Shivraj Patil Defeat Story : ... तर शिवराज पाटील पहिले मराठी पंतप्रधान असते; 'त्या'पराभवाची इनसाईड स्टोरी

Shivraj Patil vs Rupatai Patil Nilangekar : शिवराज पाटील निलंगेकर यांच्या गळ्यात पंतप्रधानपदाची माळ पडली असती. मात्र, 2004 मधील त्यांच्या पराभवाने पंतप्रधानांच्या नावांमधील चर्चेत त्यांचे नाव पिछाडीवर आले.
Shivraj Patil’s missed chance: How he came close to becoming India’s first Marathi Prime Minister in 2004.
Shivraj Patil’s missed chance: How he came close to becoming India’s first Marathi Prime Minister in 2004.sarkarnama
Published on
Updated on

Shivraj Patil News : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील-चाकूरकर यांचे आज (शुक्रवार) निधन झाले. तब्बल सात वेळा लोकसभेला विजय मिळवला. 35 वर्ष पराभूत न होणाऱ्या पाटील यांच्यासाठी 2004 ची निवडणूक ही कालटणी देणारी ठरली. तब्बल 30 हजार मतांनी त्यांना लातूर लोकसभा मतदारसंघात भाजपच्या रुपाताई निलंगेकर पाटील यांच्याकडून पराभवाचा धक्का सहन करावा लागला.

शिवराज पाटील पराभूत झाले तरी देखील त्यांच्यावर सोनिय गांधी यांचा विश्वास कमी झाला नाही. पराभूत झालेल्या उमेदवाराला त्यांनी चक्क देशाचे गृहमंत्रिपद दिले. पाटील यांनी मनमोहन सिंग यांच्या सरकारमध्ये गृहमंत्रिपदाची शपथ घेतली. पराभूत होऊनही गृहमंत्रिपद मिळवणारा हा नेता जर विजयी झाला असता तर निश्चितपणे त्यालाच पंतप्रधानपद मिळाले असते, अशी चर्चा होती. त्यामुळेच या पराभवाने त्यांना पंतप्रधानपद मिळू शकले नसल्याचे सांगितले जाते.

शिवराज पाटील हे आठव्यांदा देखील सहज विजयी होतील, असा अंदाज होता. मात्र, सलग सात वेळा निवडून आल्यामुळे त्यांच्या विरोधात अँटी इन्कंबंसी होती. त्यातच काँग्रेस कार्यकर्त्यांनी अतिआत्मविश्वास देखील धोकादायक ठरला.

तब्बल सात वेळा विजयी होणारे शिवराज पाटील हे आठव्यांदा देखील सहज विजयी होतील, असा अंदाज होता. मात्र, सलग सात वेळा निवडून आल्यामुळे त्यांच्या विरोधात अँटी इन्कंबंसी होती. त्यातच काँग्रेस कार्यकर्त्यांनी अतिआत्मविश्वास देखील धोकादायक ठरला. विशेष म्हणजे विरोधी आघाडीने एकजुट होत भाजपने रुपाताई चाकूरकर यांना उमेदवारी दिली.

Shivraj Patil’s missed chance: How he came close to becoming India’s first Marathi Prime Minister in 2004.
Shivraj Patil: राजकीय टीका अन् पाठीमागे विरोध करणे चाकूरकरांना जमलेच नाही..

रुपाताई यांचे माहेर माहेर उमरगा तालुक्यातील मुळज तर सासर लातूरमधील निलंगा. शिवराज पाटील हे बाकी विधानसभा मतदारसंघात पिछाडीवर राहिले तरी त्यांना उमरगा विधानसभा मतदारसंघात भरघोस आघाडी मिळाची या आघाडीवर त्यांनी अनेक विरोधकांचा लोकसभेला पराभव केला. मात्र 2004 ला हे चित्र बदलले.

2004 ला उमरगा-लोहारा तालुक्यात विकास आघाडी अस्तित्वात होती. त्या आघाडीत शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपचा समावेश होता. काँग्रेसविरुद्ध हे तिन्ही पक्ष एकवटलेले होते. आणि उमरगा तालुक्यातील रूपाताई यांचे माहेर असल्यामुळं चाकूरकर यांना तेथे मतांची आघाडी मिळाली नाही. माहेरवासींना उमरगाकरांनी भरभरून मतं दिली आणि तेच त्यांच्या पराभवचा मुख्य कारण ठरले.

निलंगा हे रूपाताईंचं सासर तेथे देखील शिवाजी पाटील चाकूरकरांना आघाडी मिळाली नाही. त्यामुळे राजकीय कारकिर्दित आलेला एकमेव पराभव हा चाकूरकरांच्या जिव्हारी लागला होता. 2004 मध्ये विजयी झाले असते तर ते पंतप्रधानपदाची माळ त्यांच्या गळ्यात पडली असती. कारण सोनिया गांधींचा त्यांच्यावर इतका विश्वास होती की ते पराभूत होऊनही त्यांना गृहमंत्रिपद मिळाले आणि राज्यसभेतून खासदार झाले.

'ती' खंत कायम मनात...

पराभूत होऊन गृहमंत्री मिळाले मात्र पराभवाची खंत शिवाजीराव पाटील यांच्या मनात नेहमीच होती. त्यांनी ही खंत जाहीरपणे बोलूनही दाखवले. एका जाहीर कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले होते. कायकर्त्यांनी दाखवलेल्या फाजील आत्मविश्वासामुळे माझा पराभव झाला.

Shivraj Patil’s missed chance: How he came close to becoming India’s first Marathi Prime Minister in 2004.
Ganesh Naik leopard plan controversy : बिबट्यांसाठी शेळ्या जंगलात सोडणार, हा तर भ्रष्टाचाराचा मार्ग; वनमंत्र्यांच्या योजनेवर थोरातांचा गंभीर सवाल

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com