Solapur News : लोकसभा निवडणुकांसाठी राजकीय प्रचारसंभांचा धडाका सुरु आहे. नेत्यांच्या प्रचार दणक्यात सुरु आहे. तर राजकीय आरोप प्रत्यारोपानांनी धार येत आहे. भाजपने चारसौ पारचा नारा दिला आहे. तर विरोधकांकडून भाजपच्या या नाऱ्याची खिल्ली उडवली जात आहे. शेतकरी कामगार पक्षाचे नेते व आमदार जयंत पाटील यांना भाजपला दोनशी तरी पार करुन दाखवा, असे म्हणत डिवचले आहे. (Latest Marathi News)
जयंत पाटील आज अकलूजमध्ये बोलत होते. ते म्हणाले, "राजकीय चित्र महाराष्ट्रात नाही तर संपूर्ण देशभरात बदलणार आहे. पण महाराष्ट्रात दिवसेंदिवस शरद पवार (Sharad Pawar) आणि उद्धव ठाकरे यांचे प्रभाव दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. मी आधीच सांगितलं होतं की चित्र बदलत जाईल, आणि हे चित्र मोठ्या प्रमाणात बदलेल असं वाटतं. चारशे पारच्या गप्पा मारणाऱ्यांनी दोनशे तरी पार करा अन् राज्यात 45 चा आकडा म्हणतात पण आम्ही म्हणतो 25 चा आकडा तरी पार करु द्या," असा आमदार जयंत पाटील यांनी काढला.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
"खरंतर माढा लोकसभेवर आम्ही दावा केला होता. पण राज्याचा विचार करताना मोहिते पाटलांची महाराष्ट्रात जी ताकद आहे, त्याचा परिणाम मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी होईल. याचा फायदा महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीला होईल, असं मला वाटतं. जर सोलापूरात बदल झाला तर महाराष्ट्रात बदल होतो," असेही जयंत पाटील (Jayant Patil) म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.