modi
Ambedkar on Congress-NCP : साखरपुडा झाला; पण ‘ते’ दोन ‘भटजी’ अडथळे आणत आहेत, त्यामुळे प्रसंगी विनालग्नाचे राहू; पण...

मोदी पुढे म्हणाले, "मी विचार करत होतो की, माजी पंतप्रधान मनमोहनसिंग आज काय विचार करत असतील? ते नेहमी म्हणत होते की, देशाच्या संसाधनांवर पहिला हक्क अल्पसंख्याकांचा आहे आणि त्यातही मुस्लिमांचा आहे. आता काँग्रेस म्हणत आहे की, लोकसंख्येमध्ये कुणाचं प्रमाण किती यावर पहिला हक्क ठरणार आहे. म्हणजे आता अल्पसंख्याकांचा हक्क काँग्रेसला कमी करायचा आहे का? आता पहिला हक्कं कुणाचा ठरणार आहे? देशात लोकसंख्या कुणाची जास्त आहे? हे काँग्रेसेने स्पष्ट केलं पाहिजे. काँग्रेस अल्पसंख्याकांना डावलणार आहे का? आता सर्वात जास्त लोकसंख्या असलेल्या हिंदूंनी सारे हक्क घ्यावेत का?" अशी प्रश्नांची सरबत्ती मोदींनी केली आहे.

(Edited By - Chetan Zadpe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com