Karad, 19 May : वारंवार निर्यातबंदी केल्यामुळे जागतीक बाजारपेठ गमवण्याचा फटका भारताला बसला आहे, असे स्पष्ट मत व्यक्त करुन आमदार सदाभाऊ खोत यांनी सरकारला घरचा आहेर दिला. निर्यातबंदीचा परिणाम कांदा पिकावर झाला आहे. निर्यातबंदीचे हत्यार हे शेतकरीविरोधी आहे, ते सरकारने न वापरणे हाच त्यातील शहाणपणाचा मार्ग आहे, असा सल्लाही त्यांनी सरकारला दिला. शेतकरीविरोधी धोरणे राबवू नका, हा शेतकरी देशाला पुढे घेऊन जाऊ शकतो, असेही त्यांनी स्पष्ट केले.
कराडमध्ये माध्यमांशी बोलताना सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी सरकारी धोरणांवर परखडपणे भाष्य केले. ते म्हणाले, वारंवार निर्यातबंदीमुळे जागतिक बाजारपेठ गमावण्याचा फटका भारताला बसला आहे. सरकारने कांदा खरेदीसाठीचा निर्णय जाहीर केलेला आहे. त्याच्यातून भाव वाढून शेतकऱ्याला दिलासा मिळेल. मात्र, निर्यातबंदीचे हत्यार हे शेतकरीविरोधी आहे, ते सरकारने न वापरणे हाच त्यातील शहाणपणाचा मार्ग आहे. शेतकऱ्याला चांगले दिवस येण्यासाठी जगाची बाजारपेठ शेतकऱ्यांना खुली करण्याची गरज आहे.
समृद्धी महामार्गावर उबाठा गटाच्या (Shivsena UBT) आंदोलनबाबत ते म्हणाले, उबाठा गट असो किंवा कबाटा असो. ते ज्या कॉंग्रेसबरोबर, एनडीए सरकारबरोबर गेले, त्यांनी त्यांनी ५०-६० वर्षात शेतीचे वाटोळे केले. ज्यांच्याकडे शेतकरी नेता म्हणून केंद्रातील कृषी खाते दीर्घकालीन होते त्यांनीही शेतकरी विरोधीच धोरणे राबवली आहेत.
लोकसभेत तीन कृषी विधयके मांडली, त्यावेळी उबाठा गटाने का पाठिंबा दिला नाही ? उबाठासह सर्व विरोधी इंडिया आघाडीतील पक्ष आहेत त्यांना शेतकऱ्यांचा माल फुकट खायचा कळतो. देशावर सध्या जे संकट आले आहे, त्या संकटातून शेतकरी देशाला बाहेर काढू शकतो. अटलबिहारी वाजपेयी यांनी इथेनॉलचा निर्णय घेतला. त्यानंतर मोदींनी इंधनात २० टक्के इथेनॉल मिश्रीत करण्याचा निर्णय घेतला. तुमचे सरकार असताना तुम्ही का निर्णय घेतला नाहीत? या देशाला या संकटात कोणी घातले ?
जयंत पाटलांना अर्थ खात्याचा अर्थ काय कळाला?
डिझेल-पेट्रोलचे दर १३० रुपये होणार, असे आमदार जयंत पाटील हसत हसत बोलले. पण २००४ मध्ये जे डिझेल-पेट्रोल ३४ रुपये होते ते २०१४ मध्ये ७६ रुपये लिटर केले. प्रतिलिटर ४४ रुपये तुमच्या काळात वाढले. २०१४ नंतर आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या काळात फक्त २२ रुपयांनी पेट्रोल-डिझेल वाढले आहे. तुमच्या काळात सर्वाधिक वाढ झाली आहे. जगावर संकट आल्यावर देशाचा प्रमुख कुंटुंबाला सावध करत असेल तर त्यात गैर काय आहे असा उलटसवाल करुन आमदार सदाभाऊ खोत यांनी ते अर्थमंत्री होते, त्यांना अर्थ खात्याचा अर्थ काय कळाला? असा सवाल केला.
बच्चू कडूंना आजोळची माया अजून कळलेली नसावी
आमदार बच्चू कडू यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री होतील, असे वक्तव्य केले होते. त्यावर आमदार खोत म्हणाले, आमदार बच्चू कडू यांना ते सासरवाडी मुक्कामाला नाहीत, तर ते आजोळी मुक्कामाला आलेले आहेत. आजोळची माणस प्रेमाने सांभाळत असतात. आजोळची माया ही वाहत्या गंगेसारखी असते, हे बच्चुभाऊंना समजलेले दिसत नाही. देवाभाऊ हे प्रस्थापितांच्या विरोधातील विस्थापितांचे नेतृत्व आहे. यशवंतराव चव्हाण यांच्यानंतर महाराष्ट्राच्या विकासाचे व्हीजन असलेले नेतृत्व आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.