जयंत पाटील
जयंत पाटील  sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

जयंत पाटलांनी व्यासपीठावरच घेतली जिल्हाध्यक्ष व तालुकाध्यक्षांच्या कामाची परीक्षा

शांताराम काळे

अकोले ( अहमदनगर ) : अहमदनगर जिल्ह्यात विधान परिषद जिल्हा परिषद पंचायत समिती स्थानिक स्वराज्य संस्था आदींच्या निवडणुका जवळ आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील अहमदनगर जिल्ह्याच्या दोन दिवसीय दौऱ्यावर आले होते. जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी जयंत पाटील यांनी राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रा केली. Jayant Patil took the examination of the work of district president and taluka president on the platform

या यात्रेत त्यांनी अकोले येथे एक सभा घेतली. अकोले तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच दोन गट पडले आहेत. ही दुही भरून काढण्यासाठी जयंत पाटील यांचा हा दौरा महत्त्वाचा ठरणार आहेत.

अकोल्यात त्यांनी काल रात्री राष्ट्रवादी कार्यकर्त्यांची सभा घेतली या सभेत त्यांनी पक्षाचे बुथ काम खरोखरच चांगले चालले आहे का? याची खात्री करण्यासाठी व्यासपीठावरून एका कार्यकर्त्याला फोन केला. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

नियोजित वेळेपेक्षा सभा उशिराच सुरू झाली. मात्र कार्यकर्त्यांत उत्साहाचे वातावरण होते. जयंत पाटील यांच्या बरोबर राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, आमदार डॉ. किरण लहामटे, ज्येष्ठ नेते अशोक भांगरे, जिल्हा कार्याध्यक्ष संदीप वर्पे आदी उपस्थित होते. सभा रात्री दहा वाजेच्या सुमारास सुरू झाली. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष व तालुकाध्यक्षांनी बुथ कमिट्याचे सदस्य नोंदणी झाली आहे. काम चांगले सुरू असल्याचे सांगितले.

यावर जयंत पाटील भाषण करण्यासाठी उभे राहिले. त्यांनी बुथ कमिटी सदस्यांची यादी हाती घेतील. त्यातील एका सदस्याला व्यासपीठावरूनच फोन लावला.

जयंत पाटील म्हणाले, हॅलो! जयंत पाटील बोलतो.

समोरून : बोलाना साहेब

जयंत पाटील : तुम्ही प्रकाश मेंगाळ का?

प्रकाश मेंगाळ : हो मी प्रकाश मेंगाळच

जयंत पाटील : तुम्ही देवठाणचे का?

प्रकाश मेंगाळे : नाही. मी मेहंदुरीचा

जयंत पाटील : बरोबर! गट देवठाण गाव मेहंदुरी. बुथ क्रमांक 84 वर तुम्ही काम करताना

प्रकाश मेंगाळे : हो.

यावर जयंत पाटील यांनी व्हेरिगुड! म्हणत. समाधान व्यक्त केले. जयंत पाटील यांनी अचानक घेतलेल्या या परीक्षेत जिल्हाध्यक्ष व तालुकाध्यक्ष पास झाले.

जयंत पाटील यांनी घेतलेल्या या परीक्षेची चर्चा आज राज्यभर होत आहे. या परीक्षेत त्यांनी जिल्हा परिषद गटाचे काम योग्य होत आहे का? याचीही पडताळणी केली. यात त्यामुळे आगामी जिल्हा परिषद व पंचायत समित्या निवडणुका हे राष्ट्रवादीचे पहिले लक्ष्य राहणार हे आता स्पष्ट झाले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला नंबर एकचा पक्ष बनवण्याची जयंत पाटील यांची संकल्पना आहे. हे स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी पाटील अहोरात्र मेहनत घेत आहेत. आम्हाला प्रदेशाध्यक्षांवर संपूर्ण विश्वास आहे. ते नक्कीच राष्ट्रवादीला नंबरचा पक्ष बनवतील.

- अशोक भांगरे, ज्येष्ठ नेते, राष्ट्रवादी काँग्रेस, अकोले, जि. अहमदनगर

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT