Satara ZP Election: साताऱ्यात 8 दिवसांतच दुसऱ्या 'ऑपरेशन लोटस'ची तयारी : शंभुराज-मकरंदआबांची पुन्हा शिवेंद्रराजे-जयकुमार गोरेंसोबत गाठ

Satara ZP Election : अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीनंतर साताऱ्यात आता 'ऑपरेशन लोटस'चा दुसरा टप्पा सुरू झाला आहे. सभापती आणि उपसभापती पदांसाठी भाजप पुन्हा एकदा फोडाफोडीचे राजकारण करण्याची दाट शक्यता आहे.
Makrand Patil-Shambhuraj Desai-Jaykumar Gore-Shivendraraje Bhosale
Makrand Patil-Shambhuraj Desai-Jaykumar Gore-Shivendraraje BhosaleSarkarnama
Published on
Updated on

Satara ZP Election : सातारा जिल्हा परिषदेत अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडणुकीत भाजपने बाजी मारली. बहुमत असलेल्या शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेसचे 5 सदस्य फोडून मंत्री शिवेंद्रराजे भोसले आणि मंत्री जयकुमार गोरे यांनी ऑपरेशन लोटस यशस्वी केले. या ऑपरेशन लोटसचा आता दुसरा टप्पा पार पडण्याची शक्यता आहे. सातारा जिल्हा परिषदेच्या सभापती निवडीसाठी शिवसेना-राष्ट्रवादीची पुन्हा एकदा भाजपसोबत गाठ पडणार आहे.

जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीनंतर आता विषय समित्यांच्या सभापती निवडीची विशेष सभा ४ एप्रिल रोजी बोलावण्यात आली आहे. जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्या अध्यक्षतेखालीच सभापतींच्या निवडी होणार आहेत. जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण समिती, महिला व बालकल्याण समिती, कृषी व पशुसंवर्धन समिती, बांधकाम व आरोग्य समिती सभापतीपदाच्या निवडणुका घेण्यात येणार आहेत.

या निवडणुकीसाठी ४ एप्रिल रोजी सकाळी १० ते दुपारी १२ वाजेपर्यंत उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल करावी लागणार आहेत. या अर्जाचे नमुने त्याच ठिकाणी इच्छुकांना उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. दुपारी बारा ते साडेबारा या वेळेत प्राप्त नामनिर्देशन पत्रांची छाननी, दुपारी साडेबारा ते दुपारी एक यादरम्यान नामनिर्देशनपत्र माघार घेणे व एकनंतर आवश्यकता असल्यास हात उंचावून मतदान घेऊन त्याचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे.

Makrand Patil-Shambhuraj Desai-Jaykumar Gore-Shivendraraje Bhosale
Satara ZP : शाब्बास! फडणवीसांनी थोपटली शिवेंद्रराजे, जयकुमार गोरेंची पाठ; सातारा ZP अध्यक्षांनाही आशीर्वाद : शिवसेना-राष्ट्रवादीच्या 'आदळाआपटकडे' साफ दुर्लक्ष

एकीकडे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीचा वाद राज्यात पेटलेला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या सदस्यांनी फेरनिवडणुकीची मागणी केली आहे. असे असताना जिल्हा प्रशासनाने विषय सभापती निवडीचा निर्णय घेतला आहे. पण इथेही ऑपरेशन लोटस राबवले जाणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत झालेल्या दगाफटक्यानंतर मंत्री शंभुराज देसाई आणि मंत्री मकरंद पाटील सावध झाले आहेत.

जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत झालेल्या राड्यामुळे सातारा संपूर्ण राज्यात गाजत आहे. या निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या 2 सदस्यांना मतदानला जातानाच अटक करण्यात आली. या दोघांविरोधात ज्या जिल्हा परिषद सदस्याच्या अपहरणाचा आरोप करण्यात आली होता त्या सदस्याने आपले अपहरण झाले नसून आपण स्वतःहून पक्षासोबत गेल्याचे लेखी दिलेले आहे. त्यानंतरही संबंधित दोन सदस्यांना मतदान करू न देताच उचलले गेले.

Makrand Patil-Shambhuraj Desai-Jaykumar Gore-Shivendraraje Bhosale
Satara ZP : अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीचा वाद पेटलेला असतानाच सातारा जिल्हा प्रशासनाचा मोठा निर्णय; पुन्हा जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालीच...

या दोघांना मतदानापासून वंचित ठेवल्यामुळे सातारा पोलिसांची राज्यभरात बदनामी झाली. याच अटकेच्या कारवाईवेळी मंत्री शंभूराज देसाई यांना धक्काबुक्की झाल्याचा त्यांचा दावा आहे. या सगळ्या राड्याच्या चौकशीचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. दरम्यान, शिवसेना, राष्ट्रवादीकडून फेरनिवडणुकीसाठी न्यायालयाचे दरवाजे ठोठावण्याचा निर्णय झाला आहे. हा वाद पेटलेला असतानाच नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी वादात सापडलेल्या जिल्हा प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे.

फुटीर सदस्यांना बक्षीस?

कोरेगाव तालुक्यातील शिवसेनेचे कुमठे गटातील हणमंतराव जगदाळे आणि सातारा रोड गटातील सारीका जगदाळे या शिवसेना आमदार महेश शिंदे समर्थक सदस्यांनी भाजपला मतदान केले. याशिवाय खटाव तालुक्यातील बुध गटातील राष्ट्रवादीच्या सदस्या लता कर्णे, फलटण तालुक्यातील गुणवरे गटातील ऋतुजा जगताप आणि खेड गटातील कामेश कांबळे यांनी भाजपच्या उमेदवार प्रिया शिंदे यांना मतदान केले. आता या फुटीर सदस्यांपैकी कोणाला सभापती निवडीत काय बक्षीस मिळणार का? याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com