Jayant Patil-Dhairsheel Mohite Patil Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Mohite Patil Group Meeting : मोहिते पाटलांच्या ‘शिवरत्न’वर जयंत पाटलांची हजेरी; मोठा निर्णय होणार...

Loksabha Election 2024 : माढा लोकसभा मतदारसंघात सांगोला विधानसभा मतदारसंघ येतो. सांगोल्यात माजी आमदार गणपतराव देशमुख यांचे नातू बाबासाहेब देशमुख यांनी गणपतआबांच्या मृत्यनंतरही वर्चस्व राखले आहे. त्यामुळे मोहिते पाटील यांनी ही निवडणूक लढवली नाही तर शेतकरी कामगार पक्षाला ही जागा सोडून त्यांना पाठबळ देण्याचा विचारही होऊ शकतो.

Vijaykumar Dudhale

Solapur News : माढा लोकसभा मतदारसंघाच्या अनुंषगाने अकलूजमध्ये जोरदार हालचाली सुरू आहेत. मोहिते पाटील यांनी बोलावलेल्या बैठकीला शेतकरी कामगार पक्षाचे नेते आमदार जयंत पाटील हे सांगोल्याचे डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्यासह उपस्थित आहेत. त्यामुळे मोहिते पाटील हे माढ्याच्या रणांगणांतून पुन्हा शड्डू ठोकणार का, याची उत्सुकता आहे.

माढा लोकसभा मतदारसंघातून भाजपने उमेदवारीसाठी डावलण्यात आल्यानंतर मोहिते पाटील हे गेली चार ते पाच दिवस शांत होते. मात्र, आज त्यांनी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचे निवासस्थान असलेल्या शिवरत्न बंगल्यावर राज्यातील महत्वपूर्ण नेत्यांची बैठक बोलावली आहे. या बैठकीला फलटणचे रामराजे नाईक निंबाळकर यांच्यासह महत्वपूर्ण नेते उपस्थित आहेत. विशेष म्हणजे शेकापचे जयंत पाटील यांची हजेरी विशेष ठरत आहे. जयंत पाटील यांचे स्वागत खुद्द धैर्यशील मोहिते पाटील यांनी वाकून नमस्कार करत केले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

शिवरत्नवर सध्या माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, धैर्यशील मोहिते पाटील (Dhairsheel Mohite Patil), विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर त्यांचे बंधू संजीवराजे नाईक, निंबाळकर रघुनाथराजे नाईक निंबाळकर, सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई, शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील, आमदार दीपक चव्हाण, माजी आमदार नारायण पाटील, माजी आमदार जयवंतराव जगताप, सांगोल्याचे शेकाप नेते डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या उपस्थितीत ही बैठक सुरू आहे. या बैठकीत काय निर्णय होतो, याकडे संपूर्ण सोलापूर आणि सातारा जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

माढा लोकसभा मतदारसंघात सांगोला विधानसभा मतदारसंघ येतो. सांगोल्यात माजी आमदार गणपतराव देशमुख यांचे नातू बाबासाहेब देशमुख यांनी गणपतआबांच्या मृत्यनंतरही वर्चस्व राखले आहे. त्यामुळे मोहिते पाटील यांनी ही निवडणूक लढवली नाही तर शेतकरी कामगार पक्षाला ही जागा सोडून त्यांना पाठबळ देण्याचा विचारही होऊ शकतो, त्या अनुषंगानेच मोहिते पाटील यांनी शिवरत्नवर बोलावलेल्या बैठकीला जयंत पाटील यांनी हजेरी लावली असावी, अशी चर्चा रंगली आहे.

दरम्यान, मोहिते पाटील (Mohite Patil) हे आज दुपारी चार वाजता अकलूजमधील शिवशंकर बाजार येथे कार्यकर्त्यांशी संवादही साधणार आहेत. धैर्यशील मोहिते पाटील यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून (NCP) लोकसभेची निवडणूक लढवावी, असा कार्यकर्त्यांचा प्रचंड दबाव मोहिते पाटील यांच्यावर आहे. मात्र, खुद्द मोहिते पाटील यांनी अद्यापही चकार शब्द काढलेला नाही. आज नेतेमंडळींच्या बैठकीत हा निर्णय होणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT