MP salary hike : खासदारांना मिळाली घसघशीत पगारवाढ! ; पेन्शन अन् भत्ताही वाढवला

MP pension and allowances increase : जाणून घ्या, आता विद्यमान खासदारांना दर महिन्याला एकूण किती पगार मिळणार?
Parliament News
Parliament NewsSarkarnama
Published on
Updated on

Member of Parliament salary : देशभरातील खासदारांची भरघोस पगारवाढ झाली आहे. एवढंच नाहीतर तर या खासदारांच्या दैनंदिन भत्त्यांमध्येही वाढ झाली आहे. तसेच माजी खासदारांना मिळणाऱ्या पेन्शनमध्येही वाढ होणार आहे. खासदारांना सध्या महिन्याला एक लाख रुपये वेतन मिळते, ज्यामध्ये वाढ होऊन आता ते १ लाख २४ हजार रुपये केले गेले आहे.

याशिवाय खासदारांना मिळणारा दैनिक भत्ता देखील दोन हजार रुपयांवरून वाढवून आता तो अडीच हजार रुपये केला गेला आहे. तर माजी खासदारांची मासिक पेन्शन २५ हजार रुपयांवरून वाढवून ३१ हजार रुपये केली गेली आहे. हे सुधारीत वेतन आणि पेन्शन १ एप्रिल २०२३ पासून लागू असेल. सरकारने यासंबंधी अधिसूचना देखील जारी केली आहे. याआधी खासदारांचे वेतन आणि भत्ते एप्रिल २०१८मध्ये वाढवले गेले होते.

Parliament News
Lok Sabha Election: लोकसभेनंतर 6 पक्ष झाले मालामाल! निधीसंकलनात कोणी मारली बाजी; काँग्रेस कितव्या क्रमांकावर?

संसदीय कार्य मंत्रालयाने म्हटले की, खासदारांचे वेतन, दैनंदिन भत्ते आणि माजी खासदारांच्या पेन्शनमध्ये होणारी ही वाढ १ एप्रिल २०२३पासून लागू असेल. हा बदल संसद सदस्यांच्या वेतन, भत्ते आणि पेन्शन अधिनियम १९५४ द्वारे मिळालेल्या अधिकारांचा वापर करून केला गेला आहे आणि हा१९६१ च्या आयकर कायदामध्ये नमूद केलेल्या खर्च महागाई निर्देशांकावर आधारित आहे.

वेतन, मतदारसंघ आणि कार्यालय भत्ता मिळून विद्यमान खासदारांना आता दर महिन्याला २ लाख ५४ हजार रुपये वेतन मिळेल. याशिवाय संसद(Parliament) सदस्यांना अधिवेशन काळातही दैनिक भत्ता मिळत असतो.

Parliament News
Parliament Session Live : संकटमोचकामुळेच काँग्रेस बॅकफुटवर; संसदेत जोरदार हंगामा, नड्डा, रिजिजू तुटून पडले...

मागील वेळी जेव्हा २०१८मध्ये खासदारांची पगारवाढ झाली होती, तेव्हा खासदारांचा पगार वाढून एक लाख रुपये केला गेला होता. वर्ष २०१८मध्ये माजी अर्थमंत्री अरुण जेटली(Arun Jaitley) यांनी महागाई नुसार प्रत्येक वर्षांत खासदारांच्या पगारात सुधारणा करण्यासाठी एक कायदा प्रस्तावित करण्यात आला होता. भारतात खासदारांना वेतनासोबतच विविध भत्ते आणि सुविधा मिळतात. वेतनाशिवाय खासदारांना मतदारसंघ भत्ता दर महिन्यास ७० हजार रुपये आणि कार्यालयीन भत्ता ६० हजार रुपये मिळतो.

(२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप)

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com