Prashant Koratkar  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Prashant Koratkar : पोलिसांकडून कोरटकरच्या तपासासाठी टाळाटाळ? आवाज तपासणीसाठी फॉरेन्सिकला पत्रव्यवहारच नाही

Prashant Koratkar Case : छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या आणि इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना जीवे मारण्याचे धमकी दिलेल्या डॉ. प्रशांत कोरटकरचा पुढील तपास रखडला आहे. जामीन मंजूर होऊन महिना उलटला तरी पोलिस महासंचालक कार्यालयाकडून फॉरेन्सिक विभागाला आवाज तपासणीसाठी पत्रच दिले नसल्याची माहिती समोर आली आहे.

Rahul Gadkar

Kolhapur News, 14 May : छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या आणि इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना जीवे मारण्याचे धमकी दिलेल्या डॉ. प्रशांत कोरटकरचा पुढील तपास रखडला आहे.

जामीन मंजूर होऊन महिना उलटला तरी पोलिस महासंचालक कार्यालयाकडून फॉरेन्सिक विभागाला आवाज तपासणीसाठी पत्रच दिले नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे पुढील तपास रखडला आहे.

पोलिस महासंचालक कार्यालयाकडून पत्रव्यवहार करण्याला मुहूर्त मिळत नसल्याने तक्रारदार इंद्रजीत सावंत यांनी देखील पोलिस तपासावर शंका उपस्थित केली आहे. दरम्यान, पोलिस महासंचालक कार्यालयातील एका मोठ्या अधिकाऱ्यासोबत कोरटकर यांचे फोटो काही दिवसांपूर्वी व्हायरल झाले होते. त्यामुळे शंकेला आणखी वाव मिळाला आहे.

24 फेब्रुवारी रोजी नागपूर येथील प्रशांत कोरटकर याने इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना फोनवरून धमकी दिली होती. तसेच छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याबाबत अवमानकारक वक्तव्य केले होते. त्यानंतर महाराष्ट्रात कोरटकर याच्याबाबत संताप व्यक्त करण्यात आला होता.

शिवप्रेमींनी आवाज उठवल्यानंतर कोल्हापुरातील (kolhapur) जुना राजवाडा पोलीस ठाण्यात कोरटकर यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला होता. 25 मार्च रोजी कोरटकरला तेलंगणा राज्यातून अटक केली. फॉरेन्सिक विभागाकडून पोलिस कोठडीत असताना कोरटकर याचे आवाजाचे नमुने घेतले होते.

या आवाजाचे नमुने तपासण्यासाठी पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी महासंचालक कार्यालयाकडे पत्रव्यवहार केला होता. मात्र, महासंचालक कार्यालयाकडून अद्याप फॉरेन्सिक विभागाला पत्र आलेले नाही. त्यामुळे आवाजाची फॉरेन्सिक तपासणी अद्याप झालेली नाही. कोरटकरला जामीन मिळून महिना उलटला तरी तपासाला गती मिळालेली नाही.

प्रकरणाची गांभीर्य ओळखून महासंचालक कार्यालयाने पत्र पाठवणे अपेक्षित होते. कोरटकर यांच्या आवाजाचे नमुने तपासण्यासाठी आणि त्यासाठी लागणारा पत्र व्यवहार थांबवून गुन्हा रखडत ठेवण्याचा उद्देश आहे की काय? अशी शंका इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT