Raju Shetty
Raju Shetty sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Raju Shetti News: शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांऐवजी खोकी, फडतूस अन् काडतुसाचीच चर्चा : राजू शेट्टींची खंत

Umesh Bambare-Patil

-हेमंत पवार

Raju Shetty's Regret: पंधरा, वीस हजार रुपयांसाठी देशामध्ये शेतकरी आत्महत्या Farmer suicide करत आहेत. मात्र राज्यात चर्चा खोक्यांची, फडतुस अन् काडतुसांची सुरु आहे. त्यामुळे बळीराजाचे ज्वलंत प्रश्‍न दुर्लक्षित झाले असुन स्वतःची टिमकी वाजवण्यासाठी वीस का तीस श्री सदस्यांचा जीव घेणार्‍यांना सामान्यांच्या व्यथा, वेदना काय समजणार, अशी खंत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी Raju Shetty यांनी व्यक्त केली.

कऱ्हाड (जि.सातारा) येथील हुतात्मा अपंग बहुउद्देशीय विकास कल्याणकारी संस्थेच्या पुरस्कार वितरण कार्यक्रमानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटेनेचे जिल्हाध्यक्ष देवानंद पाटील उपस्थित होते. खासदार शेट्टी म्हणाले,  मागितल्याशिवाय मिळणार कसं ? आई सुध्दा लेकरू रडत नाही, तोपर्यंत दुध पाजत नाही.

हे तर सरकार आहे. वीस- वीस लोकांचा बळी घेऊन स्वतःच प्रेझेंटेशन करणारे हे सरकार आहे. यांच्याकडून काय अपेक्षा करणार आपण ? स्वतःची टिमकी वाजवण्यासाठी २० ते ३० लोकांचा जीव घेणार्‍या लोकांना सामान्यांच्या व्यथा वेदना काय समजणार ? अक्षरशः पंधरा वीस हजार रुपयांसाठी देशामध्ये शेतकरी आत्महत्या होत आहेत. मात्र राज्यात चर्चा खोक्यांची, फडतुस अन् काडतुसांची चर्चा आहे, ज्वलंत प्रश्‍न मात्र दुर्लक्षित आहे. 

ते म्हणाले, अवकाळी पावसामुळे राज्यात झालेल्या नुकसानीबाबत सरकार ज्या-ज्या उपाय योजना करण्याच्या घोषणा करत आहे त्यावर मी समाधानी नाही. गेली पंधरा दिवस शेतकऱ्यांचा आक्रोश सरकारपर्यंत पोहोचत नाही. दोन दिवसांत नुकसान भरपाई मिळणार असल्याचे सांगूनही प्रत्यक्षात शेतकऱ्याच्या हातात काहीच नाही. सरकारी अधिकाऱ्यांच्या संपामुळे नीट पंचनामे झाले नाहीत. दररोज गारपीट होतेय मात्र सरकार गांभीर्याने घ्यायला तयार नाही. सरकारबद्दल किव वाटायला लागली आहे. ह्यांना शेतकर्‍यांचा काही देणे घेण नाही.

विरोधी पक्षाकडुनही निराशाच

सद्यस्थितीतील राज्यातील राजकीय घडामोडींमध्ये काही तथ्य नसून हा खेळ सावल्यांचा असाच प्रकार आहे. विरोधी पक्ष विरोधी पक्षासारखा वागत नाही. जनतेच्या भावनांशी खेळ चालू आहे. विरोधी पक्ष राज्यातील ज्वलंत प्रश्‍न उचलून धरत नाही. एका बाजूला शेतकर्‍यांचे अवकाळी पाऊस, गारपीठमुळे नुकसान, महागाईने थैमान घातले आहे. मात्र राज्यातील जनतेचे लक्ष इतरत्र वळवण्यासाठी हे नाटक चालले आहे, अशी टिकाही खासदार शेट्टी यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT