jaykumar gore-shambhuraj desai Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Shambhuraj VS Gore : जयकुमार गोरे मोठे अन्‌ दिग्गज मंत्री, त्यांच्यावर बोलताना भीती वाटते : शंभूराज देसाईंचा खोचक टोला

Satara Zilla Parishad : सातारा जिल्हा परिषद अध्यक्षपदावरून भाजप व शिवसेनेत वाद तीव्र. जयकुमार गोरे यांच्या दाव्यानंतर शंभूराज देसाईंचा खोचक टोला. महायुतीतील तणावामुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापले आहे.

सरकारनामा ब्यूरो

Satara, 22 February : सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदावरून महायुतीमधील शिवसेना आणि भारतीय जतना पक्षात जोरदार वाक्‌युद्ध रंगले आहे. विशेषतः ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी सातारा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष हा भाजपचाच होईल, असे ठणकावून सांगितले. तसेच, पालकमंत्रिपदावरूनही प्रचाराराच्या काळात विधानं झाली होती. त्यावरून शिवसेनेचे मंत्री शंभूराज देसाई यांनी गोरेंना खोचक टोला लगावला आहे. गोरे आमच्यापेक्षा दिग्गज मंत्री आहेत, त्यांच्या वक्तव्यावर बोलताना आम्हाला भीती वाटते, असा टोला त्यांनी लगावला.

सातारा (Satara) जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत भाजपने सर्वाधिक २७ जागा जिंकल्या आहेत, त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने २०, तर शिवसेनेने १५ जागा जिंकल्या आहेत. काँग्रेस, स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि अपक्ष या तिघांनी प्रत्येकी एक जागा जिंकली आहे. भाजपने ही निवडणूक स्वबळावर लढवली होती. पण शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्रित निवडणूक लढवली होती. त्यामुळे हे दोन्ही पक्ष सत्ता स्थापन करतील, अशी चर्चा होती.

शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र येण्याची शक्यता वर्तविण्यात येत असतानाच जयकुमार गोरेंनी सातारा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष हा भाजपचाच (BJP) होणार, अशी घोषणा केली. त्यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस सावध झाले असून त्यांनी आपल्या सदस्यांना अज्ञातस्थळी हलवले आहे. त्यानंतरही वेगवान घडामोडी घडत आहेत.

प्रचाराच्या काळातही भाजप आणि शिवसेनेच्या मंत्र्यांमध्ये जोरदार भाषणबाजी झाली होती. त्यात शंभूराज देसाई यांना भाजपकडून टार्गेट करण्यात आले होते. त्यावेळी शांत असणारे शंभूराज यांनी आता भाजपवर तोफ डागायला सुरुवात केली आहे. भाजपचा अध्यक्ष होणार, या गोरेंच्या विधानाचा समाचार घेताना मंत्री देसाई म्हणाले, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे हे आमच्यापेक्षा मोठे आणि दिग्गज मंत्री आहेत. त्यांच्या वक्तव्यावर बोलताना आम्हाला कसं बोलावं, याची भीती वाटते. म्हणून आम्ही त्यांच्यावर बोलत नाही.

आम्ही एखादं छोटं वाक्य जरी बोललो तरी लगेच त्यांच्याकडून दुसरा पालकमंत्री नेमला जातो. असा खोचक टोलाही मंत्री शंभूराज देसाई यांनी मंत्री गोरे यांना लगावला. ‘तुम्ही दुसरा ग्रामविकास मंत्री नेमू शकता,’ असा पत्रकारांनी विचारताच ‘मला तो अधिकार नाही. त्यांना जसे पालकमंत्री नेमण्याचे अधिकार आहेत, तसे मला नाहीत ना’ असा टोमणाही देसाई यांनी गोरे यांनी लगावला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT