Amravati News : अमरावतीत शिवसेना उबाठा गट शिंदेंच्या शिवसेनेत विलीन; थेट मंत्र्यांनी फिरवली सूत्र : स्थायी समिती अन् स्वीकृतसाठी वंचितही काँग्रेसच्या गोटात

Amravati Municipal Corporation : अमरावती मनपात शिवसेना उबाठा गट शिंदे गटात विलीन तर वंचित काँग्रेसमध्ये दाखल. स्थायी समिती व स्वीकृत सदस्य निवडीपूर्वी काँग्रेस आघाडीचे संख्याबळ वाढले. राजकीय समीकरणात मोठा बदल.
Amravati-Municipal-Corporation
Amravati-Municipal-CorporationSarkarnama
Published on
Updated on

Amravati Standing Committee Election : अमरावती महापालिकेत स्थायी समिती व स्वीकृत सदस्य निवडीच्या पार्श्वभूमीवर राजकीय चित्र मोठ्या प्रमाणात बदलले आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट शिवसेना-बसपा गटात, तर वंचित बहूजन आघाडी हा गट काँग्रेसमध्ये विलीन झाला आहे. या विलीनि‍करणानंतर काँग्रेसप्रणीत आघाडीचे संख्याबळ 16 इतके झाले. त्यामुळे गटाचे 2 सदस्य आता स्वीकृत म्हणून नियुक्त करता येणार आहेत. तर उबाठा विलीन झाल्यानंतरही या गटाचा एकच सदस्य स्वीकृत होणार आहे.

गटातील सदस्य संख्या वाढविण्यासाठी सभागृहातील पक्षांमध्ये चढाओढ लागली आहे. यात काँग्रेसला यश मिळाले असून वंचित बहूजन आघाडीच्या एका सदस्याने काँग्रेस गटात विलीनीकरण केल्याने या गटाची संख्या 16 झाली आहे. त्यामुळे स्वीकृतच्या निवडीत गुणांकनात काँग्रेसच्या गुणांमध्ये वाढ झाली आहे. अपूर्णांकात ही गुणवाढ झाल्याने या गटाचा दुसरा सदस्य स्वीकृत सदस्य म्हणून नियुक्त करता येणार आहे. पूर्वी 15 सदस्यांच्या भरवशावर एकच सदस्य नियुक्त करता येणार होता.

शिवसेना उबाठाचे सभागृहात दोन सदस्य आहेत. या दोन सदस्यांच्या स्वतंत्र गटाने शिवसेना-बसपा आघाडीत विलीनीकरण केल्याने या संयुक्त गटाची सदस्यसंख्या आठवर गेली आहे. शिवसेना-बसपा आघाडीचे पूर्वी 6 सदस्य होते व या गटाचा एक सदस्य स्वीकृत सदस्य म्हणून निवडला जाणार होता. आता हा गट 8 सदस्यांचा झाला असला तरी त्यांचा एकच सदस्य निवडला जाणार आहे. उबाठाच्या 2 सदस्यांना आघाडीत सामावून घेण्यासाठी शिवसेना मंत्री संजय राठोड यांनी मध्यस्थी केल्याचे सांगण्यात येत आहे.

Amravati-Municipal-Corporation
Amravati Municipal Corporation : नवनीत राणांच्या पराभवासाठी काँग्रेसला मदत केली.. त्याच नेत्याला नगरसेवक करण्यासाठी शिंदेंची शिवसेना आग्रही

नावे आघाडीवर :

स्वीकृत सदस्यांच्या नियुक्ती व स्थायी समितीच्या १६ सदस्यांची निवड येत्या 20 फेब्रुवारीस होत असलेल्या महापालिकेच्या पहिल्या सर्वसाधारण सभेत होणार आहे. काँग्रेसचे सदस्यसंख्येच्या गुणांवर काँग्रेसच्या वाट्यावर दोन स्वीकृत सदस्य येणार आहेत. माजी महापैार मिलिंद चिमोटे व पत्रकार अनिल अग्रवाल यांचे नाव आघाडीवर असल्याचे सांगण्यात येत आहे. शिवसेना-बसपा-उबाठा गटाकडून माजी नगरसेवक दिनेश बूब यांचे नाव असल्याचे सांगण्यात येत आहे. राष्ट्रवादी व एमआयएमसह भाजपने अद्याप आपले पत्ते उघडलेले नाहीत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com