Barshi News : बार्शी मतदारसंघावर शिंदे गटाचा दावा;फडणवीस समर्थक आमदाराच्या अडचणी वाढणार

काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीत बार्शी हा मतदारसंघ राष्ट्रवादीच्या वाट्याला गेलेला आहे, त्यामुळे अजित पवार गटाची भूमिका काय राहते, हेही पाहावे लागणार आहे.
Rajendra Raut-Bhausaheb Andhalkar
Rajendra Raut-Bhausaheb AndhalkarSarkarnama
Published on
Updated on

Solapur Politic's : बार्शी विधानसभा मतदारसंघ हा पारंपारिक शिवसेनेच्या वाट्याला आलेला आहे. ही शिवसेनेची जागा असल्याने या जागेवर २०२४ मध्ये कुणीही हक्क सांगू शकत नाही. या जागेवर शिवसेना (एकनाथ शिंदे गट) धनुष्यबाण चिन्हावर लढणार आहे, असे सांगून शिवसेनेचे शिंदे गटाचे नेते भाऊसाहेब आंधळकर यांनी विधानसभेसाठी शड्डू ठोकला आहे. (Shinde group's claim on Barshi Assembly Constituency)

शिंदे (Eknath Shinde) गटाने बार्शी (Barshi) विधानसभेवर दावा केल्यामुळे भाजप समर्थक अपक्ष आमदार राजेंद्र राऊत (Rajendra Raut) यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. कारण, न्यूज अरेना इंडिया सा संस्थेने केलेल्या सर्व्हेत बार्शीचा जागा ठाकरे गटाला दाखविण्यात आली होती. तेथून मागील वेळी माजी मंत्री दिलीप सोपल यांनी शिवसेनेच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती. त्यामुळे अरेना इंडिया या संस्थेच्या सर्व्हेनंतर शिंदे गटाच्या भूमिकेमुळे राऊत यांच्या अडचणीत भर पडू शकते.

Rajendra Raut-Bhausaheb Andhalkar
Maharashtra Politic's : राष्ट्रवादी एकसंघ ठेवण्याची पवारांना विनंती; पण त्यांच्या मनात काय?, हे आज कसं सांगू; शरद पवारांच्या भेटीनंतर पटेलांची प्रतिक्रिया

भाऊसाहेब आंधळकर म्हणाले की, बार्शी आणि धाराशिव मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. हे दोन्ही मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला आलेले मतदार संघ आहेत. शिवसेना आणि भाजप युतीमध्ये हे दोन्ही मतदारसंघ हे शिवसेनेला सुटलेले मतदार संघ आहेत. बार्शीची जागा पारंपरिक शिवसेनेची जागा असल्याने या जागेवर २०२४ ला कुणीही हक्क सांगू शकत नाही

Rajendra Raut-Bhausaheb Andhalkar
Vidhan Parishad News : ‘कोर्ट नको, ते सोपं आहे, तुम्हाला’; नीलम गोऱ्हेंच्या सभापतिपदावरून फडणवीस-जयंत पाटील भिडले

बार्शी विधानसभा मतदारसंघ एकनाथ शिंदे यांची शिवसेना म्हणजे धनुष्यबाण चिन्हावर लढणार आहे, असे सांगून आंधळकर म्हणाले की, आता अजित पवार गट, भाजप आणि शिवसेना यांची युती झाल्यानंतर या ठिकाणी तो पारंपारिक मतदारसंघ शिवसेनेचा आहे. या जागेवर मागील दहा वर्षांपासून आम्ही तयारी केलेली आहे. त्यामुळे हा मतदारसंघ शिवसेनेला सुटणारा आहे.

Rajendra Raut-Bhausaheb Andhalkar
Maharashtra Monsoon Session : थोरातांचे पहिल्याच दिवशी शिंदे-फडणवीस-पवारांना चिमटे; ‘त्यांना खातेवाटप करायचं आहे, दिल्लीला जायचं आहे...’

बार्शीचे विद्यमान आमदार राजेंद्र राऊत हे अपक्ष आमदार आहेत. त्यामुळे ही जागा शिवसेनेची आहे, असा दावाही शिवसेना नेते भाऊसाहेब आंधळकर यांनी केला आहे. राऊत हे भाजप समर्थक अपक्ष आमदार आहेत. विद्यमान आमदार असल्यामुळे त्यांचा दावा पहिला राहू शकतो. तसेच, शिंदे गटानेही दावा केला आहे. दुसरीकडे काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीत बार्शी हा मतदारसंघ राष्ट्रवादीच्या वाट्याला गेलेला आहे, त्यामुळे अजित पवार गटाची भूमिका काय राहते, हेही पाहावे लागणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com