Rameshwar Masal Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

BJP VS NCP : राष्ट्रवादीचा भाजपला खणखणीत इशारा; ‘आम्हालाही सर्व पर्याय खुले...’

ZP Election 2026 : महापालिका प्रचार सुरू असतानाच जिल्हा परिषद निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे आहे. महायुतीत राष्ट्रवादीने भाजपला सन्मानजनक जागावाटपाचा इशारा देत अन्यथा सर्व पर्याय खुले असल्याचे स्पष्ट केले आहे.

हुकूम मुलाणी

Mangalvedha, 03 January : महापालिका निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात झालेली असतानाच दुसरीकडे ग्रामीण भागात जिल्हा परिषदेच्या निवडणुकीची मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. महायुतीमध्ये सहभागी असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने भाजपला इशारा देताना ‘आगामी जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीत मित्रपक्षांनी आम्हाला सन्मानजनक जागा दिल्या तर ठीक; अन्यथा आम्हाला सर्व पर्याय खुले आहेत, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष रामेश्वर मासाळ यांनी म्हटले आहे.

सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 31 जानेवारीपूर्वी घेण्याचा आदेश दिला आहे, त्यामुळे नगरपालिका निवडणुकीनंतर सध्या राज्यात महापालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. महायुतीचे (Mahayuti) बहुतांश सर्व नेते महापालिका निवडणुकीची मोर्चेबांधणी आणि प्रचारात व्यस्त आहेत.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशामुळे जिल्हा परिषद (Zillha Parishad) आणि पंचायत समितीच्या निवडणुका कोणत्याही क्षणी जाहीर होऊ शकतात, त्या दृष्टीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मंगळवेढा, पंढरपूर आणि सांगोला तीन तालुक्यांचे निवडणूक प्रभारी म्हणून रामेश्वर मासाळ यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यासंदर्भात त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. या वेळी तालुकाध्यक्ष भारत बेदरे उपस्थित होते.

कार्याध्यक्ष मासाळ म्हणाले, आगामी निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संपूर्ण ताकदीने लढवण्याच्या तयारीत आहे. (स्व.) आमदार भारत भालके हे रिडालोस व काँग्रेसचे आमदार असताना मी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा जिल्हाध्यक्ष म्हणून तालुक्यामध्ये पक्षाचे काम एकनिष्ठपणे केले आहे. नगरपालिका निवडणुकीत यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसकडे सत्तास्थाने होती; परंतु यंदाच्या निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे यश मिळालेले नाही.

आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत यश मिळविण्याच्या दृष्टिकोनातून बांधणी करण्यात येणार आहे. येत्या दोन दिवसांत तालुक्यातील पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन भूमिका स्पष्ट केली जाणार आहे. भोसे जिल्हा परिषद गटासह चोखामेळा नगर जिल्हा परिषद गटावर आमचा दावा आहे, त्या संदर्भात आमची मागणी आम्ही मित्र पक्षाकडे करणार आहोत. आम्हाला सन्मानजनक जागा न दिल्यास आमच्यासाठी सर्व पर्याय खुले असणार आहेत.

वेळप्रसंगी भोसे, चोखामेळा नगर, हुलजंती, दामाजी नगर हे जिल्हा परिषद गट पूर्ण ताकदीने लढविण्याच्या दृष्टीने ताकदीचे उमेदवार देखील तयार ठेवले आहेत. त्या संदर्भात सध्या काही विरोधी पक्षाच्या नेत्यांकडून आमच्याकडे संपर्क साधल्याचे त्यांनी या वेळी बोलताना नमूद केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT