Prashant Koratkar And Historian Indrajit Sawant sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Indrajit Sawant : प्रशांत कोरटकरच्या अटकेवर इंद्रजीत सावंतांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले ‘अशा...’

Indrajit Sawant reaction on Prashant Kortkar arrest : या व्यक्तिला महिनाभर वाचवण्यासाठी एक यंत्रणा कार्यान्वित होती, पाठिशी कोण होतं याचा शोध घेतला पाहिजे. असंही म्हणाले आहेत.

Mayur Ratnaparkhe

Indrajit Sawant latest news : छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत अवमानास्पद वक्तव्य करणाऱ्या आणि इतिहासकार इंद्रजीत सावंत यांना धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरला अखेर तेलंगणामधून अटक झाली आहे. जवळपास महिनाभर गायब झालेल्या कोरटकरला अटक झाल्यानंतर इंद्रजीत सावंत यांनी मीडियाला पहिली प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी काही शंका व प्रश्न उपस्थित करत, मागणीही केली आहे.

इंद्रजीत सावंत(Indrajit Sawant ) म्हणाले, ‘’अशा चिल्लर माणसाने खरंतर एक महिना, आमच्या कोल्हापूरच्या भाषेत बोलायचं झालं तर तंगवातंगवी केली, ही खूप मोठी गोष्ट आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट यामध्ये ही आहे की, एक महिनाभर झालं संपूर्ण महाराष्ट्रातील देश-विदेशातील तमाम शिवप्रेमी शिवाजी महाराज, संभाजी महाराज, राष्ट्रमाता जिजाऊ यांच्याबद्दल विष ओकणाऱ्या व्यक्तीला अटक करावी म्हणून सातत्याने त्यांनी सोशल मीडिया व इतर माध्यमांवर विषय लावून धरला.''

तसेच ''त्या सगळ्या शिवप्रेमींचे पहिल्यांदा मी आभार मानतो, की त्यांनी खूप चांगल्या पाठिंबा दिला. त्यामुळे शासकीय यंत्रणेवर दबाव आला. पोलिस यंत्रणेने देखील चांगलं काम केलं. एका विकृत व्यक्तीला अटक झालेली आहे, त्याबद्दल समाधान आहे. पण येथून पुढे जाऊन जोपर्यंत अशा व्यक्तीला कायदेशीरित्या शिक्षा होत नाही तोपर्यंत हा लढा सुरूच राहील.’’ असं सावंत म्हणाले.

याशिवाय ‘’सरकारी वकिलांनी खूप चांगल्या पद्धतीने बाजू मांडलेली होती आणि म्हणून त्याचा जामीन नाकारला गेला होता. उच्च न्यायालयात देखील तशीच परिस्थिती होती. जामीन नाकारलं जाणं हे तशा पद्धतीने होणार होतं, असं दिसत होतं. त्यामुळेच कदाचित त्याला महिनाभर वाचवणारी जी यंत्रणा होती, त्यांनी त्याला सल्ला दिला असावा की आता तुझ्याकडे काही पर्याय नाही. म्हणून त्याने अटक करून घेतली असावी.’’ असंही सावंत म्हणाले.

याचबरोबर ‘’खरंतर मोबाईलचे जे तांत्रिक पुरावे आहेत, ते सगळे पोलिसांकडे अगोदरच जमा केलेले आहेत. त्यामुळे यावर चांगल्या पद्धतीने कारवाई होईल, असा मला विश्वास आहे कारण ही लोकशाही आहे. पण जी काही मंडळी त्याला पाठिंबा देत होती, अशा मंडळींचा शोध आता घेतला पाहिजे. तो महिनभार कुठं राहिला, त्याच्या संपर्कात कोण होतं? त्याला का पाठिंबा दिला जात होता, त्याने काय काय हालचाली केल्या? या सगळ्या गोष्टी जनतेसमोर आल्या पाहिजेत असं मला वाटतं.’’ असंही सावंत यांनी सांगितलं.

''एक महिनाभर जर असा चिल्लर माणूस पोलिसांना सापडत नसेल, तर त्याला वाचवणारी एक यंत्रणा कार्यान्वित होती. असं आपण म्हणू शकतो, असा अंदाज लावू शकतो. त्यामुळे त्यांचा शोध घेणं आता तो सापडलं असेल तर कसून  त्याची चौकशी झाली पाहिजे असं मला वाटतं. तसेच ज्यांनी ज्यांनी या व्यक्तीला समर्थन दिलं, पाठिंबा दिला, वाचवण्याचा प्रयत्न केला. त्या सगळ्यांचे चेहरे या महाराष्ट्राच्यासमोर आले पाहिजेत. शिवाजी महाराज, संभाजी महाराज, राजमाता जिजाऊ साहेब यांच्याबाबत विकृत बोलणाऱ्या व्यक्तीला वाचवणारी प्रवृत्ती कोण आहेत, हे महाराष्ट्रसमोर आलं पाहिजे असं मला वाटतं.'' अशी प्रतिक्रिया इंद्रजीत सावंत यांनी प्रशांत कोरकटकरच्या(Prashant Kortkar) दिली.

(२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप)

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT