

Home Minister Resign: गृहमंत्री भ्रष्टाचारी आहे, असा आरोप करत जेनझी रस्त्यावर उतरलयानं गृहमंत्र्याला राजीनामा द्यावा लागला आहे. पण हे आरोप फेटाळताना पदापेक्षा नैतिकता मोठी असं या नेत्यानं म्हटलं आहे.
नेपाळचे गृहमंत्री सुदान गुरुंग यांच्यावर राजीनामा देण्याची नामुष्की ओढवली आहे. बुधवारी त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. संपत्तीविषयी झालेल्या गंभीर आरोपांबाबत नैतिक जबाबदारी स्विकारुन तसंच निष्पक्ष चौकशीसाठी आपण पदाचा राजीनामा देत आहोत असं गुरुंग यांनी म्हटलं आहे. फेसबुकवर पोस्ट करत गहमंत्री सुदान गुरुंग यांनी आपली भूमिका स्पष्टे केली आहे.
राजीनामा देताना गृहमंत्री सुदान गुरुंग यांनी सांगितलं की, २६ मार्च २०२६ रोजीपासून गृहमंत्रीपदाचा पदभार खांद्यावर पेलला आहे. नुकतेच या प्रकल्पावर उपस्थित करण्यात आलेले प्रश्न, कमेंट्स आणि सार्वजनिक काळजीबाबत नेपाळच्या सर्वसामान्य जनतेनं प्रश्न उपस्थित केले होते.
पण प्रामाणिकपणा महत्वाचा असून जनतेचा विश्वास हा कार्यालयाचा ताब्यापेक्षा महत्वाचा आहे. माझ्यासाठी नैतिकता ही कोणत्याही पदापेक्षा मोठी आहे. त्यामुळ कुठलीही शक्ती ही जनतेच्या विश्वासापेक्षा मोठी नाही, असंही गुरुंग यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, आजची जेन झींची मोहीम चांगल प्रशासन, पारदर्सकता आणि जबाबदारी यांची मागणी करत आहे. त्यानुसार तुमचं सार्वजनिक जीवन हे स्वच्छ आणि नेतृत्व हे जबाबदार असलं पाहिजे. आपला राजीनामा देताना गुरंग यांनी म्हटलं की, हा राजीनामा मी पारदर्शकता आणि कोणताही हितसंबंधांचा संघर्ष टाळण्यासाठी दिला आहे. तसंच या प्रकरणाच्या सखोल आणि निष्पक्ष चौकशी झाली पाहिजे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.