Ramraje Naik Nimbalkar Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Ramraje : मला तुरुंगात टाकच; मग बघतो फलटणमध्ये तू कसा राहतो ते?; तुरुंगातून तुला थर्ड लावेन : रामराजेंचा कडक इशारा

Phaltan Political News : फलटण रुग्णालयातील डॉक्टर युवती मृत्यू प्रकरणावरून रामराजे नाईक निंबाळकर संतापले. “मला तुरुंगात टाका, पण मग फलटणमध्ये राहू देणार नाही,” असा इशारा त्यांनी विरोधकांना दिला.

Vijaykumar Dudhale
  1. माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी फलटण ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टर युवती आत्महत्येप्रकरणात आपले नाव घेतल्यावर विरोधकांवर तीव्र आरोप केले.

  2. त्यांनी विरोधकांना आव्हान दिले की “हिम्मत असेल तर नाव घ्या,” तसेच स्वतःवर राजकीय षड्यंत्र रचल्याचा आरोप केला.

  3. रामराजे यांनी सांगितले की, भूतकाळात त्यांना खंडणी प्रकरणात अडकवण्याचा प्रयत्न झाला होता, परंतु मुख्यमंत्र्यांच्या हस्तक्षेपामुळे ते वाचले.

Satara, 03 November : फलटण ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टर युवतीच्या मृत्यू प्रकरणाचा मास्टरमाईंड कोण आहे, असं एकजण म्हणाला. हिम्मत असेल तर घे नाव. मग मीही बोलतो, १९८५ पासून कोणी कुठं काय गुण उधळले ते. कुणाच्या किती आहारी जावं. हे ज्यांनी त्यांनी ठरवावं.

सुदैवाने त्यांची मुलं चांगली आहेत. त्यांच्याकडे बघून आम्ही गप्प आहोत. पण, त्यांनी ताणलं, तर मीही तुटेपर्यंत ताणेन. मी तुम्हाला घाबरलो नाही आणि तुमच्या मागचा जो मास्टरमाईंड आहे, त्याला तर चुकूनही घाबरत नाही. काय करेल हो हा माणूस. वयाच्या ७७ वर्षी मला तुरुंगात टाकेल. टाकच आणि बघतो कसा फलटणमध्ये राहतो ते. तुरुंगातून तुला थर्ड लावेन, असा इशारा विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर (Ramraje Naik Nimbalkar) यांनी विरोधकांना दिला.

रामराजे म्हणाले, फलटण (Phaltan) ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टर युवतीवर आत्महत्येची वेळ का आली असेल. आमचा कोणावर काय आरोप नाही. पोलिसांचा तपास होईल. मी तर पुण्यात होतो, पण माझ्यावर षडयंत्र रचल्याचा आरोप झाला. ते एवढे का घाबरले आहेत. घाबरले नाही तर त्यांच्या कार्यकर्त्यांकडून रामराजेंनी केलं, असा आरोप होत आहे. प्रल्हाद साळुंखे यांना मी यापूर्वीच सांगितलं होतं की, माझ्या नादाला लागू नको. आता मी हिसका दाखवल्याशिवाय राहीन का?

डॉक्टर युवतीच्या आत्महत्येप्रकरणी माझं नाव घेण्याचं काय कारण होतं? कुणाच्या तरी सांगण्यावरून? हे सांगणाऱ्यांचं षडयंत्र असेल तर हिम्मत असेल तर तुम्हीच माझं नाव घ्या ना. मी वाटच बघतोय की माझं नावं योग्य माणसानं घ्यावं. उगीच कुत्र्या-सुत्र्यांना, चोरांना माझं नाव घ्यायला लावू नका. मी कधीही कोणावर पोलिस केसेस केलेल्या नाहीत, असा दावाही रामराजेंनी केला.

उलट २०२२ मध्ये मी विधान परिषदेचा सभापती असताना दोन कॉन्ट्रक्टरच्या वादात मला गुंतवण्याचा प्रयत्न झाला. त्याबाबतचा कागद मी आज ना उद्या दाखवेन.पुण्याच्या आर्थिक गुन्हे शाखेचे एक पत्र सभापती कार्यालयात आलं होतं. ते माझ्याकडे आहे. त्याबाबत कधी काही बोललो नाही. गुन्हे कोणाचे आणि सांगतात काय? रामराजेंनी संबंधित कॉन्ट्रक्टरला पुण्यातील घरी बोलावून खंडणी मागितली. त्यांना अटक करा, असा आग्रह करणारा कोण?, असा सवालही रामराजेंनी उपस्थित केला.

मी गेली दोन दिवस म्हणत आहे की, मुख्यमंत्र्यांच्या न्यायबुद्धीवर माझा विश्वास आहे, त्याला हे कारण आहे की आज मी इथे आहे. मुख्यमंत्र्यांपर्यंत खंडणीची बातमी गेली. त्यांनी फोन करून सांगितलं की कुठल्याही राजकीय माणसाला यामध्ये गुंतवण्याचा प्रयत्न होणार नाही, तो करू नका. कॉन्ट्रक्टरची भांडणं त्यांची ते बघून घेतील. त्याच्या तपशीलात मी जाणार नाही. पण हे कोण करतं हो सगळं. मी करतो का? असा सवाल रामराजेंनी केला.

निंबाळकर म्हणाले, १९९६ मध्ये आमदार झालो. त्यानंतर तालुक्यातील सर्व गटातटाचे कार्यकर्ते आमच्यासोबत आले. काही जण आले नाही ते वेगळे राहिले. पण मी कधीही चिमणराव, हणमंतराव यांच्या कार्यकर्त्यांना त्रास दिलेला नाही. आम्ही कोणालाही त्रास दिला नाही. पोलिस ठाण्याचा उपयोग राजकारणासाठी केला, म्हणून हे आज आमच्यावर आरोप करत आहेत.

मी सभापती असताना मला तुरुंगात टाकण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. मी कधीही त्यावर बोललो नाही. मुख्यमंत्र्यांना कळलं म्हणून त्यातून मी वाचलो, नाही तर ३६८ च्या खंडणीच्या गुन्ह्यात मला सभापती म्हणून आतमध्येच अडकवलं असतं. ही ह्यांची कला, कृती आणि संस्कार, असेही रामराजेंनी सांगितले.

Q1. रामराजे नाईक निंबाळकर कोणत्या प्रकरणावरून चर्चेत आले आहेत?
A1. फलटण ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टर युवतीच्या आत्महत्येप्रकरणावरून ते चर्चेत आले आहेत.

Q2. त्यांनी विरोधकांना काय आव्हान दिले?
A2. “हिम्मत असेल तर माझं नाव घ्या” असे म्हणत त्यांनी थेट आव्हान दिले.

Q3. रामराजे यांनी कोणत्या षड्यंत्राचा आरोप केला?
A3. त्यांच्या विरोधकांनी राजकीय षड्यंत्र रचून त्यांचं नाव प्रकरणात ओढल्याचा त्यांनी आरोप केला.

Q4. मुख्यमंत्र्यांविषयी रामराजे काय म्हणाले?
A4. त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या न्यायबुद्धीवर विश्वास व्यक्त केला आणि त्यांच्या हस्तक्षेपामुळे आपली सुटका झाल्याचे सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT