Jayant Patil  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Jayant Patil News : महायुतीतील डझनभर नेते शरद पवार गटात येणार; जयंत पाटलांशी काय झाला करार?

Sunil Balasaheb Dhumal

Madha Political News : भाजप नेते उत्तम जानकरांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ऑफर धुडकवत थेट महाविकास आघाडीचे माढ्यातील उमेदवार धैर्यशील मोहिते पाटलांना जाहीर सभा घेत पाठिंबा दिला. शरद पवार गटाच्या उमदेवराला पाठिंबा देताना मात्र आपण अजित पवारांचा राष्ट्रावादी पक्ष सोडणार नसल्याचेही जानकरांनी यावेळी स्पष्ट केले. बारामतीत सुनेत्रा पवारांचा पराभव करूनच पक्ष सोडणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. हाच धागा पकडत शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी महायुतीतील अनेक मोठे नेते याच अटीवर तिकडे असल्याचा गौप्यस्फोट केला आहे.

जयंत पाटील Jayant Patil म्हणाले, जानकरांना न्यायला विमान पाठवले होते, ते मात्र प्रलोभनांना बळी पडले नाहीत. आपल्या पक्षात राहून जानकर विरोधकांचे म्हणजे आपले काम करणार आहेत. त्यांची काही कामे अडली असतील, त्या त्यांनी पूर्ण करावीत आणि आपल्याकडे यावे. जानकरांप्रमाणेच माझे 10-12 बडे नेते महायुतीत अडकले आहेत. त्यांना नाईलाजास्तव तेथे राहावे लागत आहेत. ते फक्त लोकसभा निवडणूक होण्याची वाट पाहातात. एकदा का निवडणूक झाली की ते आपल्या पक्षात येणार आहेत, असा त्यांच्योसोबत माझा करार झाला आहे, असा दावा जयंत पाटलांनी केला.

जानकरांना आमदारकीचे आश्वासन

भाजप सोडणार असल्याचे दिसताच आमच्या अडचणी वाढण्याचे काम सुरू झाले आहे. मला जातीच्या दाखलाबाबत धमकी दिली गेली. न्यायव्यवस्था आमच्या ताब्यात असल्याचे सांगून तुमचा जातीचा दाखला बाद करणार असल्याचे सांगितले जाते, असा आरोप जानकरांनी केला. यावर मात्र काहीही झाले तरी तुमची उमेदवारी फिक्स असल्याचा शब्दच जयंत पाटलांनी जानकारंना Uttam Jankar दिला. पाटील म्हणाले, जानकरांना माझा शब्द आहे की ते आमदार होणार आहेत. जर त्यांच्या जातीच्या दाखल्याबाबत काही दगाफटका झाला तर विधान परिषदेवर त्यांना पाठवले जाईल, अशी ग्वाहीच जयंत पाटलांनी वेळापूरकरांना दिली आहे.

सात खासदार तर 60 आमदार जिंकणार

लोकसभा निवडणुकीत शरद पवार Sharad Pawar गटाचे 10 उमेदवार रिंगणात आहेत. त्यातील सात खासदारांचा विजय होणार असल्याचा विश्वास जयंत पाटलांनी व्यक्त केला. तसेच लोकसभा झाल्यानंतर महायुतीत अडकलेले 10 -12 मोठे नेते शरदचंद्र पवार पक्षात येणार आहेत. त्यांच्यासोबत माझा करार झाला आहे. यातून विधानसभा निवडणुकीत आपल्या पक्षाचे किमान 60 आमदार निवडून येतील, असा दावाही पाटलांनी आताच केला आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT