Ramraje Naik Nimbalkar
Ramraje Naik NimbalkarSarkarnama

Mohite Patil News : अकलूजमध्ये राजकीय घडामोडींना वेग; रामराजेंसह बडे नेते ‘शिवरत्न’वर दाखल, मोहिते पाटील कार्यकर्त्यांशी संवाद साधणार

Madha Lok Sabha Constituency : मोहिते पाटील यांचे बहुतांश सर्व निर्णय हे शिवरत्न बंगल्यावर होतात. मात्र, आजची कार्यकर्त्यांची बैठक ही शिवरत्न बंगल्यावर होणार नाही. ती बैठक अकलूजमधील शिवशंकर बाजार या ठिकाणी होणार आहे. यामध्ये धैर्यशील मोहिते पाटील आपली भूमिका मांडणार आहेत.
Published on

Solapur News : माढा लोकसभा मतदारसंघातून खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना भारतीय जनता पक्षाने पुन्हा उमेदवारी दिल्याने अकलूजचे मोहिते पाटील कमालीचे नाराज झाले आहेत. तिकिट जाहीर झाल्यापासून शांत असलेल्या मोहिते पाटील हे आज दुपारी अकलूजमध्ये कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. तत्पूर्वी शिवरत्नवर डिनर डिप्लोमसी होणार असून त्यासाठी विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे निंबाळकर, संजीवराजे निंबाळकर हे अकलूजमध्ये दाखल झाले आहेत. कार्यकर्त्यांशी संवाद साधल्यानंतर मोहिते पाटील गटाची लोकसभेसंदर्भात भूमिका ठरणार आहे. त्यामुळे अकलूजकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

माढ्यातून डावलण्यात आल्यानंतर मोहिते पाटील (Mohite Patil) हे शांत आहेत. मात्र, कार्यकर्ते उघडपणे आपली भूमिका मांडत आहेत. ते मोहिते पाटील यांनी लोकसभेची निवडणूक लढवावी, यासाठी आग्रही आहेत. आपला माणूस खासदार झाला पाहिजे, अशी कार्यकर्त्यांची भूमिका आहे. कार्यकर्त्यांच्या नाराजीला वाट मोकळी करून देण्यासाठी मोहिते पाटील यांनी आज दुपारी चारच्या सुमारास अकलूजमध्ये (Akluj) कार्यकर्त्यांशी संवाद आयाेजित केला आहे.

Ramraje Naik Nimbalkar
Sangli Lok Sabha Constituency : सांगलीचा तिढा सुटेना... काँग्रेस-शिवसेनेचा दावा कायम!

दरम्यान, अकलूजमध्ये मोजक्या मान्यवरांनाही बोलविण्यात आल्याची चर्चा आहे. त्यात सातारा जिल्ह्यातून विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर, संजीवराजे निंबाळकर, रघुनाथराजे निंबाळकर हे शिवरत्नवर दाखल झाले आहेत. याशिवाय सोलापूर जिल्ह्यातील माजी आमदार आणि महत्वाच्या नेत्यांना या बैठकीचे निमंत्रण आहे. त्यात पुढील वाटचालीसंदर्भात विचारविनिमय होणार आहे. त्यामुळे नेतेमंडळीची बैठक आणि कार्यकर्त्यांचा मेळावा याकडे सोलापूरचे लक्ष असणार आहे.

मोहिते पाटील यांचे बहुतांश सर्व निर्णय हे शिवरत्न बंगल्यावर होतात. मात्र, आजची कार्यकर्त्यांची बैठक ही शिवरत्न बंगल्यावर होणार नाही. ती बैठक अकलूजमधील शिवशंकर बाजार या ठिकाणी होणार आहे. यामध्ये धैर्यशील मोहिते पाटील आपली भूमिका मांडणार आहेत. त्यांची भूमिका काय असणार हे महत्वाचे आहे. कारण, बहुतांश कार्यकर्त्यांचा माढ्यातून निवडणूक लढविण्याचा आग्रह आहे.

Ramraje Naik Nimbalkar
Amshya Padvi News: ठाकरेंचा आणखी एक आमदार फुटला; आमश्या पाडवी शिंदे गटात..

धैर्यशील मोहिते पाटील यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून लोकसभेची निवडणूक लढवावी, असा कार्यकर्त्यांचा प्रचंड दबाव मोहिते पाटील यांच्यावर आहे. मात्र, खुद्द मोहिते पाटील यांनी अद्यापही चकार शब्द काढलेला नाही.

भाजपचे नेते तथा राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनीही मोहिते पाटील यांची नाराजी दोन-पाच दिवस राहील, त्यानंतर ते निंबाळकर यांचे काम करतील, असा विश्वास व्यक्त केला होता. मी आणि देवेंद्र फडणवीस विजयदादा आणि रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या संपर्कात आहोत, असेही नमूद केले होते, त्यामुळे मोहिते पाटील यांची नाराजी खरंच दूर होणार की लोकसभेच्या आखाड्यात उतरणार, याकडे संपूर्ण माढा लोकसभा मतदारसंघाचे लक्ष असणार आहे.

Ramraje Naik Nimbalkar
Praniti Shinde News: मोदींचा फोटो असताना मी कशासाठी घेऊ कोरोना व्हॅक्सिन? काँग्रेस आमदाराचा अजब दावा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com