Bribe News  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Sangli Crime : थकीत पगार मंजुरीसाठी शिक्षकाने लाखाची तर मदतीसाठी पोलिसाने घेतली 25 हजारांची लाच

Anti-Corruption Action : मागील अनेक दिवसांपासून सरकारी अधिकारी आणि पोलिसांकडून लाच घेण्याचे प्रकार वाढल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांनी विश्वास कोणावर ठेवायचा असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

Jagdish Patil

Sangli News, 31 Dec : मागील अनेक दिवसांपासून सरकारी अधिकारी आणि पोलिसांकडून लाच घेण्याचे प्रकार वाढल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांनी विश्वास कोणावर ठेवायचा असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

अशातच आता सांगली (Sangli) जिल्ह्यात एकाच दिवशी पोलिस, शिक्षक आणि लिपिक असे तिघेजण लाज घेताना सापडले आहेत. या लाचखोरांवर कारवाई करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. शिवाय समाजाचं रक्षणकर्ते असणाऱ्या पोलिसांकडूनच असा प्रकार घडल्यामुळे संताप व्यक्त केला जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गुन्ह्यातील मदतीसाठी पोलिसाने 25 हजारांची लाच मागितली होती. तर महाविद्यालयातील थकीत पगार मंजुरीसाठी शिक्षक (Teacher) आणि लिपिकाने 1 लाख 10 हजार रुपयांची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

एकाच दिवशी दोन विविध ठिकाणी लावलेल्या सापळ्यांमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (Anti-Bribery Department) दोन पथकांनी एकापाठोपाठ दोन कारवाया करत विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद केला आहे.

पोलिस उपअधीक्षक उमेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली निरीक्षक विनायक भिलारे, किशोरकुमार खाडे, प्रतीम चौगुले, सुदर्शन पाटील, उमेश जाधव, अतुल मोरे, रामहरी वाघमोडे, सीमा माने, अजित पाटील, राधिका माने, पोपट पाटील, सलीम मकानदार, चंद्रकांत जाधव, विठ्ठल रजपूत यांचा कारवाईत सहभाग होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT