Sanjay Ghatge And Samarjeet Ghatage Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Kolhapur Politics : फडणवीसांचं न ऐकणाऱ्या समरजीत घाटगेंना सुट्टीच नाही.., संजय घाटगेंनी विश्वासू माणसं फोडली, लवकरच भाजप प्रवेश!

Sanjay Ghatge vs Samarjeet Ghatge : माजी आमदार संजय घाटगे यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर कागल विधानसभा मतदारसंघात चेहरा मिळाला आहे. असंच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये इन्कमिंग सुरू आहे. माजी आमदार संजय घाटगे यांनी थेट महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेसमधील काही मोहरे गळायला लावलेत.

Rahul Gadkar

Kolhapur News, 17 May : माजी आमदार संजय घाटगे यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर कागल विधानसभा मतदारसंघात चेहरा मिळाला आहे. असंच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये इन्कमिंग सुरू आहे.

माजी आमदार संजय घाटगे यांनी थेट महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेसमधील काही मोहरे गळायला लावले आहेत. शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजीत घाटगे यांच्या गटाला धक्का देत शाहू साखर कारखान्याचे संचालक यशवंत ऊर्फ बॉबी माने सरकार व माजी नगरसेविका विजया निंबाळकर व बी.एस.पाटील यांचा भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे घाटगे गटाला धक्का बसला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) सोडून शाहू साखर कारखान्याचे संचालक बॉबी माने सरकार आणि माजी नगरसेविका विजया निंबाळकर मॅडम कागल व बी.एस.पाटील सिध्दनेर्ली यांनी माजी आ. संजय घाटगे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला आहे.

त्यांच्या या प्रवेशामुळे भाजपला स्थानिक पातळीवर मोठे बळ मिळाले असून आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या घडामोडीकडे राजकीय वर्तुळात विशेष लक्ष वेधले जात आहे. बॉबी माने हे समरजीत घाटगे गटातील सक्रिय आणि प्रभावी नेतृत्व म्हणून ओळखले जात होते.

त्याचबरोबर विजया निंबाळकर या स्थानिक राजकारणात अनुभवी व लोकप्रिय नेत्या असून त्यांनी अनेक वर्षे नगरसेविका म्हणून काम केले आहे. या सर्वांनी भाजपमध्ये प्रवेश करताना, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास असल्याचे आणि विकासाभिमुख राजकारणासाठीच हा निर्णय घेतल्याचे स्पष्ट केले.

आगामी काळात विधानसभा मतदारसंघातून भाजपमध्ये येणाऱ्यांची संख्या ही अधिक आहे. माजी आमदार संजय घाटगे निवडणुकीच्या अनुषंगाने मुश्रीफ गट, मंडलिक गटातून देखील भाजपमध्ये प्रवेश होणार आहे. मुश्रीफ गटातून भाजपमध्ये येणाऱ्यामध्ये एका संघाचा संचालक असल्याचे सांगितले जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT