Jayshree Patil BJP Entry Devendra Fadnavis chandrakant patil chandrashekhar bawankule sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Jayshree Patil : वसंतदादांच्या गावात भाजपची पहिल्यांदाच सत्ता; नातसून जयश्री पाटलांचा 'पायगुण'

Vasantdada's Padmale village : भाजपमध्ये नुकताच काँग्रेसच्या बंडखोर नेत्या जयश्री पाटील यांनी प्रवेश केला. त्यांच्या या प्रवेशामुळे सांगलीत भाजपला मोठे बळ मिळाले आहे.

Aslam Shanedivan

Sangli News : काँग्रेसने निलंबन केल्यानंतर श्रीमती जयश्री पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यामुळे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचे घरान्यातील वारसा आता भाजपशी जोडला गेला आहे. यामुळे भाजपची शहरासह जिल्ह्यातदेखील ताकद वाढली आहे. याचबोरबर पहिल्यांद वसंतदादांच्या गावात देखील भाजपला कमळ फुलवण्याची संधी चालून आली आहे.

वसंतदादांचे मूळगाव असलेल्या पद्माळेमध्ये प्रथमच भाजपची ताकद वाढली आहे. पद्माळे ग्रामपंचायतमध्ये जयश्री पाटील यांच्या मदनभाऊ गटाचे सरपंच असून, उपसरपंच भाजपचे होते. नुकत्याच झालेल्या विकास सोसायटीच्या निवडणुकीतही मदनभाऊ गटाने सत्ता मिळवली आहे. हा गट चार दिवसांपूर्वी भाजपवासी झाल्यामुळे वसंतदादांच्या गावातच आता भाजपचे वर्चस्व आणि भाजपचीच सत्ता आल्याची चर्चा सुरू झाली आहे.

महाराष्ट्राचे चार वेळा मुख्यमंत्रिपद भूषवलेले स्व. वसंतदादा पाटील यांचे मूळ गाव सांगलीपासून जवळच असलेले पद्माळे हे आहे. राज्याच्या राजकारणात आणि सहकारात आपला अमीट ठसा उमटवलेले वसंतदादांचे गाव म्हणून पद्माळेची राज्याला ओळख आहे. या गावावर आजवर काँग्रेसचीच आणि पर्यायाने वसंतदादा घराण्याची सत्ता राहिली आहे.

विष्णूअण्णा खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष संग्राम पाटील यांच्याकडे सध्या गावचे नेतृत्व ही आहे. ते वसंतदादा घराण्याशी संबंधित असले, तरी जयश्री पाटील यांचे कट्टर समर्थक आहेत. गावच्या राजकारणात त्यांची भूमिका महत्त्वाची राहते. पद्माळे ग्रामपंचायत आणि विकास सोसायटीवरही त्यांची सत्ता आहे.

गतवर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत स्व. मदनभाऊ पाटील यांच्या पत्नी जयश्री पाटील यांनी काँग्रेसने तिकीट नाकारल्याने बंडखोरी केली. त्यामुळे पक्षाने त्यांची पक्षातून निलंबित केले होते. सध्या त्या कोणत्याही पक्षात नव्हत्या. मात्र, त्यांच्या गटाचा प्रभाव आजही महापालिका क्षेत्रात; तसेच सांगली, मिरज विधानसभा मतदारसंघातही आहे.

त्यामुळे त्यांना आपल्या पक्षात घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट आणि भाजपमध्ये चुलस होती. यात भाजपने बाजी मारली. चार दिवसांपूर्वी मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत त्यांनी जयश्री पाटील यांनी भाजपप्रवेश केला. त्यांच्यासोबत काँग्रेसचा मोठा गट भाजपमध्ये दाखल झाला आहे. विष्णू अण्णा खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष संग्राम पाटील हेही भाजपमध्ये दाखल झाले. त्यामुळे पद्माळे गावातही आता भाजपचे वर्चस्व वाढले आहे आणि महापालिका क्षेत्रातही भाजपची ताकद वाढली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT