Jaykumar Gore Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Solapur Politic's : जयकुमार गोरेंच्या विधानामुळे खळबळ; सोलापुरातील आणखी कोणते नेते भाजपत प्रवेश करणार?

Jaykumar Gore Statement : गोरे यांनी करमाळ्यात भाजप पहिल्या क्रमांकाचा पक्ष करायचा असल्याचे सांगून आणखी काही लोक भाजपत प्रवेश करणार आहेत, याबाबतचे भाष्य केले आहे.

Vijaykumar Dudhale

Solapur, 12 July : सोलापूर जिल्ह्यातील काही दिग्गज नेते भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार असल्याची चर्चा गेल्या काही महिन्यांपासून सुरू आहे, त्याला पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी नुकत्याच केलेल्या विधानामुळे पुष्टी मिळाल्याचे मानले जात आहे. पण, भाजपच्या गाडीवर स्वार होणारे हे नेते फक्त करमाळा तालुक्यातील असणार की जिल्ह्यातील, याकडे सोलापूरच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

करमाळा मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवणारे प्रा. रामदास झोळ, माया झोळ, कन्हैयालाल देवी, सूर्यकांत पाटील या प्रमुख नेत्यांनी दोन दिवसांपूर्वी मुंबईत भारतीय जनता पक्षात (BJP) प्रवेश केला आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, पालकमंत्री जयकुमार गोरे, माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, भाजपचे सोलापूर पश्चिम विभागाचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांची उपस्थिती होती.

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षामध्ये इन्कमिंग वाढले आहे. देशात आणि राज्यात सत्तेत असलेल्या भाजपकडे अनेकांचा मोठा ओढा आहे. त्यातूनच सोलापूर (Solapur) जिल्ह्याच्या करमाळा तालुक्यातील नेत्यांनी भाजपत जाण्याचा निर्णय घेतला आहे. आता नव्या पक्षात त्यांच्यावर काय जबाबदरी येते, हेही पाहावे लागणार आहे.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपला ताकद देण्याची भूमिका प्रवेश केलेल्या या प्रमुख नेत्यांनी घेतली आहे. त्यानंतर गोरे यांनी करमाळ्यात भाजप पहिल्या क्रमांकाचा पक्ष करायचा असल्याचे सांगून आणखी काही लोक भाजपत प्रवेश करणार आहेत, याबाबतचे भाष्य केले आहे, त्यामुळे फक्त करमाळ्यातीलच पक्षप्रवेश होणार की सोलापूर जिल्ह्याच्या इतर भागातीलही नेतेमंडळी जय श्रीराम म्हणज भाजपच्या वळचणीला जाणार, याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.

सोलापूर जिल्ह्यातील काँग्रेसची काही नेतेमंडळी भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. मात्र, त्याला अद्याप अधिकृत दुजोरा मिळू शकलेला नाही. मात्र, हे नेते भाजपकडे आकृष्ट झाल्याचे राजकीय वर्तुळातून सांगण्यात येत आहे, त्यामुळे जयकुमार गोरे यांनी कोणत्या मोठ्या नेत्यांवर गळ टाकला आहे, हे लवकरच स्पष्ट होणार आहे.

भाजपाच्या आक्रमक भूमिकेमुळे सोलापूर जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाला मोठ्या प्रमाणात गळती लागल्याचे मागील काही दिवसांपासून दिसून येत आहे, त्यामुळे भाजप आणि गोरे यांचे लक्ष हे केवळ काँग्रेसच्या नेत्यावर असणार की आणखी काही मोठ्या नेत्यांवर त्यांचे लक्ष आहे, हे लवकरच दिसून येणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT