Sanjay kokate-Shivaji Sawant-Sharad Pawar-Ajit Pawar  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Madha Politic's : ‘विधानसभेच्या 2009 च्या निवडणुकीत मी शिवाजी सावंतांना शरद पवार अन्‌ अजितदादांसमोर नेऊन बसवलं होतं’

Shivaji Sawant Vs Sanjay Kokate : सावंतांकडे सायकल नव्हती, त्यावेळी आम्ही जीपमध्ये फिरत होतो. आमच्या घरात कोणालाही वाईट नाद नाही, त्यामुळे आमचं चांगलं आहे. मला कोणापुढे झुकायला जमत नाही, असेही संजय कोकाटेंनी स्पष्ट केले.

Vijaykumar Dudhale

Solapur, 01 August : तुम्हाला 2009 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये संजय कोकाटेंनी ज्येष्ठ नेते शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमोर बसवलं होतं आणि तुम्हाला उमेदवारी मिळणार होती. पण, तुम्ही त्यांच्या स्टेजवर गेला आणि ते गणित फसलं, अशी आठवण संजय कोकाटे यांनी शिवाजी सावंतांना करून दिली. तसेच, तुम्ही फार मोठे नाहीत. अर्थकारणात तुम्ही मोठे असाल, पण मी जनतेत मोठा आहे, असा टोलाही कोकाटेंनी लगावला.

शिवसेनेचे सोलापूरचे जिल्हासंपर्कप्रमुख शिवाजी सावंत (Shivaji Sawant) यांनी गुरुवारी (ता. ३१ जुलै) आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर माढ्यातील पत्रकार परिषदेत त्यांना संजय कोकाटे आणि महेश साठे यांच्यासंदर्भात प्रश्न विचारला होता. त्याबाबत सावंत यांनी ‘मी प्रतिक्रिया द्यावी, एवढे ते मोठे नाहीत,’ असे म्हटले होते, त्याला कोकाटेंनी सडेतोड उत्तर देताना 2009 ची आठवण सांगितली आहे.

माढा नगरपंचायत, माढा बाजार समितीत आम्ही कष्ट केले. पण, तुम्हाला नेतेपद दिले. दुर्दैव असं की आम्हाला सगळ्यात कमी मतं मानेगाव भागात पडली. तुम्ही शिवसेना वाढवली म्हणता. पण तुम्ही एकदाच जिल्हा परिषद सदस्य झालात. तुम्ही नेमलेले पदाधिकारीही तुमच्यासोबत नाहीत. तुम्हाला फक्त कामगार आणि मालक एवढंच माहिती आहे. तुम्हाला पक्षाने काय दिलं नाही, आम्हाला एक रुपयाचाही निधी तुम्ही मिळू दिलेला नाही, असा आरोपही संजय कोकाटे (Sanjay Kokate) यांनी केला.

ते म्हणाले, तुम्ही शिवसेनेच्या किती उमेदवाराच्या प्रचाराला गेलात. तुम्ही प्रचार कोणाचा केला? विधानसभेच्या 2019 च्या अनेक गंमती जमती मला माहिती आहेत. पण, तुम्ही माझी बाजू ठामपणे घेतली, त्यामुळे मी तुमचा आजपर्यंत आदरच केला. पण, तुम्ही एवढे मोठे नाहीत. तुम्ही आरशासमोर उभे राहून विचारा की आपण किती माणसांत आहे.

विधानसभेच्या निवडणुकीत तुम्ही बबनराव शिंदे यांच्या मुलाचा प्रचार का केला? शिवसेनेचा संपर्कप्रमुख अपक्ष उमेदवाराचा प्रचार कसा काय करू शकतो? पक्षाने तुम्हाला परवानगी दिली होती का? आता तुमच्यासाठी किती राजीनामा देतात, हे आम्ही बघतो. तुम्ही नेमलेले पदाधिकारी तुमच्यासेाबत नाहीत. तुमची जनतेत काहीही औकात राहिलेली नाही, असेही कोकाटे यांनी स्पष्ट केले.

कोकाटे म्हणाले, इथून पुढे तुम्ही मोहळाला दगड मारू नका. मी फार सौम्य भाषेत प्रतिक्रिया दिली आहे. माझा प्रपंच पक्षावर नाही, त्यामुळे मला काही देणं घेणं नाही. पण, कुठल्याही पक्षात गेलो तर त्या पक्षासाठी प्रमाणिकपणे काम करतो. आमच्या टार्गेटसाठी आम्ही दहा वेळा पक्ष बदलला असेल, पण आम्ही एक रुपयाही कोणाच्या मिंध्यात नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT