Phaltan Doctor Case: विरोधकांचा दबाव वाढला,फलटण महिला डॉक्टर प्रकरणात सरकारचा तडकाफडकी मोठा निर्णय, डॅशिंग IPS महिला अधिकाऱ्याची 'एन्ट्री'

Satara Crime News: फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरच्या आत्महत्येनंतर दररोज नवनवे खुलासे येत आहेत. महिला डॉक्टरने चौकशी समिती तसेच पोलिसांना लिहिलेल्या पत्रामध्ये अनेक धक्कादायक आरोप केले होते. त्यावरून उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत.
Phaltan female doctor suicide case; investigation details and past inquiry report discussed.
Phaltan female doctor suicide case; investigation details and past inquiry report discussed.Sarkarnama
Published on
Updated on

Phaltan News: सातारा जिल्ह्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी म्हणून ड्युटीवर असलेल्या डॉक्टर तरुणीच्या आत्महत्या प्रकरणानं संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. या प्रकरणात दिवसेंदिवस अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहे. तसेच डॉक्टर तरुणीच्या आत्महत्येनंतर पोलीस प्रशासन आणि राजकीय नेत्यांकडून खळबळजनक दावेही करण्यात येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) एसआयटी चौकशी स्थापन करण्याच्या पोलिस महासंचालकांना निर्देश दिल्यानंतर 24 तासांच्या आतच आणखी एक तडकाफडकी दुसरा मोठा निर्णय घेतला आहे.

मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी फलटण येथील जिल्हा उपरुग्णालयात नोकरीवर असलेल्या डॉक्टर महिलेच्या कथित आत्महत्याची गंभीर दखल घेतली आहे.त्यांनी याप्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचंही सांगितलं होतं. त्यांनी एसआयटी चौकशी स्थापन करण्याचे आदेश दिल्यानंतर आता एका धडाकेबाज महिला आयपीएस अधिकाऱ्याकडे या प्रकरणाचा तपास सोपवला असल्याची माहिती समोर येत आहे.

फलटण येथील डॉक्टर महिलेच्या आत्महत्येच्या (Phaltan Doctor Suicide case) प्रकरणाचा तपासासाठी आता सरकारनं एसआयटीची स्थापना करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. आता या एसआयटीचे नेतृत्त्व एक तडफदार महिला आयपीएस अधिकारी तेजस्वी सातपुते या करणार असल्याची विश्वसनीय माहिती समोर येत आहे.

या प्रकरणाचा तपास सुरु करण्याचे आदेश सातपुते यांना देण्यात आले आहेत. त्यांच्या एन्ट्रीनंतर आता महिला डॉक्टर आत्महत्येप्रकरणात धक्कादायक बाबी समोर येतात का ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Phaltan female doctor suicide case; investigation details and past inquiry report discussed.
Pune Gangwar: पुण्यात गँगस्टारच्या भावाची निर्घृणपणे हत्या! आंदेकर, कोमकरनंतर तिसरा 'गेम' गणेश काळेचा; वर्षभरातच 3 मोठे हत्याकांड

फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरच्या आत्महत्येनंतर दररोज नवनवे खुलासे येत आहेत. महिला डॉक्टरने चौकशी समिती तसेच पोलिसांना लिहिलेल्या पत्रामध्ये अनेक धक्कादायक आरोप केले होते. त्यावरून उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या महिला नेत्या सुषमा अंधारे यांनी हे प्रकरण चांगलंच उचलून धरलं आहे. शिवाय त्यांनी खळबळजनक दावे करताना काही पुरावेही सादर केले आहेत.

डॉक्टर महिलेने आत्महत्या केलेली नसून तिची हत्या करण्यात आल्याचा आरोप विरोधकांकडून आणि तिच्या कुटुंबियांकडून करण्यात येत आहे. आता या प्रकरणाचा सखोल तपास व्हावा यासाठी मोठा निर्णय घेण्यात आला आहे. विरोधकांचा वाढत चाललेल्या दबावामुळेच सरकारने हे पाऊल उचलले असल्याचं बोललं जात आहे.

Phaltan female doctor suicide case; investigation details and past inquiry report discussed.
Pune Politics : पुण्यातून राजकारण फिरणार: दोन्ही शिवसेना एकत्र येण्याबाबत चर्चा; पवारांची राष्ट्रवादी सोबतीला

2012 सालच्या आयपीएस अधिकारी असलेल्या तेजस्वी सातपुते यांनी सातारा आणि सोलापूर जिल्ह्यात पोलीस अधीक्षकपदाची मोठी जबाबदारी सांभाळली आहे. त्यांचा या भागात काम करण्याचा अनुभव लक्षात घेऊनच सरकारनं त्यांच्याकडे फलटण येथील डॉक्टर महिला आत्महत्येसारख्या गंभीर प्रकरणाचा तपास देण्यात आल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com