Indrajit Sawant : धमकी प्रकरण दुसऱ्या वळणाला नेण्याचा प्रयत्न; इंद्रजीत सावंत यांच्याकडून शिवप्रेमींना आवाहन

Nagpur Police Prashant Koratkar Kolhapur historian Indrajit Sawant : छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांबद्दल अपशब्द काढल्यानंतर नागपूरमधील डॉ.प्रशांत कोरटकर यांच्या विरोधात शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट आहे.
Indrajit Sawant 1
Indrajit Sawant 1Sarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News : कोल्हापुरातील इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना धमकी दिल्यानंतर राज्यभरात तीव्र संताप व्यक्त होत आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांबद्दल अपशब्द काढल्यानंतर नागपूरमधील डॉ.प्रशांत कोरटकर याच्याविरोधात शिवप्रेमीकडून संतप्त भावना व्यक्त होत आहेत.

मात्र चुकीचे कॉल रेकॉर्ड हे माझ्या आवाजाचा मॉर्फ करण्यात आला असल्याचा दावा कोरटकर याने केला होता. मात्र नागपूर (Nagpur) पोलिसांनीच या कॉल रेकॉर्डचा सीडीआर काढल्यानंतर कोरटकर यानेच कॉल केल्याचे निष्पन्न झाले आहे. त्याबाबत इंद्रजीत सावंत यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त करत शिवप्रेमींना आवाहन केले आहे.

फोन मोर्फिंग करणं इतकं सोपं नाही, तो फोन मोर्फिंग झाला असता, तर त्याच्याकडूनच झाला असता. स्वतः त्या व्यक्तीने नाव सांगितलं होतं, म्हणून मी माझ्या पोस्टमध्ये त्या व्यक्तीचं नाव लिहिलं आहे. पोलिस (Police) दलाने तपास करून तो नंबर आणि फोन प्रशांत कोरटकर यानेच केला होता. हे सांगितलं असेल, तर पोलिसांनी संभ्रम दूर केला. प्रशांत कोरटकर यानेच फोन केला होता. हे पोलिसांच्या तपासामुळे सिद्ध झाल्याचे इंद्रजीत सावंत यांनी सांगितले.

Indrajit Sawant 1
BJP Suresh Dhas : सत्ता.., पालकमंत्री.., पैसा.., मस्ती अन् दहशत! मंत्री धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलत आमदार धसांनी वाढवल्या अडचणी

दरम्यान कोरटकर याच्या पत्नीने, माझ्या कुटुंब्याला काय झालं, तर त्याला इंद्रजीत सावंत जबाबदार असतील, अशी तक्रार पोलिसात दिली आहे. त्यावर बोलताना इंद्रजीत सावंत यांनी, मी कधीच कुणाला धमकीचा फोन केलेला नाही. त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांना काय झालं, तर त्याला मी कसा काय जबाबदार? माझ्या पोस्टमध्ये सुद्धा मी त्यांचा नंबर दिला नाही. किंवा कुणाला फोन करा म्हणून सांगितलं नाही.

Indrajit Sawant 1
Prashant Koratkar : कोरटकरचे राजकीय कनेक्शन कोणासोबत? भाजपच्या पदाधिकाऱ्यांची अडचण

संबंधित व्यक्ती शिवाजी महाराजांबद्दल संभाजी महाराजांबद्दल काय विचार करते हेच सांगण्याचा माझा प्रयत्न होता. पण लोक त्यांना फोन करत असतील तर त्याचा आणि माझा कुठलाही संबंध नाही. सगळ्यांना आवाहन आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी परस्त्रीचा देखील सन्मान करा, अशी शिकवण दिली आहे. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि जिजाऊंबद्दल देखील शिंतोडे उडवण्याचा प्रयत्न त्या व्यक्तीने केला आहे. प्रशांत कोरटकर याच्या घरातील लोकांनी देखील सांगितलं पाहिजे होते की, हे चुकीचे बोलले आहेत. त्यामुळे हे प्रकरण वेगळीकडे नेण्याची भूमिका जर कुणाचे असेल, तर ते देखील बरोबर नसल्याचे इंद्रजीत सावंत यांनी स्पष्ट केले.

चार ते पाच दिवस झाले पोलिस दल इतक सक्षम असताना तो आरोपी कसा काय सापडत नाही. काल साधारण सहा ते सात तास फॉरेन्सिक टीमने माझ्या मोबाईलमधील जे आवश्यक पुरावे पाहिजे आहेत ते घेतले आहेत. मला कारवाईबाबत कुठल्याही अपडेट पोलिसांकडून मिळत नाहीत. माध्यमांमधून जे अपडेट मिळतात तितकंच मला माहिती आहे. पोलिसांनी मला सुरक्षा घेण्याबाबत सांगितलं होतं. मात्र मी ते नाकारले असल्याचे इंद्रजीत सावंत यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com