Mahayuti protests Against Jitendra Awhad Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Jitendra Awhad : सोलापुरात जितेंद्र आव्हाडांच्या पोस्टरला महायुतीने मारले जोडे

Mahayuti protests Against Jitendra Awhad in Solapur : जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या कृत्याचा निषेध म्हणून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वात संपूर्ण महाराष्ट्रात निषेध आंदोलन करण्यात आले. आव्हाडांच्या फोटोला जोडे मारो आंदोलन आज (ता. ३० मे) सोलापूरमध्ये करण्यात आले. आव्हाड यांना तातडीने अटक करण्यात यावी, अशी मागणी महायुतीच्या वतीने करण्यात आली.

Vijaykumar Dudhale

Solapur, 30 May : महाड येथे आंदोलनादरम्यान डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो फाडण्याच्या आमदार जितेंद्र आव्हाड यांंच्या कृत्याचा सोलापूरमध्ये महायुतीकडून तीव्र शब्दांत निषेध करण्यात आला. आव्हाड यांच्या पोस्टरला ‘जोडे मार’ आंदोलन करून त्यांना तातडीने अटक करण्याची मागणी महायुतीच्या वतीने करण्यात आली.

मनुस्मृतीमधील दोन श्लोकांचा शैक्षणिक अभ्यासक्रमात समावेश करण्याच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी महाडमधील चवदार तळ्याकाठी आंदोलन केले. त्या आंदोलनादरम्यान आव्हाड यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो फाडल्याचा आरोप होत आहे.

आव्हाड यांनी केलेल्या कृत्याचा निषेध म्हणून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वात संपूर्ण महाराष्ट्रात निषेध आंदोलन करण्यात आले. आव्हाडांच्या फोटोला जोडे मारो आंदोलन आज (ता. 30 मे) सोलापूरमध्ये (Solapur) करण्यात आले. जितेंद्र आव्हाड यांना तातडीने अटक करण्यात यावी, अशी मागणी महायुतीच्या वतीने करण्यात आली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

स्वतःला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अनुयायी म्हणवणारे जितेंद्र आव्हाड यांच्या पोटात आणि ओठात एक हे महाडमधील त्यांच्या कृत्यातून दिसून आले आहे. ते कायम हिंदू धर्म आणि महापुरुषांवर बोलतात आणि समाजात अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. अशा जितेंद्र आव्हाड यांचा आम्ही जाहीर निषेध करतो, असे भाजपचे आमदार विजयकुमार देशमुख यांनी म्हटले आहे.

जितेंद्र आव्हाड यांच्या वर्तनामुळे संपूर्ण राज्यात संतापाची लाट पसरली आहे. त्यांनी यापूर्वी मल्हारराव होळकर आणि महात्मा बसवेश्वर यांच्याबाबत अशाच पद्धतीचे वक्तव्य जितेंद्र आव्हाड यांनी केले होते. स्टंटबाजीसाठी महापुरुषांवर जाणून बुजून टीका करणे आणि माफी मागणे हा जितेंद्र आव्हाड यांचा उद्योग झाला आहे. मनोविकृत जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल करावा आणि त्यांना अटक करावी, अशी मागणी महायुतीच्या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संतोष पवार यांनी केली आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो फाडल्याबद्दल जितेंद्र आव्हाड यांच्यावर तातडीने गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी भाजपचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांनी केली आहे. जितेंद्र आव्हाड यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा; अन्यथा यापेक्षाही मोठे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे आनंद चंदनशिवे दिला.

या आंदोलनावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष जुबेर बागवान, डाॅ. किरण देशमुख, संजय कोळी, राजकुमार पाटील, अजित गायकवाड अविनाश पाटील यांच्यासह महायुतीचे प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT