Vishal Patil, Vishwajeet Kadam, Jayant Patil  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Jayant Patil Politics : जयंत पाटील 'अ‍ॅक्शन मोड'वर, मिशन सांगली महापालिका; गाठीभेटी सुरू, काँग्रेसवर 'भरसो नाय'?

Jayant Patil Sangli Municipal Election MVA : जयंत पाटील यांनी आगामी महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडी होईल की नाही याची वाट न पाहता कामाला सुरुवात केली आहे. त्यांनी कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेत तयारीला वेग दिला आहे.

Rahul Gadkar

Jayant Patil News : सांगली जिल्ह्यातील नगरपालिका निवडणुकीचे पडसाद आता मिरज-कुपवाड महानगरपालिकेवर उमटताना दिसत आहेत. जिल्ह्यातील नगरपालिकांमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यानंतर आता सांगली-मिरज-कुपवाड महापालिकेमध्ये महाविकास आघाडी एकत्र राहणार की स्वतंत्र लढणार? याबाबत कार्यकर्त्यांना उत्सुकता लागून राहिली आहे.

काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या तलवार म्यानातच ठेवल्या आहेत. मात्र, दुसरीकडे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आमदार जयंत पाटील यांच्याकडून तगड्या जोडण्यांवर भर दिला जात आहे. काँग्रेस एक सोबत येईल ना येईल मात्र जयंत पाटील यांनी सुरुवातीपासूनच महानगरपालिकेच्या जोडण्यांवर भर दिला आहे. निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेत मोर्चे बांधणीला सुरू केली आहे.

नुकत्याच पार पडलेल्या सहा नगरपालिका आणि दोन नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीच्या नेत्यांमधील ऐक्य हवे तसे दिसले नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची नेत्यांची भूमिका पाहिली तर आगामी महानगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीत आघाडी टिकेल का बिघडेल अशी अवस्था आणि चर्चा कार्यकर्त्यांमध्ये होऊ लागले आहे.

महापालिका निवडणुकीची घोषणा कोणत्याही क्षणी होण्याची शक्यता आहे. सांगली जिल्ह्यात भाजपचे वर्चस्व आहे. त्यातच पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आक्रमक धोरण स्वीकारत विरोधकांना पराभूत करण्याची रणनीती आखली आहे. त्यामुळे विरोधकांची एकजुट दिसली नाही तर त्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होईल.

काँग्रेसमध्ये हालचाली दिसेनात...

काँग्रेसमधील खासदार विशाल पाटील, आमदार विश्वजीत कदम, जिल्हाध्यक्ष विक्रमसिंह सावंत यांनी देखील अजून महापालिका निवडणुकीसंदर्भात कोणतीच हालचाल केली नसल्याचे दिसते. काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष पदावर कोण विराजमान होणार? त्यासंदर्भातील निवड कोणाची होणार? या पदासाठी नावावरून एकमत होणार का? यावरूनच काँग्रेसचे घोडे अडले आहे. काँग्रेस मधील या अंतर्गत राजकारणामुळे कार्यकर्त्यांची देखील नाराजी आहे. अंतर्गत प्रश्न सुटत नसल्याने आघाडीवर चर्चा करण्यासच नेत्यांना वेळ नसल्याची टीका होते आहे.

आघाडीची तटबंदी ढासळली...

सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेतील महाविकास आघाडीची तटबंदी ढासळताना दिसत आहे.अशा परिस्थितीत कार्यकर्त्यांची दिवसेंदिवस नाराजी वाढत चालली आहे. पक्ष संघटनेबरोबरच सध्याच्या घडीला महाविकास आघाडी म्हणून महायुतीला टक्कर देण्यासाठी नेत्यांची एकजूट महत्त्वाची आहे. त्यामुळे वरिष्ठ पातळीवर आघाडीचा निर्णय लवकरात लवकर व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त महाविकास आघाडीतील पदाधिकारी करत आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT