Ajit pawar praises sharad Pawar : तारीफ पे तारीफ... अजितदादांकडून पवारसाहेबांवर स्तुतीसुमनांचा वर्षाव; सांगितला खास किस्सा

Ajit Pawar speech news : पुण्यातील एका कार्यक्रमांमध्ये अजित पवार यांनी शरद पवार यांच्या बाबतचा एक किस्सा सांगत त्यांच्यावर स्तुतीसुमने उधळली.
Sharad Pawar, Ajit Pawar
Sharad Pawar, Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

Pune News : गेले काही दिवसांपासून दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाबाबतच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत. एकीकडे चर्चा सुरू असताना दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून सातत्याने शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबाबत स्तुती करणारी वक्तव्य समोर येत आहेत.

अजित पवार (Ajit Pawar) यांनी शुक्रवारी बारामती येथील एका कार्यक्रमांमध्ये माझ्या आजोबाच्या, बापाच्या आणि माझ्या चुलत्याच्या पुण्याईने..माझं बरं चाललं आहे.! जे आहे ते आहे. त्यात काय घाबरण्यासारखे आहे. जे खर आहे ते खर आहे..! पहिल्यांदा तुम्ही शरद पवार साहेबांनी दिलेला उमेदवार म्हणून तुम्ही मला खासदार केले.. तेव्हा अजित पवार या व्यक्तीचं काम बघून केलं नव्हतं.. नंतर मला काम दाखवावं लागले, असे म्हणत दादांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे तोंड भरून कौतुक केले. त्यानंतर आज देखील पुण्यातील एका कार्यक्रमांमध्ये अजित पवार यांनी शरद पवार यांच्या बाबतचा एक किस्सा सांगत त्यांच्यावर स्तुतीसुमने उधळली.

Sharad Pawar, Ajit Pawar
Sanjay Raut News : तुरुंगात लिहिलेल्या संजय राऊतांच्या पुस्तकाला 'नरकातला स्वर्ग' हे नाव विश्वजीत कदमांच्या सासऱ्यांनी दिलं

जागतिक मातृदिनानिमित्त आयोजित मातृ नाम प्रथम या कार्यक्रमाला अजित पवार यांनी उपस्थिती लावली. यावेळी बोलताना ते म्हणाले, 'जन्माला येणारा प्रत्येक जण पहिल्यांदा आई, मा किंवा आता मम्मी म्हणतो ही आपली संस्कृती आहे. आपल्या महाराष्ट्राला मातृशक्तीची गौरवशाली परंपरा आहे. मात्र अलिकडच्या काळात अनेकांची मुलं, सून मुली, जावई या परदेशात आहेत.. दुर्दैवाने हे लोक आपल्या आई-वडिलांना विसरून जातात परदेशात गेल्यानंतर आई किंवा वडील आपल्यातून निघून गेले तर ते व्हिडीओ कॉलवरून अंत्यविधीचा कार्यक्रम करतात हे दुर्दैव आहे. त्यामुळे नाईलाजाने आता आम्हाला वृद्धाश्रम काढावे लागत आहे, हे खरच दुर्दैवी आहे.'

Sharad Pawar, Ajit Pawar
Sanjay Raut : PM मोदींशी वाद नव्हते, अमित शाह दिल्लीत आल्याने राजकीय व्यवस्थेचा...; राऊत नेमकं काय म्हणाले?

आपल्या सर्वांना आईने घडवले आहे. म्हणून आपल्या नावासमोर आईच नाव घेण्याचा कायदा आमच्या सरकारने आणला आहे. त्यासोबतच महिलाना राजकारणात 33 टक्के आरक्षण आपण दिले आहे. जर स्त्री चूल आणि मूल घर संभाळू शकते ती स्त्री गाव, नगरपरिषद देखील संभाळू शकते, असा विश्वास आम्हाला आहे. म्हणून राजकारणात हे महिला आरक्षण आरक्षण आणले आहे, असे म्हणत अजित पवार यांनी महिला आरक्षण बिल पास करतानाचा शरद पवार साहेबांचा "तो" किस्सा सांगितला.

Sharad Pawar, Ajit Pawar
Operation Sindoor : परदेशात 'ऑपरेशन सिंदूर' मागील भूमिका सुप्रिया सुळे, श्रीकांत शिंदे मांडणार; पाकवर डिप्लोमॅटीक स्ट्राईक!

शरद पवार (Sharad Pawar) साहेब मुख्यमंत्री होते. त्यावेळेस आरक्षणाचे बिल आणले, पवार साहेबांनी सांगितलं होतं की हे बिल मंजूर होइपर्यंत सभागृहाचे कामकाज सुरू राहील. मला आठवते की सभागृह चार वाजेपर्यंत चालवले आणि महिला आरक्षणाचे बिल शरद पवार साहेबांनी मंजूर करून घेतले. यावेळी साहेबांनी ठणकावून सांगितले की आज कितीही उशीर झाला तरी चालेल पण आज महाराष्ट्रात महिला आरक्षणाचे बिल मला आणायचा आहे अन् हे बिल साहेब मुख्यमंत्री असताना पास झाले, असे अजित पवार यांनी सांगितले.

Sharad Pawar, Ajit Pawar
Operation Sindoor : 'ऑपरेशन सिंदूर' केवळ ढोंग, दिखाव्यासाठी 3-4 विमानं हवेत पाठवली अन्...; काँग्रेस आमदाराने मागितले कारवाईचे पुरावे

रोज आम्ही नाटक करतो

अजित पवार म्हणाले, संकर्षण कराडे यांनी सांगितले की, दादा मी एक नवीन नाटक काढले आहे. त्याचा पन्नासावा प्रयोग बघायला या, मी त्याला म्हटले की आता रोज आम्ही नाटक करत असतो. मला काय नाटक दाखवणार? असे म्हणताच सभागृहात एकच हशा पिकाला.

Sharad Pawar, Ajit Pawar
Harshvardhan Sapkal : हर्षवर्धन सपकाळ यांचे मोठे विधान; म्हणाले ‘आघाडीच्या राजकारणामुळेच कॉंग्रेस पक्षाचे नुकसान’

कामातून वेळ भेटत नाही

आम्हालाही वाटते नाटकाला जावे पण कामातून वेळ भेटत नाही. आमचे सहकारी नेहमी काहीतरी कामे घेऊन येतात हे करा ते करा असे सांगतात. मात्र अरे सारखे काय करा, तुझे कर्तुत्व असेल तर मी करेन, काम मात्र करत नाहीत जाऊ दे आता जास्त नाही बोलणार निवडणूका आहेत, असा कार्यकर्त्यांना मिश्किल टोला अजित पवारांनी लगावला.

Sharad Pawar, Ajit Pawar
Harshvardhan Sapkal : जातीनिहाय जनगणनेमुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटेल! हर्षवर्धन सपकाळ यांना विश्वास

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com