पुणे जिल्ह्यातील खरपुडी गावात आंतरजातीय प्रेमविवाह केल्यानंतर एका दाम्पत्यावर हल्ला झाला आहे.
या प्रकरणात संबंधित तरुणीचं तिच्या नातेवाईकांनी अपहरण केल्याची माहिती समोर आली आहे.
सैराट चित्रपटातील प्रसंगांसारखी ही घटना समाजात भीती आणि संताप निर्माण करणारी ठरत आहे.
Sangli News : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांनी अखेर प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. राजीनाम्यावर अखेर पडदा पडला. त्यानंतर त्यांच्या राजकीय पटलावर नव्या वाटचालीविषयी तर्क-वितर्कांना सुरूवात झाली. तसेच पुन्हा एकदा भाजप प्रवेशाच्या चर्चांना उधान आले होते. दरम्यान राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोनदा यावर स्पष्टीकरण देत आम्ही जयंत पाटील यांच्या प्रवेशाचा सध्या विचार करत नसल्याचे म्हटले होते. त्यानंतर संतापलेल्या जयंत पाटील यांनी थेट मुख्यमंत्र्यांनाच खडे बोल सुनावले आहेत. त्यांनी, 'पक्षात घ्यायला तुमच्याकडे अर्जच कोणी केलाय?' असा सवाल करताना आता राज्याकडे लक्ष द्या असाही सल्ला दिला आहे. (Jayant Patil resigns as state NCP president and denies BJP entry speculations with sharp response to CM Devendra Fadnavis)
भाजपने काँग्रेसपाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला मोठा धक्का देत माजी मंत्री अण्णासाहेब डांगे यांच्यासह त्यांच्या दोन्ही मुलांचा आणि कार्यकर्त्यांचा मुंबईत प्रवेश घडवून आला. हा प्रवेश जयंत पाटील यांच्यासाठी धक्का मानला जात आहे. अशातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जयंत पाटील यांच्या प्रवेशावरून छेडण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी, ‘तुम्हाला जो प्रवेश अपेक्षित आहे, तो आमच्या मनात सध्या तरी नाही’, असे सूचक विधान केले होते.
यावर जयंत पाटील यांनी माध्यमांसमोर आधीच प्रतिक्रिया दिली होती. त्यांनी विरोधकांवर थेट हल्लाबोल करताना, ज्यांना सोबत थांबायचे आहेत ते थांबतील बाकीचे जातील. पण ‘थोडं थांबा आणि बघा पुढे काय होतंय’, असा इशाराच त्यांनी पक्ष फोडणाऱ्यांसह जाणाऱ्यांना दिला होता. यानंतर आता पुन्हा एकदा त्यांनी फडणवीस यांच्या त्या प्रतिक्रियेवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
जयंत पाटील यांनी, भाजप पक्षात प्रवेश करायला मुळात मुख्यमंत्र्यांकडे अर्जच कोणी केला आहे? हे तुम्ही त्यांनाच विचारा. आता महायुतीचे 238 आमदार झाले आहेत. त्यामुळे पक्षप्रवेशावर जास्त लक्ष न देता, जरा राज्याकडे लक्ष द्या. ते चालवण्याकडे लक्ष द्या, असा सल्लाही जयंत पाटील यांनी यावेळी दिला आहे.
ते म्हणाले, आता सत्ता असेल तिकडे जाण्याची प्रथाच पडली आहे. सत्तेतील तिन्ही पक्ष त्यासाठी गळ टाकूनच बसले आहेत. सांगली जिल्ह्यामध्ये बरेच मोठे नेते आहेत, मी एकटाच नाही. त्यामुळे नेमके कोणते नेते भाजपमध्ये जाणार, हे तुम्हीच मुख्यमंत्र्यांना विचारा. मात्र मी काही त्यांच्याकडे अर्ज केलेला नाही. सध्या राज्यासमोर बरेच प्रश्न असून सरकारकडून अनेक चुका होत आहेत. राज्य व्यवस्थित चालवले, तर त्यांचा पक्ष आणखीन मोठा होईल.
1. खरपुडी गावातील आंतरजातीय विवाह प्रकरणात काय घडलं?
प्रेमविवाह केलेल्या दाम्पत्यावर हल्ला झाला असून, संबंधित तरुणीचं तिच्या नातेवाईकांनी अपहरण केलं आहे.
2. ही घटना कोणत्या गावात घडली आहे?
ही घटना पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील खरपुडी या गावात घडली आहे.
3. पोलिसांकडून काय कारवाई करण्यात आली आहे?
प्राथमिक चौकशी सुरू असून, अपहरण व मारहाणीच्या गुन्ह्यांची नोंद घेण्यात आली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.