Sanjay Raut News : 'अजित पवारांचे उमेदवार पाडण्यासाठी एकनाथ शिंदेंचे खास प्रयत्न', संजय राऊतांनी सांगितले 25 ते 30 कोटी वाटले

Ajit Pawar : दिल्लीने महाराष्ट्रातील काही बेडूक फुगवले व त्यांना नेते बनवले. ते सर्व नेते राजकीय पटलावरून नष्ट होतील, असा टोला संजय राऊत यांनी लगावला.
Ajit Pawar Eknath Shinde
Ajit Pawar Eknath Shindesarkarnama

Lok Sabha Election : महाराष्ट्रातील एकेक जागा मिळवण्यासाठी महायुती-महाविकास आघाडीमध्ये काँटे की टक्कर होत आहे. अजित पवारांनी महायुतीमध्ये जात उपमुख्यमंत्री पद मिळवले. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सत्तेत वाटेकरी निर्माण झाल्याची चर्चा शिंदेंच्या कार्यकर्त्यांमध्ये होती. लोकसभेमध्ये शिंदे-फडणवीस-पवार हे महायुतीत एकत्र लढले असले तरी अजित पवार यांचे उमेदवार पाडण्यासाठी एकनाथ शिंदे यांच्या यंत्रणेने खास प्रयत्न केल्याचा खळबजनक दावा ठाकरे गटाचे नेते संजय राऊत Sanjay Raut यांनी आपल्या 'सामाना'तील लेखात केलाय.

'एकनाथ शिंदे Eknath Shinde यांनी पैशांचा अफाट वापर या निवडणुकीत केला. प्रत्येक मतदारसंघात त्यांनी किमान 25-30 कोटी रुपये वाटले. पुन्हा अनेक उमेदवार पाडण्यासाठी वेगळे बजेट. अजित पवार Ajit Pawar यांचा एकही उमेदवार निवडून येऊ नये यासाठी शिंदे व त्यांच्या यंत्रणेने खास प्रयत्न केले.' असा थेट दावा राऊत यांनी केला.

Ajit Pawar Eknath Shinde
Kapil Patil News : कपिल पाटील करणार भाजप आमदाराचा 'करेक्ट कार्यक्रम'? तारीखही ठरली!

राऊत यांनी एकनाथ शिंदेंना बेडकाची उपमा दिली आहे. 'महाराष्ट्राने मोदी-शहांच्या झुंडशाहीशी झुंज दिली. त्यामुळे उद्याच्या दिल्लीतील परिवर्तनात महाराष्ट्राचे नेतृत्व महत्त्वाची भूमिका बजावेल. दिल्लीने महाराष्ट्रातील काही बेडूक फुगवले व त्यांना नेते बनवले. ते सर्व नेते राजकीय पटलावरून नष्ट होतील.' असे म्हणत नाव न घेता राऊतांनी एकनाथ शिंदे, अजित पवारांना टोला लगावला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

गडकरींना पाडण्याचे प्रयत्न

नरेंद्र मोदी, अमित शहा, देवेंद्र फडणवीस यांनी एकत्रितपणे नितीन गडकर यांचा पाडण्याचे प्रयत्न केले. गडकरी यांचा पराभव होत नसल्याची खात्री पटल्याने देवेंद्र फडणवीस हे नाइलाजाने प्रचार उतरले, असे संघाचे लोकच सांगत असल्याचा दावा देखील संजय राऊत यांनी आपल्या लेखात केला आहे.

Ajit Pawar Eknath Shinde
Soniya Duhan News : शरद पवारांच्या NCP ला धक्का बसण्याची शक्यता, सोनिया दुहान अजित पवार गटाच्या मार्गावर?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com