Fadnavis-Shinde : देवाभाऊंच्या अगोदर एकनाथभाई मारणार सोलापूरचे मैदान; ‘त्या’ स्ट्राईक रेटची रंगली चर्चा!

Solapur Corporation Election 2025 : सोलापूर महापालिका निवडणुकीत भाजप स्वबळावर उतरला असून महायुतीने कडवे आव्हान दिले आहे. प्रचारासाठी एकनाथ शिंदे आधी तर देवेंद्र फडणवीस नंतर सोलापुरात येणार आहेत.
Eknath Shinde-Devendra Fadnavis
Eknath Shinde-Devendra FadnavisSarkarnama
Published on
Updated on

Solapur, 03 January : सोलापूर महापालिकेची निवडणूक भारतीय जनता पक्ष स्वबळावर लढवत असून महायुतीमधील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांना चॅलेंज दिले आहे. भाजप उमेदवाराच्या प्रचारासाठी खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सोलापूरमध्ये येणार आहेत, तर शिवसेना उमेदवारांच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे येणार आहेत. मात्र, देवाभाऊंच्या अगोदर पुन्हा एकदा एकनाथभाई सोलापूरचे मैदान मारणार आहेत.

राज्यात सत्तेवरील असलेले महायुतीमधील भाजप आणि शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस सोलापूर (Solapur) महापालिकेच्या निवडणुकीत एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. किरकोळ जागा देण्याच्या विचारात असलेल्या भाजपला शिवसेनेने जय महाराष्ट्र करत राष्ट्रवादी काँग्रेसने युती केली आहे. दोन्ही पक्षांनी प्रत्येकी ५१ जागा लढविण्याचा निर्णय घेतलेला असतानाही दोन पक्षांनी त्यापेक्षा जास्त उमेदवार रिंगणात उतरविले आहेत.

भारतीय जनता पक्षाच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे येत्या १० जानेवारी सोलापुरात येणार आहेत. याशिवाय प्रदेश पातळीवरील इतर नेतेही प्रचाराला येण्याची शक्यता आहे. भाजपला टशन देण्यासाठी मैदानात उतरलेल्या शिवसेनेच्या उमेदवारांना पाठबळ देण्यासाठी एकनाथ शिंदे हेही सोलापुरात प्रचाराला येणार आहेत. एकनाथ शिंदे हे नऊ जानेवारी रोजी सोलापुरात प्रचारासाठी येणार आहेत. त्यामुळे फडणवीसांच्या अगोदरच एकनाथ शिंदे हे सोलापूरचे मैदान मारून जाणार आहेत.

नगरपालिका निवडणुकीतही सोलापूर जिल्ह्यात अनेक ठिकाणी शिवसेना विरुद्ध भाजप असा सामना झाला होता. त्यात भाजपचे तीन ठिकाणी तर शिवसेनेचेही तीन ठिकाणी नगराध्यक्ष निवडून आले आहेत. त्यावेळीही या दोन्ही नेत्यांच्या सभा झाल्या होत्या. त्यात मुख्यमंत्री फडणवीसांच्या दोन ठिकाणी सभा झाल्या होत्या, त्यातील अक्कलकोट नगरपालिकेत भाजपला यश आले तर सांगोल्यात भाजपच्या पॅनेलचा पराभव झाला होता.

Eknath Shinde-Devendra Fadnavis
ShivSena UBT News : बिनविरोध निवडणुकीत आता तांत्रिक मुद्द्याची चर्चा : दिवंगत आनंद दिघेंच्या पुतण्याचे महत्त्वाच्या मुद्द्यावर बोट

शिवसेनेसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या तीन सभा झाल्या होत्या, त्यातील दोन जागांवर शिवसेनेला यश आले होते, तर एका जागेवर पराभव पत्कारावा लागला. अक्कलकोटमध्ये शिवसेना पराभूत झाली असली तरी दुधनीत दणदणीत विजय मिळविला आहे. मोहोळमध्ये शिंदेंची दुसरा सभा झाली होती, त्या ठिकाणी शिवसेना विजयी झाली होती.

तिसरी सभा माजी आमदार शहाजीबापू पाटील यांच्या सांगोल्यात झाली होती. त्या ठिकाणी शहाजीबापूंच्या नेतृत्वाखालील पॅनेल विजयी झाले आहे, त्यामुळे नगरपालिका निवडणुकीत फडणवीसांपेक्षा शिंदेंचा विजयाचा स्ट्राईक रेट जादा होता.

Eknath Shinde-Devendra Fadnavis
Shivsena Vs BJP : घरातील चौघांनाही निवडूण आणण्यासाठी ठाण्यातील शिवसेना नेत्याची फिल्डिंग : कट्टर विरोधक असलेल्या भाजप आमदाराची घरी जाऊन मनधरणी

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com