Mahayuti dominance: महापालिका निवडणुकीत महायुती मतदानापूर्वीच शतकाच्या जवळ : भाजपचे सर्वाधिक उमेदवार बिनविरोध, शिवसेना मागोमाग, राष्ट्रवादीनेही उघडलं खातं

Maharashtra, 29 municipal corporations election News : एकनाथ शिंदे यांची शिवसेना व अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने दमदार कामगिरी करीत वर्चस्व सिद्ध केले आहे.
BJP Shivsena NCP
BJP Shivsena NCP Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत महायुतीने चांगलीच अगदी घेतली आहे. नुकत्याच झालेल्या नगरपालिका व नगरपंचायतीच्या निवडणुकीत एकीकडे भाजपने 132 नगरपालिकेवर एकहाती सत्ता मिळवली तर त्याखालोखाल एकनाथ शिंदे यांची शिवसेना व अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने दमदार कामगिरी करीत वर्चस्व सिद्ध केले आहे. तर दुसरीकडे राज्यातील 29 महानगरपालिकेच्या निवडणुकीआधीच महायुतीचे 64 नगरसेवक बिनविरोध निवडून आले आहेत. तर विरोधी पक्षाचा केवळ एक नगरसेवक बिनविरोध निवडून आला आहे.

राज्यातील 29 महानगरपालिकांमध्ये एकूण 2 हजार 869 नगरसेवक पदांसाठी ही निवडणूक होत आहे. ही पदे एकूण 893 प्रभागांमध्ये विभागलेली आहेत. यामध्ये मुंबई महापालिकेत सर्वाधिक 227 जागा आहेत, तर पुणे महापालिकेत 165 नगरसेवकांच्या जागा आहेत. राज्यभरातून 2 हजार 869 जागांसाठी तब्बल 33 हजार 606 उमेदवारी अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी जवळपास सात हजार पेक्षा अधिक उमेदवारांनी माघार घेतली आहे. त्यामुळे उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी राज्यभरातून एकूण 65 नगरसेवक बिनविरोध निवडून आले आहेत तर महायुतीचे 64 नगरसेवक तर विरोधी पक्षाचा केवळ एक नगरसेवक बिनविरोध निवडून आला आहे.

BJP Shivsena NCP
BJP Damage Control : '...तर उत्तर भारतीय महापौर असेल', कृपाशंकर सिंहांच्या वक्तव्यानंतर रवींद्र चव्हाणांकडून डॅमेज कंट्रोल, सगळे पत्ते ओपन केले!

महापालिका निवडणुकीआधीच महायुती शतकाजवळ पोहचली आहे. महाराष्ट्राच्या महापालिका निवडणुकीत मतदानाची पहिली फेरी पार पडण्याआधीच महायुतीने विरोधकांना चारीमुंड्या चित केले आहे. राज्यातील विविध महापालिकांमध्ये मिळून महायुतीचे तब्बल 64 उमेदवार बिनविरोध निवडून आले असून, यात भारतीय जनता पक्षाने (BJP) 44 जागांसह सिंहाचा वाटा उचलला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे 18 आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे 2 शिलेदार बिनविरोध विजयी झाले आहेत. या अभूतपूर्व यशामुळे निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यापूर्वीच महायुतीने 'सायकोलॉजिकल' आघाडी घेतली आहे तर विरोधकांच्या गोटात मात्र स्मशानशांतता पसरली आहे.

BJP Shivsena NCP
Eknath Shinde Shivsena : शिवसेनेला हादरा! उमेदवारी नाकारताच माजी नगरसेवकाने ५० वर्षांचा हिशोबच काढला; म्हणाला...

मतदानापूर्वीचे महायुतीने विजयी उमेदवारांचे अर्धशतक केले आहे. कल्याण डोंबिवली, जळगाव, धुळे, पुणे, अहिल्यानगर, पनवेल आदी महापालिकांमध्ये महायुतीचे 64 हून अधिक उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. त्यामध्ये भाजपने मोठी आघाडी घेतली आहे.

महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपली आहे. त्यानंतर कल्याण डोंबिवलीतील चित्र स्पष्ट झाले आहे. भाजपचे तब्बल 15 उमेदवार बिनविरोध विजयी झाले आहेत. तर याच ठिकाणी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे (Shivsena) सहा नगरसेवक बिनविरोध निवडून आले आहेत.

BJP Shivsena NCP
NCP Alliance: दोन्ही राष्ट्रवादीने एकत्र यावं ही आयडिया कोणाची? प्रस्ताव कोणी दिला? सुप्रिया सुळेंनी एका वाक्यात सांगितलं

पनवेल महापालिकेत भाजपचे सात नगरसेवक बिनविरोध निवडून आले आहेत तर ठाणे महापालिका निवडणुकीत शिवसेनेचे तीन नगरसेवक बिनविरोध निवडून आले आहेत तर पुणेमध्ये भाजपचे दोन नगरसेवक, तर पिंपरी चिंचवडमध्ये भाजपचे दोन नगरसेवक निवडून आले आहेत. महायुतीने एकंदरीतच मतदानाआधीच विरोधकांवर मात केली आहे.

BJP Shivsena NCP
Congress-Shivsena UBT Alliance : पुण्यातील काँग्रेस-शिवसेना अन् मनसेच्या सर्व उमेदवारांची यादी... भाजपवर किती भारी?

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com