Jayant Patil : माणिकराव कोकाटेंचे खाते बदलले, जयंत पाटलांकडून थेट देवेंद्र फडणवीस टार्गेट, म्हणाले, 'लोकांना आक्षेपार्ह...'

Jayant Patil Criticized Devendra Fadnavis Manikrao Kokate : माणिकराव कोकाटे यांच्याकडून कृषिमंत्रीपद काढून घेण्यात आले. मात्र, त्यांना मंत्रिमंडळातून निरोप न देता क्रिडा खात्याची जबाबदारी सोपवण्यात आली. त्यावरून जयंत पाटलांनी मुख्यमंत्र्यांना टार्गेट केले आहे.
Devendra Fadnavis, Jayant Patil
Devendra Fadnavis, Jayant PatilSarkarnama
Published on
Updated on

Jayant Patil News : विधीमंडळात मोबाईलवर पत्ते खेळतानाचा कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने खळबळ निर्माण झाली होती. माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घ्यावी, अशी मागणी विरोधकांकडून करण्यात येत आहे. त्यात एका पत्रकार परिषदेमध्ये 'सरकार भिकारी' आहे असे वक्तव्य केल्याने कोकाटेंची गच्छंती निश्चित मानली जात होती. मागील दोन दिवसांपासून तशा जोरदार चर्चा होत्या. मात्र, माणिकराव कोकाटे यांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर त्यांना अभय मिळणार असल्याचे स्पष्ट झाले होते.

माणिकराव कोकाटे यांच्याकडून कृषिमंत्रीपद काढून घेण्यात आले. मात्र, त्यांना मंत्रिमंडळातून निरोप न देता क्रिडा खात्याची जबाबदारी सोपवण्यात आली. तर, क्रिडा खात्याचे मंत्री दत्तात्रय भरणे यांना कृषिमंत्रीपद देण्यात आले. राजीनामा न घेता कोकाटेंना दुसरे खाते दिल्याने विरोधकांकडून सरकारवर टीक करण्यात येत आहे. त्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जयंत पाटील यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर प्रहार केला आहे.

'साम टिव्ही'शी बोलताना जयंत पाटील म्हणाले, 'मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांनी ज्या चुका केल्या त्या मान्य आहे, असे मुख्यमंत्र्यांनी यातून महाराष्ट्रातील लोकांना सांगितले आहे. कोण कुठल्या खात्याचा मंत्री याला फार महत्त्व नसतं. पण लोकांना आक्षेपार्ह वाटेल अशा गोष्टी माननीय मुख्यमंत्री यांनी करणं म्हणजे याचा अर्थ त्यांना या गोष्टी मान्य केल्या आहेत.'

Devendra Fadnavis, Jayant Patil
चहुबाजूंनी चेपवलेल्या भास्कर जाधवांची पुन्हा उसळी : कोकणात ठाकरेंच्या पक्षात नवा उत्साह

आमचे लक्ष राहील...

रोहित पवार यांनी देखील कोकाटे यांचा राजीनामा न घेता त्यांचे खाते बदलावर म्हटले आहे की, कोणत्याही खात्यात गलथान कारभार होऊन सर्वसामान्यांना फटका बसत असेल तर संपूर्ण सरकार त्यासाठी जबाबदार असते, त्यामुळे खातेबदल केला म्हणजे आपण सुटलो असा गैरसमज नेतृत्वाने करून घेऊ नये. आमचे सर्वच खात्यावर लक्ष राहते आणि राहणार आहे. कोणत्याही मंत्र्यांचा असंवेदनशीलपणा महाराष्ट्र खपवून घेणार नाही, त्यामुळे सर्वच मंत्री जबाबदारीने वागतील, ही अपेक्षा!

Devendra Fadnavis, Jayant Patil
Shivaji Sawant : तानाजी सावंतांचे बंधू शिवाजी सावंतांनी शिवसेनेतील पदाचा तडकाफडकी राजीनामा का दिला? ही असू शकतात प्रमुख कारणे....

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com