Solapur Politics : सोलापूरमध्ये महाआघाडीत फूट पडणार?; आडम मास्तरांनी काँग्रेसच्या डावपेचावर केले भाष्य...

Mahavikas Aghadi News : सोलापूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांना मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे माजी आमदार नरसय्या आडम यांनी पाठिंबा जाहीर केला होता. त्यावेळी सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघ इंडिया आघाडीत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाला देण्याचे सुशीलकुमार शिंदे यांनी मान्य केल्याचा दावा आडम मास्तर यांनी केला होता.
Narsayya Adam Master
Narsayya Adam MasterSarkarnama

Solapur, 30 May : महाविकास आघाडीत वादाची पहिली ठिणगी सोलापूरमध्ये पडली असून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे माजी आमदार नरसय्या आडम मास्तर यांनी काँग्रेसमध्ये चाललेल्या डावपेचाबाबत भाष्य केले. इंडिया आघाडीत काँग्रेस आपल्याला विधानसभेची जागा सोडेल, या भ्रमांत कोणी राहू नका. आतापासूनच आपल्याला स्वबळाची तयारी करावी लागेल, असा सूचक आदेशही आडम मास्तर यांनी कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यकर्त्यांना दिला.

सोलापूर लोकसभा मतदारसंघात ( Solapur Lok Sabha Constituency) काँग्रेसच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे (Praniti shinde) यांना मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे माजी आमदार नरसय्या आडम (Narsayya Adam Master) यांनी पाठिंबा जाहीर केला होता. त्यावेळी सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघ इंडिया आघाडीत (India Aghadi) मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाला देण्याचे सुशीलकुमार शिंदे यांनी मान्य केल्याचा दावा आडम मास्तर यांनी केला होता.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Narsayya Adam Master
Bhujbal warning To Bjp : भुजबळांनी टोचले भाजपचे कान; विधानसभा निवडणुकीतील संभाव्य धोकाही सांगितला!

सोलापूर शहर मध्यच्या जागेबाबत शरद पवार, उद्धव ठाकरे आणि नाना पटोले यांच्याशी चर्चा झाली आहे. त्यामध्ये पवारांनी सुचवले की, शहर मध्यची जागा माकपला द्यावी. त्याबाबत सीताराम येचुरी यांनी चर्चा करावी. त्यानुसार सीताराम येचुरी यांनी सुशीलकुमार शिंदे यांच्याशी चर्चा केली. त्या वेळी शिंदे यांनी त्याला संमती दर्शविली होती, असे त्या वेळी सांगितले होते. मात्र, आडम मास्तर यांनी सीटूच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात बोलताना काँग्रेसच्या खेळीबाबत भाष्य केले आहे.

आमदार प्रणिती शिंदे ह्या सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघातून तीन वेळा निवडून आल्या आहेत. त्यामुळे काँग्रेस पक्षाचा सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघावर दावा राहू शकतो. मात्र, याच मतदारसंघातून प्रणिती शिंदे यांनी माजी आमदार नरसय्या आडम यांचा पराभव केला होता. आडम मास्तर यांनी पुन्हा सोलापूर शहर मध्य मतदारसंघातून निवडणूक लढविण्याबाबत लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान सूतोवाच केले होते.

सोलापूर शहर मध्य मतदारसंघातून काँग्रेसकडून निवडणूक लढविण्यासाठी अनेक जण इच्छूक आहेत. मुळात दुसऱ्याला संधी मिळण्यासाठी लोकसभा निवडणुकीत प्रणिती शिंदे यांचा विजय अनिवार्य आहे. नाही तर विधानसभा निवडणुकीला प्रणिती शिंदे ह्याच पुन्हा उमेदवार असू शकतात. त्यातच आपल्याला संधी मिळणार म्हणून शहर मध्य मतदारसंघातील अनेक इच्छुकांनी प्रणिती शिंदे यांच्या विजयासाठी देव पाण्यात ठेवले आहेत.

Narsayya Adam Master
Adam's Sensational Allegations : माजी आमदार आडम मास्तरांचा काँग्रेसवर खळबळजनक आरोप; ‘माझ्याकडे लाखो रुपये घेऊन आले होते...’

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com