Sangram Singh Patil nominated by NCP to challenge Shiv Sena district chief Anandrao Pawar in Sangli. Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Jayant Patil : जयंत पाटलांवर डाव उलटणार? शिंदेंचा शिलेदार आयात उमेदवाराचा 'गेम' करण्याच्या तयारीत

Shivsena District Chief to Reverse the Move : शिवसेना जिल्हाप्रमुख आयत उमेदवाराचा डाव उधळून जयंत पाटलांवरचा खेळ उलटवणार. महायुतीने पाटील यांच्या विरोधात तगडी आघाडी देऊन आव्हान उभे केले आहे.

Rahul Gadkar

Jayant Patil News : सांगली जिल्ह्यातील उरण ईश्वरपूर नगरपालिका निवडणुकीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांच्या अस्तित्वाची लढाई म्हणून या निवडणुकीकडे पहिले जाते. जयंत पाटील यांना पराभव करण्यासाठी उरण ईश्वरपुरमधील सर्वच राजकीय गट एकत्र आले आहेत. तर महायुतीने पाटील यांच्या विरोधात तगडी आघाडी देऊन आव्हान उभे केले आहे.

सतत अर्धवट विकास कामांच्या मुद्द्यांवरून महायुतीने घेरून जयंत पाटील यांचा पाडाव करण्याची रणनिती विकास आघाडी म्हणजेच महायुतीकडून आखण्यात आले आहे. या अगोदर उरण ईश्वरपूर नगरपालिका निवडणुकीत चर्चेत असताना आणखीन एका उमेदवारांवरून आणि सुप्त संघर्षावरून ही निवडणूक चर्चेत आली आहे.

राष्ट्रवादीचे नेते आणि जयंत पाटील आणि शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आनंदराव पवार यांच्यातील संघर्ष आता वाढण्याची चिन्हे आहेत. गत सालच्या निवडणुकीत उरण ईश्वरपूर नगरपालिकेमध्ये शिवसेनेच्या पाच नगरसेवकांनी एन्ट्री केली होती. मात्र महाविकास आघाडी सरकारच्या काळात जयंत पाटील यांनी नगरपालिकेसह तालुक्याच्या राजकारणात कोंडी निर्माण केली होती. जिल्हाप्रमुख आनंदराव पवार यांना देखील कोंडीत पकडण्याची खेळी जयंतराव पाटील यांनी केली होती. जयंत पाटील यांनी केलेला राजकारणाचा समाचार तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत गाजवला होता.

आता महायुतीमध्ये आनंदराव पवार यांना उरण ईश्वरपूर नगरपालिकेमध्ये उमेदवारी मिळाली आहे. त्यांच्या प्रभागात आनंदराव पवार यांचे जाळे भक्कम आहे. विविध विकास कामांमुळे आणि अडचणीला धावून जाणाऱ्या पवार यांना मानणारा वेगळा मतदार वर्ग आहे. त्यामुळे विरोधकांवर दबाव गट निर्माण झाला आहे. अशातच जयवंतराव पाटील यांनी आनंदराव पवारच यांच्यावर फासा टाकण्याचा प्रयत्न केला आहे.

सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी अध्यक्ष दिलीप पाटील यांचे चिरंजीव संग्राम सिंह पाटील यांना आनंदराव पवार यांच्या विरोधात उमेदवारी दिली आहे. दिलीप पाटील हे मुळचे वाळव्याचे असून ते ईश्वरपूरमध्ये स्थायिक झाले आहेत. त्यामुळे ज्या त्या परिसरापुरते मर्यादित असलेल्या संग्रामसिंह पाटील यांना आनंदराव पवार यांच्या विरोधात उमेदवारी देऊन त्यांना तगडे आव्हान देण्याचा प्रयत्न केला आहे.

मात्र पवार यांचा बुरुज ढासळण्याची ताकद पाटील गटामध्ये फारशी दिसत नाही. शिवाय महायुतीने आनंदराव पवार यांच्या बाजूने ताकद लावल्याने पवार यांचा बुरुज अधिक भक्कम झाला आहे. त्यामुळे उरण ईश्वरपुर मधील या प्रभागातील लढत अधिक चर्चेत असणार आहे हे नक्की.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT