Jitendra Awhad Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Jitendra Awhad In Kolhapur : गद्दार सापांना पायताणाने चेचा ! जितेंद्र आव्हाडांचा हल्लाबोल

Sharad Pawar Kolhapur Sabha : कोल्हापुरात दंगा करणारी बाहेरची पिलावळ

सरकारनामा ब्यूरो

Kolhapur Political News : शरद पवार कसलेले राजकीय वस्ताद असून कुस्तीसाठी या वयातही प्रत्येकाला आव्हान देतात. प्रबोधनकार ठाकरेंनी नाव ठेवलेल्या शिवसेनेचे हिंदुत्व मानवतावादी असून भाजपचे हिंदुत्व हिंसावादी असल्याचा आरोप करत माजी मंत्री आमदार जिंतेद्र आव्हाडांनी पक्ष फोडणाऱ्यांसह गद्दार सापांना कोल्हापुरी पायताणाने चेचा, असा घणाघात केला. तीव्र शब्दात केलेल्या हल्ल्यामुळे भाजप आक्रमक होऊन आव्हाडांना जशास तसे उत्तर देण्याची शक्यता आहे. (Latest Political News)

राष्ट्रवादी काँग्रेसची कोल्हापूर येथे निर्धार सभा पार पडली. यावेळी शरद पवार, छत्रपती शाहू महाराजांच्या उपस्थित आव्हाडांनी पुरोगामी विचारांवर बोलताना भाजपवर टीका केली. आव्हाड म्हणाले, "कोल्हापूरमध्ये मध्यंतरी येथे दंगा झाला. कोल्हापूरात असे होऊच शकत नाही. ज्यावेळी चौकशी केली त्यावेळी पोलिसांनीच सांगितले की वाट पाहूनही नाकाबंदीचे आदेश मिळाले नाहीत. शहरात बाहेरील गाड्या आल्या, दंगा केला आणि निघून गेल्या. त्यात पाच टक्केही कोल्हापूरची मुले नव्हती, ही अभिमानाची गोष्ट आहे", याकडेही आव्हाडांनी लक्ष वेधले.

तुम्हाला शिवसेना चालते मग भाजप का नाही, असा प्रश्न वारंवार विचारला जातो. यावर बोलताना जितेंद्र आव्हाडांनी शाहू महाराज आणि प्रबोधनकार ठाकरेंचा एक किस्सा सांगितला. ते म्हणाले, "शाहू महाराज बेडला खिळले होते. ते प्रबोधनकार ठाकरेंना कोदंड म्हणायचे. त्यांनी प्रबोधनकार ठाकरेंना बोलावून घेतले. त्यावेळी शाहू महाराजांनी त्यांच्याकडे प्रतापसिंहराजेंचा खरा इतिहास समोर आणण्यास सांगितले. त्यानुसार प्रबोधनकारांनीही तो इतिहास समोर आणला. यातून शिवसेनेचे हिंदुत्व मानवतावादी आहे, तर भाजपचे हिंदुत्व हिंसावादी आहे. त्यामुळे आम्हाला शिवसेना मान्य आहे", असेच स्पष्टपणे आव्हाडांनी यावेळी सांगितले.

"मणिपूरचा व्हिडिओ व्हायरल केला तर सरकार प्रश्न उपस्थित करते. त्यावर बोलले जात नाही. तसेच हरियाणात लोक तलवार काढून भर रस्त्यात उभे राहतात. त्यावर कारवाई होत नाही. निवडणूक आयोगाला केंद्र सरकारच्या हातातील बाहुले बनवले आहे. धर्मांतराच्या नावाखाली समाजात तेढ निर्माण केला जात आहे. त्यामुळे गद्दारी करणाऱ्या सापांना चेचण्यासाठी पायताणाचा वापर करावा लागेल", अशी टाकी आव्हाडांनी केली.

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT