कऱ्हाड : गेल्या लोकसभा निवडणुकीत ज्या जागांवर भाजपाला विजय मिळवता आला नाही, त्या सर्व जागांवर येत्या लोकसभा निवडणुकीत भाजपाचे उमेदवार निवडून आणण्यासाठी पक्षाने लक्ष निश्चित केले आहे. सातारा लोकसभा व कऱ्हाड दक्षिण मतदारसंघात यावेळच्या निवडणुकीत कमळ फुलवू, असा विश्वास माजी राज्यमंत्री, भाजपा लोकसभा प्रवास योजनेचे राज्य प्रभारी संजय उर्फ बाळा भेगडे sanjay Bhegade यांनी व्यक्त केला.
कऱ्हाड (जि. सातारा) येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित भाजप पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते. भाजपचे प्रदेश सचिव विक्रम पावसकर, लोकसभा प्रभारी तथा प्रदेश कार्यकारिणी सदस्य अतुल भोसले, शहराध्यक्ष एकनाथ बागडी, शेखर वडणे, डॉ. सारिका गावडे, व्ही. के. मोहिते, मुकुंद चरेगावकर, आदी उपस्थित होते.
श्री. भेगडे यांनी पदाधिकाऱ्यांशी संवाद साधत बूथ कमिटी रचना, लोकसभा प्रवास अंतर्गत केंद्रीय मंत्री सोमप्रकाश यांच्या दौऱ्याबाबतचा आढावा घेऊन ते म्हणाले, भाजप हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. त्यामुळे पक्ष हे आपले एक कुटुंब आहे असे मानून कार्यकर्त्यांनी कार्यरत राहावे. पक्षात प्रामाणिकपणे काम करणाऱ्या व्यक्तीला संधी मिळतेच.
त्यामुळे नवीन व्यक्ती पक्षात आली की आपले अस्तित्व धोक्यात येईल असे कुणीही समजू नये. नव्याने पक्षात येणाऱ्यांचे स्वागत करा. तसेच माझा बूथ मी जिंकून देणार हा निर्धार प्रत्येक बूथ प्रमुखाने करावा. श्री. भोसले म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या मार्गदर्शनाखाली माजी मंत्री बाळा भेगडे यांच्यावर महाराष्ट्रातील लोकसभा प्रवास योजनेची जबाबदारी आहे.
त्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील विविध लोकसभा मतदारसंघात भाजपाचे संघटन वाढवत आहे. येणाऱ्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पक्ष चिन्हावर ताकदीने लढवून, सर्व जागांवर भाजपाचे उमेदवार निवडून आणण्याचा निर्धार सर्वांनी करूया.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.