Solapur, 12 May : पालकमंत्री जयकुमार गोरे हे सोमवारी (ता. 11 मे) सोलापूर दौऱ्यावर होते. या दौऱ्यात त्यांनी विविध विभागाच्या आढावा बैठका घेतल्या. जिल्हा नियोजन समिती सदस्य नियुक्तीच्या अगोदर होणाऱ्या या दौऱ्याला जिल्ह्यातील आमदार आणि महायुतीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे दोन आमदार पालकमंत्र्यांच्या बैठकीला उपस्थित नव्हते. पण गोरे यांनी या दोघांना बैठकीला बोलावून घेत त्यांच्याशीही चर्चा केली. त्याची जिल्ह्यात चर्चा रंगली आहे.
पालकमंत्री जयकुमार गोरे (Jaykumar Gore) यांनी खरीप आढावा, पाणंद रस्ते तसेच, संत सावता महाराज आणि बसवेश्वर स्मारक आढावा बैठका घेतल्या. जिल्हा नियोजन समितीच्या नियुक्त्या आगामी बैठकीत होण्याची शक्यता आहे. त्यामुळे डीपीसीवर संधी मिळावी, यासाठी महायुतीच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी मोर्चेबांधणी केली आहे, त्यामुळे गोरेंच्या दौऱ्यात आमदार आणि पदाधिकाऱ्यांची गर्दी दिसून आली.
गोरे यांनी बैठक संपल्यानंतर नियोजन भवनातील ॲंटी चेंबरमध्ये उपस्थित आमदारांशी चर्चा केली. या चर्चेवेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माढ्याचे आमदार अभिजीत पाटील (Abhijeet Patil) आणि माळशिरसरचे आमदार उत्तम जानकर हे त्या बैठकीला उपस्थित नव्हते. ते बाहेर होते.
पालकमंत्री गोरे यांनी निरोप पाठवून दोघांना ॲंटी चेंबरमध्ये बोलावून घेतले. तेही इतर आमदारांसोबत चर्चेत सहभागी झाले होते. गोरे आणि आमदारांमध्ये हास्यविनोद, चेष्टा मस्करी रंगली होती. मात्र, गोरे यांनी विरोधी पक्षाचे आमदार पाटील आणि जानकर यांनाही चर्चेसाठी बोलावून घेत त्यांच्याशी संवाद साधला.
नगरपालिका, जिल्हा परिषद निवडणुकीत आमदार अभिजीत पाटील, उत्तम जानकर आणि पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यात जोरदार वाक्युद्ध रंगले होते. दोन्ही बाजूंकडून टोकाची टीका झाली होती. मात्र, निवडणूक संपल्यानंतर गोरे यांनी आपल्यावर कडवट टीका करणाऱ्या दोन्ही आमदारांशी संवाद साधल्याचे दिसून आले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.