Rohit Pawar Appeal To Kolhapurkar : ‘कोल्हापूरकरांनी ठरवलं की ते करूनच दाखवतात....खटक्यावर बोट अन्‌ जागेवर पलटी’

वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफांनी शरद पवारांची सभा एवढ्या छोट्या मैदानावर का, असा सवाल उपस्थित केला होता. पण.....
Rohit Pawar
Rohit PawarSarkarnama

Kolhapur News : ‘कोल्हापूरकरांनी एकदा ठरवलं की, ते करूनच दाखवतात. खटक्यावर बोट अन्‌ जागेवर पलटी. जे जे लोक आपला विचार सोडून पलीकडे गेले आहेत. ज्यांना या भूमीला महत्व द्यायचं नसेल तर मग कोल्हापूरकरांना माहिती आहे की त्यांचं काय करायचं,’ अशा शब्दांत आमदार रोहित पवार यांनी बंडखोरांना धडा शिकविण्याचे आवाहन केले. (Appeal of MLA Rohit Pawar to teach the rebels a lesson)

कोल्हापूरच्या दसरा चौकात आज स्वाभिमान सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्या सभेत रोहित पवार बोलत होते. ते म्हणाले की, कोल्हापूरची सभा दसरा चौकातच होणार, असे शरद पवारांनी आयोजकांनी सांगितले होते. दसरा चौकाला ऐतिहासिक महत्व आहे. शाहू महाराजांचा पुतळा आणि त्यांचे स्मारक आहे. परिसरात सर्व समाजासाठी वसतिगृह उभे केले आहे.

Rohit Pawar
NCP Letter Against Ajitdada Group अजितदादा गटाचे ९ आमदार अन्‌ २ खासदारांविरोधात राष्ट्रवादीची तक्रार; विधानसभा अध्यक्ष, लोकसभा सभापतींना पत्र

वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफांनी शरद पवारांची सभा एवढ्या छोट्या मैदानावर का, असा सवाल उपस्थित केला होता. पण, कोल्हापूरकरांना ते मान्य आहे का असा सवाल रोहित पवार यांनी करताच ‘नाही, नाही’ असा गजर झाला. याच मैदानातून चांगल्या गोष्टींची, सामजिक संघटनेची बैठक याच ठिकाणाहून होत असते. पलीकडे गेल्यामुळे ते शाहू महाराजांचा विचार विसरलेले आहेत, असा टोलाही रोहित पवारांनी मुश्रीफांना लगावला.

रोहित पवारांना अजित पवारांची जागा घ्यायची आहे, असंही ते म्हणाले. पण मी राजकारणात जागा घेण्यासाठी आलेलो नाही. शिव-शाहू-फुले-आंबेडकरांचा विचार जपण्यासाठी आणि त्याला ताकद देण्यासाठी मी राजकारणात आलो आहे. पुरोगामी विचार जपण्यासाठी मी आलो आहे. स्वाभिमानाला किंमत देण्यासाठी आम्ही आलो आहे. मी जागा घेणयासाठी आलो नाही, तर प्रतिगामी विचाराला जागा दाखवण्यासाठी मी राजकारणात आलो आहे. शिव फुले शाहू आंबेउकरांचा विचार उंचीवर नेण्यासाठी आम्ही राजकारणात आलो आहे, असेही रोहित पवारांनी स्पष्ट केले.

Rohit Pawar
Satyajeet Tambe Allegation : टार्गेट करून मला काँग्रेसमधून बाहेर ढकललं, पण ‘ती’ जबाबदारी पक्षश्रेष्ठींची; सत्यजित तांबेंनी सांगितली आपबिती

ते म्हणाले की, पुरोगामी विचार टिकावा, महिला, युवा, सर्वसामान्य शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी आपला ८३ वर्षांचा युवक सर्वांसाठी मैदानात उतरला आहे. आपल्या ज्या विचाराच्या शक्तीच्या विरोधात ती फार मोठी आहे. पण आपल्याला सर्वसामान्यांची ताकद त्यापेक्षा मोठी आहे, हे आपल्याला दाखवून द्यायचं आहे. सभेला झालेली गर्दी पाहून कळतंय, आपला नाद खुळाय आणि आपला विषय फार हार्ड आहे.

राष्ट्रवादी फुटलेली नाही, तो पक्ष नाही, तर हा एक विचार आहे. कार्यकर्ता हा राष्ट्रवादीची ताकद आहे. तुम्हा कुटुंबाला आणि पार्टीला फोडू शकता. पण, कार्यकर्त्याचा विचार कधीही तोडू शकत नाही. मराठी माणूस आणि महाराष्ट्राचा हा सह्याद्री दिल्लीपुढे कधीही झुकलेला नाही. तो यापुढेही झुकणार नाही, असेही त्यांनी नमूद केले.

Rohit Pawar
Sharad Pawar On Ajitdada : पहाटेच्या शपथविधीनंतर पुन्हा भाजपसोबत जायचं नाही, अशी भूमिका अजितदादांनी घेतली होती; पवारांचा गौप्यस्फोट

वटवृक्षाच्या पारंब्या काढल्या तर तो वृक्ष कमकुवत होईल, असं काहींना वाटतंय. पण त्याच्या पारंब्या खोलवर रुजल्या आहेत. या वटवृक्षाची ताकद फार मोठी आहे. दिल्लीच्या तख्तासमोर हा महाराष्ट्र कधीही झुकणार झालेला नाही, आजही झुकलेला आणि भविष्यातही झुकणार नाही, असेही रोहित पवारांनी ठणकावले

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com