Shivsena UBT Crisis : राजीनामा देताच 'मातोश्रीला' खडबडून जाग; ठाकरेंकडून घोसाळकरांच्या मनधरणीचे प्रयत्न

Shivsena Crisis Tejasvee Ghosalkar Resign : तेजस्वी घोसाळकर या माजी आमदार विनोद घोसाळकर यांच्या सून आहेत. त्यांचे पती माजी नगरवेक अभिषेक घोसाळकर यांची माॅरीस नरोन्हाने याने फेसबूक लाईव्ह करत हत्या केली होती.
Tejasvee Ghosalkar
Tejasvee Ghosalkar Sarkarnama
Published on
Updated on

Tejasvee Ghosalkar News : शिवसेनेचा उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील माजी नगरसेविका आणि दहिसर विधानसभा प्रमुख तेजस्वी घोसाळकर यांनी ठाकरेंची साथ सोडली आहे. मंगळवारी त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. घोसाळकर या एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत जाणार की भाजपमध्ये याची चर्चा सुरू असताना मोठी बातमी समोर आली आहे. तेजस्वी घोसाळकर या आज उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट घेणार आहेत.

तेजश्री घोसाळकर या उद्धव ठाकरेंना भेटणार असल्याने त्यांची नाराजी दूर करण्याचे प्रयत्न केले जाणार आहेत. ही भेट मंगळवारीच होणार होती मात्र काही कारणास्तव ती होऊ शकली नाही. त्यामुळे आज (बुधवारी) ही भेट 'मातोश्री'वर होत आहे.

Tejasvee Ghosalkar
Operation Sindoor Survey : ऑपरेशन सिंदूर, युद्धविरामाच्या निर्णयावर मोठा सर्व्हे आला समोर, मोदी सरकारवर जनता खूश की नाराज?

तेजस्वी घोसाळकर या माजी आमदार विनोद घोसाळकर यांच्या सून आहेत. तर दिवंगत माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर हे त्यांचे पती आहेत. काहीच दिवसांपूर्वी माॅरीस नरोन्हा नामक व्यक्तीने फेसबुक लाईव्ह करुन अभिषेक यांची हत्या केली होती. गतवर्षी विधानसभा निवडणुकीत विनोद घोसाळकर हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून लढले होते. मात्र, भाजपच्या उमेदवार मनिषा चौधरी यांनी त्यांचा पराभव केला होता.

Tejasvee Ghosalkar
Sharad Pawar : 'ऑपरेशन सिंदूर'ची माहिती प्रत्येक खासदाराला देण्यावरून काँग्रेस अन् शरद पवारांमध्ये मतभेद; नेमकं प्रकरण काय?

शिंदे-भाजपमध्ये चढाओढ

उद्धव ठाकरेंच्या पक्षाला रामराम करून बाहेर पडत असलेल्या माजी नगरसेवकांना आपल्या पक्षात घेण्यासाठी एकनाथ शिंदे आणि भाजपमध्ये चढाओढ सुरू आहे. तेजस्वी घोसाळर यांनी आपल्या पक्षात यावे यासाठी एकनाथ शिंदेंची शिवसेना प्रयत्न करत असल्याची माहिती आहेत. त्यातच भाजपने देखील फिल्डिंग लावली असून घोसाळकर या भाजपमध्ये जाणार असल्याची देखील चर्चा आहे. मात्र, उद्धव ठाकरेंच्या भेटीनंतरच घोसाळकर पुढील निर्णय घेण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com