MLA Balasaheb Patil, Manoj Ghorpade Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Karad North Assembly Election : बाळासाहेब पाटील परंपरा कायम ठेवणार, 'साम'चा सर्व्हे काय सांगतो ?

Balasaheb Patil legacy continuation in Maharashtra elections: महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचा निकाल उद्या शनिवारी (ता.23) तारखेला जाहीर होणार आहे. मागील अनेक महिन्यांपासून राज्यात कोणाचं सरकार येणार याचं चित्र उद्या स्पष्ट होणार आहे. मात्र, विधानसभेच्या निकालाआधी राज्यभरातील कोणत्या विधानसभा मतदारसंघात कोणता उमेदवार विजयी होईल याबाबतचा 'साम टीव्ही'चा एक्झिट पोल समोर आला आहे.

Jagdish Patil

Maharashtra Assembly Election 2024 : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचा निकाल उद्या शनिवारी (ता.23) तारखेला जाहीर होणार आहे. मागील अनेक महिन्यांपासून राज्यात कोणाचं सरकार येणार याचं चित्र उद्या स्पष्ट होणार आहे.

मात्र, विधानसभेच्या निकालाआधी राज्यभरातील कोणत्या विधानसभा मतदारसंघात कोणता उमेदवार विजयी होईल याबाबतचा साम टीव्हीचा एक्झिट पोल समोर आला आहे. 'साम टीव्ही'च्या एक्झिट पोलनुसार कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातून यंदा कोणता उमेदवार विजयी होणार याबाबतचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

या मतदारसंघात महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे बाळासाहेब पाटील (Balasaheb Patil) आणि महायुतीकडून भाजपचे मनोज घोरपडे यांच्यात प्रमुख लढत झाली आहे. तर या मतदारसंघातील जनता पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवाराच्या गळ्यात आमदारकीची माळ घालू शकते असा अंदाज सामच्या एक्झिट पोलमधून समोर आला आहे. त्यामुळे या मतदारसंघात भाजपला मोठा धक्का बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.

बाळासाहेब पाटील यांची जमेची बाजू

कराड उत्तर विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदार बाळासाहेब पाटील यांचा दांडगा जनसंपर्क आहे. शिवाय त्यांच्या सह्याद्री साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील कर्मचारी वर्ग त्यांच्या पाठीशी नेहमी खंबीरपणे उभा राहिला आहे. तो या निवडणुकीतही त्यांच्या पाठिमागे असल्याचं दिसत आहे. त्यामुळे याचाच फायदा पाटील यांना होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

तर दुसरीकडे मनोज घोरपडे यांनी देखील या निवडणुकीत बाळासाहेब पाटलांना चांगलीच टक्कर दिली आहे. महत्वाचं म्हणजे यंदा भाजपमध्ये (BJP) कोठेही बंडखोरी झालेली नाही. या एकीचा फायदा त्यांना किती होतो हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे. तसंच त्यांच्या पाठीमागे सातारचे भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांची ताकद देखील मिळाली होती.

याशिवाय हिंदुत्ववादी मतदारांना आपल्याकडे खेचण्यातही घोरपडे बऱ्यापैकी यशस्वी झाल्याचं बोललं जात आहे. असं असलं तरी या मतदारसंघातील संभाव्य आमदार म्हणून सध्यातरी बाळासाहेब पाटील यांचे नाव आघाडीवर आहे. तरीही कराड उत्तरचा आमदार कोण होणार, याचं चित्र उद्या निकालानंतर स्पष्ट होणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT