Priyanka Gandhi : अमित शाहांच्या 'त्या' घोषणेचे प्रियांका गांधींकडून स्वागत, म्हणाल्या, 'मला आनंद...'

Wayanad Landslide : जुलै महिन्यात वायनाडमध्ये भूस्खलन झाले होते. या दुर्घटनेमध्ये 100 पेक्षा अधिक बळी गेल्याचे सांगितले जात आहे.
Priyanka Gandhi
Priyanka GandhiSarkarnama
Published on
Updated on

Priyanka Gandhi News : अमित शाह यांच्या विरोधात संसदेत आक्रमक असलेल्या प्रियांका गांधी आक्रमक असतात. मात्र, वायनाडमधील दुर्घटनेला 'गंभीर निसर्गाची आपत्ती' घोषित केल्याने त्यांनी या घोषणेचे स्वागत करत आनंद व्यक्त केला आहे.

'अमित शाह तुम्ही वायनाडमधील दुर्घटनेला 'गंभीर निसर्गाची आपत्ती' म्हणून घोषित करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे पुनर्वसनाची गरज असलेल्यांना खूप मदत होईल आणि हे निश्चितपणे योग्य दिशेने एक पाऊल आहे. त्यासाठी पुरेसा निधीही लवकरात लवकर दिला गेला तर आम्ही सर्व कृतज्ञ राहू', असे ट्विट करत प्रियांका गांधी म्हणाल्या आहेत.

जुलै महिन्यात वायनाडमध्ये भूस्खलन झाले होते. या दुर्घटनेमध्ये 100 पेक्षा अधिक बळी गेले आहेत. त्यानंतर येथे सुरू असेलेल्या मदत कार्यात तसेच पीडितांना भरीव आर्थिक मदत मिळावी म्हणून वायनाडच्या खासदार प्रियांका गांधी यांनी गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती.

Priyanka Gandhi
Bacchu Kadu : '125 लोकांनी स्टॅम्प पेपरवर लिहून दिलं पण पडली 60 मतं', 'हा' मोठा नेता जाणार कोर्टात

प्रियांका गांधी म्हणाल्या होत्या की, वायनाडमध्ये भूस्खलनग्रस्त लोक आहेत. ज्यांना राहण्यासाठी कोणतीही व्यवस्था नाही. अशा परिस्थितीत केंद्र जर मदत केली नाही तर संपूर्ण देशाला आणि विशेषत: पीडितांना खूप वाईट संदेश जाईल.राजकारण बाजूला ठेवून तेथील लोकांना मानवतावादी दृष्टिकोनातून मदत करण्याचे आवाहन प्रियांका गांधी यांनी केले होते.

२९ जुलै झाले होते भूस्खलन

वायनाडमध्ये 29 जुलैच्या रात्री भूस्खलन झाले होते. मुंडक्काई, चुरलमला, अट्टामला आणि नूलपुझा ही चार गावे भूस्खलनामुळे पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहेत. तेव्हा वायनाडचे खासदान राहुल गांधी हे होते त्यांनी राजीनामा दिल्यानंतर प्रियांका गांधी येथून खासदार म्हणून विजयी झाल्या. वायनाडमधील भूस्खलन झालेल्या भागातील नागरिकांना मदत मिळावी म्हणून त्या प्रयत्न करत होत्या.

Priyanka Gandhi
Sanjay Raut News : 'तो' फोटो! खासदार राऊतांचे सूचक ट्विट; व्वा! क्या सीन है? नक्की कोण कुणाचा 'आका'?

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com