Satara ZP: साताऱ्यात जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीवेळी झालेला राडा संपूर्ण महाराष्ट्रभर गाजला होता. झेडपी अध्यक्ष निवडीवेळी भाजप विरुद्ध शिवसेना-राष्ट्रवादी असा टोकाचा संघर्ष पाहायला मिळाला होता. या राड्याचे तीव्र पडसादही अधिवेशनात उमटले होते. यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या मेळाव्याच्या काही तास आधीच साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची सांगलीला बदली करण्यात आली होती. या बदलीला राजकीय वादाची किनार असल्याचंही बोललं जात आहे. पण सातारा एसपी म्हणून वादग्रस्त कारकीर्द राहिलेल्या तुषार दोशींनी बदलीच्या काही तास आधीच आपली मोठी चूक सुधारल्याचं समोर आलं आहे.
राज्याच्या गृह विभागानं सोमवारी(ता.20 एप्रिल) पोलीस दलातील काही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश काढले होते. यात सातारा पोलिस अधिक्षक तुषार दोशी यांच्याही बदलीचा समावेश होता. विशेष म्हणजे सातारा जिल्हा परिषदेतील राड्यानंतर पहिल्यांदाच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची साताऱ्यात जाहीर सभा होत असताना त्याच्या काही तास आधीच तुषार दोशी यांची बदली झाल्यामुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधाण आलं. दोशींच्या जागी आता पुण्याचे पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे हे साताऱ्याचे पोलीस अधीक्षक यांनी पदभार स्वीकारला आहे.
पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची सांगलीला बदली झाली आहे. पण ज्यादिवशी दोशींची बदली झाली, त्याचदिवशी सकाळी त्यांनी सातारा जिल्ह्यातील सहा ते सात अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्याची बाब उघडकीस आली आहे.सातारा जिल्हा पोलीस दलात दोशींनी बदलीआधी काही महत्त्वपूर्ण आणि मोठे फेरबदल केले आहेत.
सातारा झेडपीच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीवेळी शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रशासनासह पोलिसांवरही गंभीर आरोप झाले होते.त्यातच सातारा स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक आणि तपासी अधिकारी अरूण देवकर यांना न्यायालयानं कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. कोठडीत मारहाण केल्याच्या कारणावरून ही नोटीस न्यायालयानं देवकर यांना दिली होती. आता दोशींनी देवकर यांची बदल केल्याचं निदर्शनास आलं आहे.
पोलिस अधिकारी अरुण देवकर यांना पदोन्नती देण्यात आली असून,त्यांची प्रभारी उपअधीक्षक पदी नियुक्ती करण्यात आली आहे.तसेच राजकुमार भुजबळ यांची फलटण ग्रामीण नवे पोलीस निरीक्षक बदली करण्यात आहे.तर फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याचे विद्यमान पोलीस निरीक्षक संदीप जगताप यांच्याकडे सातारा येथे सायबर सेलच्या पोलीस निरीक्षकपदाची मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
सातारा स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षकपदी विश्वजीत घोडके, अरुण देवकर प्रभारी उपअधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.सचिन म्हेत्रे सातारा शहर पोलिस ठाणे, संग्राम शेवाळे शाहुपुरी पोलीस ठाणे या पोलिस अधिकाऱ्यांकडे नवी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. या बदल्यांचे आदेश तत्कालीन सातारा पोलिस अधिक्षक तुषार दोशी यांनी काढले होते.
सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीवेळी साताऱ्यात मोठा राडा झाला होता. निवडणुकीच्या आदल्या रात्री जिल्हा परिषद सदस्य बापू शिंदे यांचा मुलगा विकास शिंदे याने शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती.त्यात वडिलांचं अपहरण करण्यात आले असून,त्यांच्या जिवाला धोका असल्याची तक्रारही दिली होती.
तसेच अनिल देसाई व संदीप मांडवे यांच्यासह काही जणांवर संशय व्यक्त करण्यात आला होता. ही गोष्ट समजल्यानंतर बापू शिंदे यांनी महाबळेश्वर पोलिस ठाण्यात व वाई उपअधीक्षक कार्यालयात जाऊन आपले अपहरण झाले नसल्याचे सांगितलं होतं.
दुसऱ्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेचे सर्व सदस्य वाहनातून एकत्रित जिल्हा परिषदेत आले. यावेळी जिल्हा परिषद इमारतीमध्ये अगोदरच दबा धरून बसलेल्या पोलिसांनी संदीप मांडवे व अनिल देसाई यांना पकडले. तिथून दोघांना महाबळेश्वर पोलिस ठाण्यात नेले होते.
तेथे अटकपूर्व वैद्यकीय तपासणीत प्रकृती बिघडल्याचे समोर आल्याने दोघांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.त्यानंतर त्यांना महाबळेश्वर येथील न्यायालयात हजर करण्यात आले. तेथे त्यांच्या जामीन अर्जावर सुनावणी झाली.सरकारी वकील,दोन्ही सदस्यांचे वकिलांचे व या प्रकरणातील पीडित पक्षाचं म्हणणं न्यायालयानं ऐकून घेतलं होतं.
पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची सांगली येथे बदली झाली आहे. पण ते पुन्हा एकदा अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. कारण ज्या दिवशी साताऱ्यातून बदली झाली, त्याचदिवशी तुषार दोशींनी नियमबाह्य पद्धतीनं जिल्ह्यातील सहा ते सात अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्याचा आरोप करण्यात आला आहे. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख जयवंतराव शेलार यांनी याप्रकऱणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पालिकमंत्री शंभूराज देसाई यांना पत्र लिहित चौकशीची मागणी केली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.