Kumar Ashirwad Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Barshi News : कलेक्टरचा सरपंच, उपसरपंचांसह पाच सदस्यांना दणका; अतिक्रमणप्रकरणी अपात्रतेची कारवाई

Action in case of encroachment :अतिक्रमण करणाऱ्या व्यक्तींना पदावर राहण्यास अपात्र ठरविण्यात यावे, अशी मागणी दावा दाखल करून केली होती. मागील तीन वर्षांपासून सुनावणी सुरू होती. अतिक्रमण केल्याचे निष्पन्न झाल्याने जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी या पाचही जणांचे ग्रामपंचायत सदस्यत्व रद्द करण्याचा निकाल दिला.

प्रशांत काळे

Solapur, 26 May : शासकीय जागेत अतिक्रमण करणे, बार्शी तालुक्यातील कळंबवाडी (आ) गावचे सरपंच, उपसरपंचांसह पाच ग्रामपंचायत सदस्यांच्या चांगलेच अंगलट आले आहे. या प्रकरणी सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी पाच जणांना पदावर राहण्यास अपात्र ठरविले आहे, त्यामुळे बार्शी तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.

सरपंच (Sarpanch) प्रभावती महादेव मुंढे, ग्रामपंचायत सदस्य साहेबराव मुंढे, मंगल महादेव मुंढे, स्मिता विजय शिंदे, उपसरपंच (Deputy Sarpanch) मिठू दिनकर एडके यांनी बार्शी (Barshi) तालुक्यातील कळंबवाडी येथील शासकीय जागेत अतिक्रमण करून बांधकाम केले आहे, अशी तक्रार विकास भाऊ मुंढे आणि दशरथ जगन्नाथ मुंडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

अतिक्रमण (encroachment) करणाऱ्या व्यक्तींना पदावर राहण्यास अपात्र ठरविण्यात यावे, अशी मागणी दावा दाखल करून केली होती. मागील तीन वर्षांपासून सुनावणी सुरू होती. अतिक्रमण केल्याचे निष्पन्न झाल्याने जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी या पाचही जणांचे ग्रामपंचायत सदस्यत्व रद्द करण्याचा निकाल दिला.

दरम्यान, निकालाला विलंब लागल्यामुळे ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली. मात्र, एकाचवेळी तब्बल पाच ग्रामपंचायत सदस्य अपात्र ठरल्यामुळे कळंबवाडी (आ) ग्रामपंचायत बरखास्त होणार असल्याचे आता निश्चित झाले आहे.

ग्रामपंचायत सदस्य आणि त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींनी सरकारी जागेत अतिक्रमण करून बांधकाम केले आहे. त्या बांधकामात त्यांनी वास्तव्य केले आहेत, तसेच करत आहेत, हे यापूर्वीच्या प्रकरणात जिल्हाधिकारी यांच्यासमोर निप्षन्न झाले आहे. गटविकास अधिकाऱ्यांनी तसा अहवाल दिला आहे, असा युक्तिवाद अर्जदारांच्या वतीने ॲड. विकास जाधव यांनी केला. जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी तो युक्तिवाद ग्राह्य धरून संबंधितांना अपात्र ठरविण्याचा आदेश दिला.

दरम्यान, बार्शी तालुक्यासह सोलापूर जिल्ह्यातील अनेक सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्यांनी अतिक्रमण केले आहे. निकालामुळे संबंधितांचा धाबे दणाणले आहेत. या कारवाईमुळे अतिक्रमण करण्यास चाप बसेल, असा आशावाद कळंबवाडीचे माजी सरपंच पोपट पवार यांनी व्यक्त केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT