Jaykumar Gore-Dilip Mane Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Solapur Politic's : माजी आमदार दिलीप मानेंकडील स्नेहभोजनाबाबत गोरेंचे मोठे विधान; ‘स्थानिक भाजप नेत्यांची परवानगी...’

Jaykumar Gore Meet Congress Leader Dilip Mane : सोलापूरच्या दौऱ्यावर आलेले पालकमंत्री गोरे यांनी काँग्रेस नेते दिलीप माने यांच्या घरी स्नेहभोजन घेतले. माने हे भाजप नेते सुभाष देशमुख यांचे राजकीय विरोधक आहेत, त्यामुळे पालकमंत्र्यांनी माने यांच्याकडे घेतलेल्या स्नेहभोजनाची सोलापूरमध्ये चर्चा रंगली होती. त्याबाबत गोरे यांनी स्पष्टीकरण दिले.

Vijaykumar Dudhale

Solapur, 03 April : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकांबाबत मला जास्तीची माहिती नाही. माझ्या प्रत्येक दौऱ्यात मी भाजपच्या आमदारांच्या घरी जेवण करतो. मात्र, आज काँग्रेस नेते दिलीप माने यांच्या घरी जेवण करतोय. ते माझे मित्र म्हणून मी माझ्या स्थानिक नेतृत्वाची परवानगी घेऊन त्यांच्या घरी स्नेहभोजनाला जात आहे. मात्र, या भेटीवरून राजकीय गणितं मांडणं किंवा तसा कयास मांडणं मला योग्य वाटत नाही, असे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी स्पष्ट केले.

सोलापूरच्या दौऱ्यावर आलेले पालकमंत्री गोरे यांनी काँग्रेस नेते दिलीप माने (Dilip Mane) यांच्या घरी स्नेहभोजन घेतले. माने हे भाजप नेते सुभाष देशमुख यांचे राजकीय विरोधक आहेत, त्यामुळे पालकमंत्र्यांनी माने यांच्याकडे घेतलेल्या स्नेहभोजनाची सोलापूरमध्ये चर्चा रंगली होती. त्याबाबत गोरे यांनी स्पष्टीकरण दिले.

जयकुमार गोरे (Jaykumar Gore)म्हणाले, संघटनेच्या कार्यकर्त्यांना मदत करणं आणि जिथे गरज भासेल तिथे ती मदत करणे यासाठी आजची बैठक होती. सरकार महायुतीचे आहे. मात्र, जिल्हाभरात भाजपची ताकद आणखी वाढली पाहिजे. यासाठी ही बैठक होती.

काँग्रेसचे नेते दिलीप माने यांच्या घरी माझे स्नेहभोजन आहे. मात्र, त्यामध्ये राजकारणाचा विषय नाही. आम्ही दोघेही 2009 मध्ये आमदार होतो. ते माझे मित्र म्हणून मी माझ्या स्थानिक नेतृत्वाची परवानगी घेऊन त्यांच्या घरी स्नेहभोजनाला गेलो. त्यामध्ये कोणताही राजकीय विषय किंवा राजकीय चर्चा झालेली नाही, असेही गोरे यांनी स्पष्ट केले.

पालकमंत्री गोरे म्हणाले, काँग्रेसला संपूर्ण देशातील जनता कंटाळलेली आहे. त्या जनतेला सोबत घेऊन त्यांची सेवा करण्याचे काम भाजपने करत आहे. तीच इथेही होईल, त्याबद्दल काळजी करू नका. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक बिनविरोध करण्यासंदर्भात गोरे म्हणाले, बाजार समितीच्या निवडणुकांबाबत मला जास्तीची माहिती नाही. माझ्या प्रत्येक दौऱ्यात मी भाजपच्या आमदारांच्या घरी जेवण करतो. मात्र, आज काँग्रेस नेते दिलीप माने यांच्या घरी जेवण केले मात्र, या भेटीवरून राजकीय गणितं मांडणं किंवा तसा कयास काढणं, मला योग्य वाटत नाही.

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक हे स्थानीक नेतृत्व लढवतं असतं, पक्षाच्या चिन्हावर ही निवडणूक होत नाही. त्या त्या समीकरणांप्रमाणे स्थानिक नेतृत्व निर्णय घेईल, जिथे पक्षाला माझी गरज लागेल, तिथे मी सोबत असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

राज्यसभेत वक्फ बोर्ड सुधारणा विधेयक मंजूर होईल

गोरे म्हणाले, वक्फ बोर्डाच्या अनुषंगाने सामान्य माणसांच्या अडचणी होत्या. ज्या पद्धतीने काही मनमानी गोष्टी होत होत्या, त्याला आळा घालणे आणि देशात लोकशाही मजबूत करणे यासाठी कायद्याची आवश्यकता होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाहा यांचे मनापासून आभार मानतो. लोकसभेत हा कायदा मंजूर झालाय राज्यसभेतही होईल आणि सामान्य जनतेला अपेक्षित आहे ते होईल.

कोणावरही अन्याय होणार नाही

अल्पसंख्याकांच्या मनातली भीती कमी करण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘सौगात ए मोदी कीट’च्या माध्यमातून केले आहे. अल्पसंख्याकांच्या मनात वक्फ बोर्डाबाबत जी भीती होती, ती कमी करण्याचे काम त्यांनी केले. कोणावरही अन्याय होणार नाही, त्यामुळे त्याची चिंता करू नका. जो कायदा आहे, तो सामान्य नागरिकांसाठी वापरला जाईल, असेही गोरे यांनी स्पष्ट केले.

विमानसेवेची गुड न्यूज लवकरच

गोरे म्हणाले, सोलापूर विमानसेवेचे काम अंतिम टप्प्यात आहे. विमानसेवेबाबतची ‘गुड न्यूज’ लवकरच आपल्याला देण्यात येईल. त्याबाबत चर्चा झाली आहे. अंतिम टप्प्यात असलेले हे काम आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT