Madha Lok Sabha Constituency : 'माढा' नाही सोप्पा ; भाजपची प्रतिष्ठा पणाला!

loksabha Election 2024 News : ...त्यामुळे 'तुतारी' हाती घेतली म्हणजे निवडणूक जिंकलो या भ्रमात धैर्यशील यांनी राहू नये.
 ranjitsingh naik nimbalkar dhairyasheel mohite patil
ranjitsingh naik nimbalkar dhairyasheel mohite patilsarkarnama

Ranjitsingh Naik vs Nimbalkar Dhairyasheel Mohite patil : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षाची 'तुतारी' हाती घेतली म्हणजे तुतारीची हवा अन् मोहिते-पाटलांच्या कार्यकर्त्यांचा थवा, या जोरावर आपण माढा लोकसभा मतदारसंघ सहज जिंकू या भ्रमात धैर्यशील मोहिते-पाटलांनी यांनी राहू नये. कारण, इतिहासाची पाने चाळली असता माढा मतदारसंघ सोप्पा नाही हे प्रकर्षाने समोर येते आहे. त्यातच भाजपने विशेषत: आमदार जयकुमार गोरे यांच्यासाठी ही प्रतिष्ठेची लढाई असल्याने ते विजयी पताका कायम ठेवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतील.

माढा मतदारसंघ अस्तित्वात आल्यानंतर शरद पवार(Sharad Pawar) हे तीन लाखांपेक्षा जास्त मताधिक्याने या मतदारसंघाचे पहिले खासदार बनले. मात्र 2014 साली विजयसिंह मोहिते-पाटील यांना फक्त 25 हजार इतक्या मतांच्या निसटत्या विजयावर समाधान मानावे लागले. तर सत्ता परिवर्तन करणाऱ्या भाजपच्या रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांचे मताधिक्य सुध्दा लाखाच्या आत म्हणजेच 85 हजार इतके राहिले. त्यामुळे इथे काट्याची लढत होते हा इतिहास आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

 ranjitsingh naik nimbalkar dhairyasheel mohite patil
Pawar PC In Akluj : मोहिते पाटलांच्या राष्ट्रवादी प्रवेशाचा संदेश राज्यभरात जाईल; शरद पवारांचे सूचक विधान

या मतदारसंघात पुन्हा एकदा रणजितसिंह नाईक-निंबाळकर आपले नशीब आजमावत आहेत. त्यांची संपूर्ण भिस्त मागील वेळेचे किंगमेकर आमदार जयकुमार गोरे यांच्यावर आहे. त्यातच मतदारसंघात पाच आमदार त्यांच्यासोबत आहेत, तसेच सहावे आमदार महायुतीत आहेत. यासोबतच नवीन बेरजा सुरु आहेत. महत्वाचे म्हणजे केंद्र व राज्यातील सरकारचे मोठे पाठबळ पाठिशी आहे.

दुसरीकडे धैर्यशील मोहिते-पाटील यांना नव्याने सर्व गणितं जुळवावी लागणार आहेत. सत्ताधारी भाजप सर्वोतोपरी त्यांना कोंडीत पकडण्याचा, नामोहरम करण्याचा प्रयत्न करणार यात शंका नाही. विरोधात असलेले आमदार व राष्ट्रवादीत पडलेली फूट अडचणीत आणणारी आहे. भाजपने प्रचारात आघाडी घेतली असून राष्ट्रवादीच्या प्रचाराला अजून सुरुवात व्हायची आहे.

मतदारसंघनिहाय विचार करता फलटण, माढा व माणमध्ये रणजितसिंह नाईक-निंबाळकर(Ranjitsingh Naik) आघाडी घेवू शकतात. करमाळा व सांगोल्यात तगडी लढत होवू शकते. तर माळशिरस मध्ये धैर्यशील मोहिते-पाटील मताधिक्य घेतील. धैर्यशील यांना माळशिरस मध्ये किती मताधिक्य मिळणार हे उत्तम जानकर यांच्या भूमिकेवर अवलंबून आहे. उत्तम जानकर यांची भूमिका अजूनही सुस्पष्ट नाही. ते विरोधात गेले तर मताधिक्यात मोठा फरक पडेल. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत त्यांना सोबत घेणे हे धैर्यशील यांच्यासाठी गरजेचे आहे.

 ranjitsingh naik nimbalkar dhairyasheel mohite patil
Madha Loksabha News: मोहिते पाटलांना उमेदवारी,राष्ट्रवादीत नाराजीचा भडका; अभयसिंह जगताप बंडाच्या तयारीत

संपूर्ण माढा मतदारसंघ सर्वात जास्त ज्यांनी पिंजून काढला ते अभयसिंह जगताप बंडाचे निशाण फडकविण्याच्या तयारीत आहे. स्वतः माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ञ असल्याने मतदारसंघातील कुणाकडेही नसेल एवढी सुक्ष्म व अद्ययावत माहिती त्यांनी गोळा केलेली आहे. यासोबतच त्यांनी बऱ्याचजणांना रसद पुरवून गोळाबेरीज करुन ठेवली आहे. तसेच मागील सहा महिन्यात अनेकांच्या सुख-दु:खात सहभागी होवून जीवाभावची माणसं जोडली आहेत. त्यामुळे त्यांना नाराज करणे मोहिते-पाटील यांना परवडणारे नाही. कारण माढ्यात जय-पराजयातील अंतर निश्चित करण्याएवढी मते अभयसिंह जगताप यांच्याकडे आहेत.

त्यामुळे तुतारी हाती घेतली म्हणजे निवडणूक जिंकलो या भ्रमात धैर्यशील यांनी राहू नये. कारण इथे पुन्हा एकदा कमळ फुलविण्यासाठी किंगमेकरच्या भूमिकेत असलेले जयकुमार गोरे हे जीवाचे रान करतील यात शंका नाही.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com