K. P. Patil vs A. Y. Patil  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

K P Patil vs A Y Patil : तिकिटासाठी दाजी अन् मेव्हण्यामध्ये पेटला वाद! राधानगरी मतदारसंघात महाविकास आघाडीत चुरस

Radhanagari Constituency : राधानगरी विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक चुरस महाविकास आघाडी मधील उमेदवारीवरून झाली आहे. तिकिटासाठी दोघांध्ये चढाओढ.

Rahul Gadkar

राधानगरी विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक चुरस महाविकास आघाडी मधील उमेदवारीवरून झाली आहे. लोकसभा निवडणुकीत दोन नंबरची मताधिक्य या मतदारसंघातून मिळाल्यानंतर अनेक जण महाविकास आघाडीकडे आकर्षित झालेत. यामध्ये महायुतीतून माजी आमदार के पी पाटील यांनी संधी साधत महाविकास आघाडीकडे उमेदवारीची मागणी केली आहे. हा मतदारसंघ शिवसेना (ShivsenaUBT) ठाकरे गटाकडे जाण्याची शक्यता असल्याने त्यांनी गाठीभेटी सुरू केल्या आहेत. नुकताच त्यांनी मेळावा घेत 'लढणारच.. जिंकणारच' अशी घोषणा करत दंड थोपाटले आहेत.

पण त्यांच्याच विरोधात आता महाविकास आघाडी कडून आपल्याच उमेदवारीची दावेदारी करत त्यांच्या मेहुण्यांनी ए वाय पाटील यांनी शड्डू ठोकला आहे. उमेदवारी आपल्यालाच मिळणार असून यंदा 'उमेदवार नवा, बदल हवा' ही घोषणा देत त्यांनी राधानगरी विधानसभा मतदारसंघातून (Radhanagari vidhansabha ) आपली उमेदवारी निश्चित केली आहे. लवकरच पक्षाकडून आपल्याला तिकीट मिळणार असल्याची घोषणाही या मेळाव्यात त्यांनी केली.

या मेळाव्यात त्यांनी शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि विद्यमान आमदार प्रकाश अबिटकर (Prakash Abitkar) यांच्यावर देखील निशाणा साधला. महायुतीने लाडकी बहीण योजनेऐवजी लाडक्या कंत्राटदाराची  योजना सुरू करावी, असा उपरोधिक टोला आमदार प्रकाश आबिटकर यांना लगावला. माजगाव, सुळंबी, कालवा अस्तरीकरणास भगदाड पडले आहे, रस्तेही उखडलेत, त्यांच्या दर्जावर विद्यमान आमदारांनी या कामाबाबत स्वत:चे चिंतन करावे. त्यावरूनच त्यांनी हा टोला आमदार अबिटकर यांना लगावला आहे.

काम महायुती सोबत आणि उमेदवारी महाविकास आघाडीकडे, मेळाव्यात 'के पी पाटील'च ठरले टीकेचे धनी

महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) कडून ए वाय पाटील यांनी उमेदवारीसाठी दावेदारी केली आहे. त्यांच्यासोबत माजी आमदार के पी पाटील यांनी देखील महाविकास आघाडीकडे उमेदवारीसाठी साकडे घातले आहे. ही जागा शिवसेना शिंदे गटाकडे जाण्याची शक्यता आहे. मात्र तत्पूर्वी लोकसभा निवडणुकीत ए वाय पाटील यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू महाराज छत्रपती यांना पाठिंबा दिला. तर माजी आमदार के पी पाटील यांनी महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांना पाठिंबा दिला. असे असताना माजी आमदार के पी पाटील यांनी महाविकास आघाडीकडे उमेदवारी मागितल्यानंतर मेळाव्यात के पी पाटील हेच टीकेचे धनी ठरले. तिटवेचे माजी सरपंच प्रकाश पोवार म्हणाले, ‘माजी आमदार के. पी. पाटील हे काम  महायुतीचे करतात आणि उमेदवारी महाविकास आघाडीकडे कशी मागतात’, असा सवाल करत त्यांनी उपस्थितांची मने जिंकली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT