Rohit Pawar News : मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर ज्या महिलेने आरोपी केले होते ती महिलेला खंडणी प्रकरणात अटक करण्यात आली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्री जयकुमार गोरे यांची बदनामी जाणीवपूर्वक कट रचून करण्यात आली. गोरे यांच्या बदनामीचे व्हिडिओ तयार केल्यानंतर ते राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार, प्रभाकर देशमुख यांना पाठवण्यात आले असल्याचे म्हटले होते.
देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्यानंतर रोहित पवार यांनी देखील या आरोपाला उत्तर देताना ट्विट करत सांगितले होते की, संबंधित मंत्र्याच्या विरोधात गैरव्यवहाराचे पुरावेच विधीमंडळात सादर केले आणि यावर निष्पक्ष चौकशी होऊन कारवाई करण्याची मागणी सभागृहाच्या माध्यमातून सरकारकडं केली. मात्र, आता रोहित पवार यांनी खंडणी प्रकरणात धक्कादायक दावा करत तपास अधिकाऱ्यावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
रोहित पवारांनी ट्विट करत म्हटले आहे की, 'एका भ्रष्ट मंत्र्याला वाचवण्यासाठी यंत्रणा कशी घरगड्यासारखी राबते, याचे उत्तम उदाहरण म्हणजे मंत्री जयकुमार गोरे यांचे प्रकरण. हे प्रकरण समोर आणणारे पत्रकार तुषार खरातांवर वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे गुन्हे नोंदवायचे, अटक करायची, एका गुन्ह्यात जामीन मिळताच दुसऱ्या गुन्ह्यात अटक करायची, जेणेकरून पत्रकार एक दोन महिने आतच सडला पाहिजे आणि त्याचे मानसिक खच्चीकरण झाले पाहिजे, हा या सरकारचा कारभार आहे का?'
रोहित पवारांनी आपल्या ट्विटमध्ये पुढे म्हटले आहे की, 'पीडित महिलेच्या वकिलाला हाताशी धरून तिलाच खंडणीच्या गुन्ह्यात फसवायचे. एका गुन्ह्यात न्यायालयीन कोठडी मिळताच तिचे नाव दुसऱ्या गुन्ह्यात वर्ग करून पोलीस कस्टडी घ्यायची. तिचा भावनिक आणि मानसिक छळ करायचा, ही सरकारची नवी कार्यपद्धती आहे का?'
राजकीय नावे घेण्यासाठी आता तर पत्रकार आणि पीडित महिलेवर दबाव टाकला जात असून या दोघांना स्वतःच्या हस्ताक्षरात मंत्री सांगतील ती नावे लिहून देण्यासाठी मकोका लावण्याच्या धमक्या दिल्या जात आल्याची चर्चा आहे, ही आहे सरकारची कार्यपद्धती आणि नवा पॅटर्न.'
रोहित पवारांनी यांनी आपल्या ट्विटमध्ये विशेष तपास अधिकारी अरुण देवकर मंत्र्यांचा अत्यंत जवळचा मित्र असून त्याच्या विरुद्ध पोलिस विभागाने पीटा कायद्यात (अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध कायदा) गुन्हा दाखल करत त्यांना अटकही केली होती. भ्रष्ट मंत्र्याला वाचवण्यासाठी सरकार अजून किती कुटाणे करणार? पोलिसांवर, यंत्रणेवर दबाव आणून काळे कारनामे लपवता येणार नाहीत. कितीही काथ्याकुट करा, आम्ही सत्य समोर आणूच!, असे म्हटले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.