Chhatrapati Sambhajinagar Constituency : संभाजीनगर मे कमल नहीं खिलेगा; बाण लक्ष्य भेदणार की मशाल पेटणार ?

Sandipan Bhumre भाजपने दोन पावलं मागे घेत संभाजीनगरची जागा मोठ्या जड अंतकरणाने शिवसेना शिंदे गटाला सोडली. गेल्या महिनाभरापासून सुरू असलेल्या उमेदवारीच्या चर्चेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संदीपान भुमरे यांच्या नावाची घोषणा करत पडदा टाकला.
Amit Shah, Eknath Shinde, Sandipan Bhumre
Amit Shah, Eknath Shinde, Sandipan Bhumresarkarnama

Chhatrapati Sambhajinagar News : मेरे संभाजीनगर वालो, इस बार मोदीजी को यहा से कमल चूनकर भेजोंगे क्या? असा सवाल देशाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी संभाजीनगरच्या सभेत केला होता. एमआयएम को उखाड के फेकना है, और कमल खिलाना है, अशा शब्दांत शाह यांनी भाजप कार्यकर्त्यांमध्ये जोश भरला होता. पण, आता संभाजीनगर मे कमल नहीं खिलेगा, हे स्पष्ट झाले आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी छत्रपती संभाजीनगरच्या जागेवर कुठल्याही परिस्थीत तडजोड करणार नाही, असा बाणा दाखवला. अखेर भाजपने दोन पावलं मागे घेत संभाजीनगरची जागा मोठ्या जड अंतकरणाने शिवसेना शिंदे गटाला सोडली. गेल्या महिनाभरापासून सुरू असलेल्या उमेदवारीच्या चर्चेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संदीपान भुमरे यांच्या नावाची घोषणा करत पडदा टाकला. आता संभाजीनगरात शिवसेनेचा धनुष्यबाण विजयाचा अचूक वेध घेणार? की ठाकरे गटाचे उमेदवार विजयाची मशाल पेटवणार? याकडे सगळ्या राज्याचे लक्ष असणार आहे.

शिवसेनेला जागा सुटली तर संदीपान भुमरे हे उमेदवार असतील, याचे संकेत गेल्या काही दिवसांपासून मिळत होते. भाजपची तीव्र नाराजी पाहता शिंदे गटाने भुमरेंची उमेदवारी जाहीर करायला ठरवून वेळ लावला. आता भुमरेंच्या नावाची अधिकृत घोषणा झाल्यानंतर महायुतीतील भाजप, राष्ट्रवादी व इतर घटक पक्ष ही जागा निवडून आणण्यासाठी किती ताकद लावतात यावरच निकाल अवलंबून असणार आहे.

Amit Shah, Eknath Shinde, Sandipan Bhumre
Chhatrapati Sambhajinagar : संभाजीनगरात शिंदे सेनेचे आस्ते कदम.. महायुतीतील अंतर्गत नाराजीमुळे थेट अर्जच दाखल करणार...

संदीपान भुमरे यांची उमेदवारी राज्यात सरकारने लागू केलेले दहा टक्के मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आली आहे. आरक्षणाचे श्रेय घेण्यासाठीच मुख्यमंत्र्यांनी संभाजीनगरात मराठा उमेदवार म्हणून भुमरेंच्या नावाला पसंती दिली. चर्चेत अनेक नावे असली तरी भुमरे यांचे शिवसेनेतील योगदान, विजयातील सातत्य, दांडगा जनसंपर्क मंत्री म्हणून शेतकऱ्यांसाठी घेतलेले निर्णय या सगळ्या गोष्टींचा विचार करण्यात आला.

त्यामुळे विनोद पाटील, राजेंद्र जंजाळ यांच्या नावाची चर्चा केवळ उमेदवारीसाठी स्पर्धा आहे हे दाखवण्यासाठीच पुढे होते हे स्पष्ट झाले. भुमरे हे कट्टर शिवसैनिक आहेत, शिवाय ठाकरे गटाचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांच्यासोबत 25-30 वर्षे राजकारण केल्यामुळे भुमरे यांना त्यांच्या रणनीतीचाही अभ्यास आहे. त्यामुळे महायुतीच्या ताकदीच्या जोरावर ते महाविकास आघाडीला टक्कर देऊ शकतील, या विश्वासाने मुख्यमंत्र्यांनी सुरुवातीपासून भुमरे यांच्या नावाला पसंती दर्शवली होती. भुमरे यांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर आता संभाजीनगरात तिरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे.

Amit Shah, Eknath Shinde, Sandipan Bhumre
Eknath Shinde News : 'आजचे शक्तिप्रदर्शन हा तर ट्रेलर, आता पिक्चर...'; CM शिंदेंनी दिली उदयनराजेंच्या विजयाची गॅरंटी!

जालन्याची परतफेड दानवे संभाजीनगरात करणार...

पैठणचे आमदार आणि राज्याचे रोजगार हमी योजना मंत्री संदीपान भुमरे यांचा राजकीय प्रवास मोठा रंजक असा आहे. पैठणच्याच संत एकनाथ साखर कारखान्यात स्लीप बाॅय म्हणून काम करणारे भुमरे पुढे राजकारणात आले आणि त्याच कारखान्याचे चेअरमन होऊन त्या खुर्चीत बसले होते. पाचोडचे सरपंच, कारखान्याचे चेअरमन आणि पैठण विधानसभा मतदारसंघातून सहा वेळा निवडणूक लढवून पाच विजय त्यांच्या नावावर आहेत.

Amit Shah, Eknath Shinde, Sandipan Bhumre
Sandipan Bhumre : छत्रपती संभाजीनगरचा महायुतीतील तिढा अखेर सुटला; संदीपान भुमरेंना उमेदवारी जाहीर

पाचोड ग्रामपंचायतीपासून सुरू झालेला भुमरे यांचा राजकीय प्रवास पुढे सभापती, कारखान्याचे चेअरमन आणि मग पैठण मतदारसंघातून शिवसेनेची उमेदवारी असा झाला. एक-दोन नव्हे तर पाच वेळा पैठणच्या जनतेने त्यांच्या कपाळी विजयाचा गुलाल लावला. राज्यात 2019 मध्ये राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी आणि काॅंग्रेस या तीन पक्षांचे महाविकास आघाडी सरकार आले. मंत्रिपदासाठी रस्सीखेच असताना मुख्यमंत्री झालेल्या उद्धव ठाकरे यांनी भुमरे यांच्या एकनिष्ठेचे फळ म्हणून त्यांना थेट कॅबिनेट मंत्री केले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Amit Shah, Eknath Shinde, Sandipan Bhumre
Chhatrapati Sambhaji Nagar Constituency : खैरे राजकारणातून रिटायर्ड होणार; पण नेमकं कधी ?

या मंत्रिपदाचा किस्सा सांगताना मी राज्यमंत्री करा म्हटलो होतो, पण उद्धवसाहेबांनी मला कॅबिनेट मंत्री केले, अशी कबुली स्वतः भुमरे यांनी दिली. पाच वेळा आमदार, दोनदा मंत्री केलेल्या भुमरे यांचे चिरंजीव विलास भुमरे यांना जिल्हा परिषदेत बांधकाम सभापती आणि आता विधानसभेची उमेदवारी असे नियोजन सुरू आहे.

दरम्यान, भुमरे यांचा पैठण विधानसभा मतदारसंघ जालना लोकसभा मतदारसंघात येतो, त्यामळे त्यांना संभाजीनगर लोकसभेची निवडणूक जड जाईल, असे बोलले जाते. यावर केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना जालना लोकसभेसाठी भुमरेंची पूर्ण मदत आणि त्याबदल्यात दानवे याची परतफेड म्हणून भुमरेंना संभाजीनगरात मदत करणार असल्याचे बोलले जाते.

Edited By : Umesh Bambare

R

Amit Shah, Eknath Shinde, Sandipan Bhumre
Raosaheb Danve News : रावसाहेब दानवेंच्या हाती रथाचे सारथ्य, घोड्यावरून...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com